✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भो पंचम जॉर्ज, भूप

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Tue, 03/05/2013 - 12:13  ·  लेख
लेख
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का? असल्यास कृपया इथे अपलोड करावी... भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥ शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु।॥ नयधु।॥ संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥ धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥ सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥ नयधु।॥ नीतिनिपुण मंत्री तुझे तोषवोत जनहृदंतरा ॥ सदा जनहृदंतरा ॥ राजशासनीं प्रजाहि विनत असो शांततापरा ॥ असो शांततापरा ॥२॥नयधु.॥ समरधीर वीर करुत कीर्तिविस्तरा ॥ पुत्र पौत्र सुखवुत तव राजमंदिरा ॥ सौख्यपूर्ण दीर्घ आयु भोग नृपवरा ॥३॥नयधु.॥ भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ नयधु.॥
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6465 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का?

संजय क्षीरसागर
Tue, 03/05/2013 - 15:26 नवीन
याचं आता काय आलं?
  • Log in or register to post comments

कोण पंचम जॉर्ज?

नाना चेंगट
Tue, 03/05/2013 - 15:31 नवीन
कोण पंचम जॉर्ज?
  • Log in or register to post comments

पंचम म्हणजे आरडी आणि

संजय क्षीरसागर
Tue, 03/05/2013 - 15:38 नवीन
जॉर्ज म्हणजे फर्नांडिस. त्या दोघांनी पहिल्यांदा गाण्याचा क्लास लावल्यावर म्हटलेला राग भूप असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

बाय द वे,

संजय क्षीरसागर
Tue, 03/05/2013 - 15:50 नवीन
लकडीकी काठी, काठीपे घोडा या गाण्याची चाल फिट होईल. एक कुतुहल म्हणून विचारतो, लंडनच्या राणीसमोर म्हणायचंय का? तसं असेल तर नीट चाल लावा बरं का.
  • Log in or register to post comments

पंचम जॉर्ज

चित्रगुप्त
Tue, 03/05/2013 - 18:25 नवीन
"भो पंचम जॉर्ज" ही प्रार्थना पूर्वी शाळेत रोज म्हणावी लागतसे ऐकले आहे. मलादेखिल तिची चाल कशी होती, हे जाणून घ्यायचे आहे. पंचम जॉर्ज यांचे व्यक्तिचित्रः Image removed. पंचम जॉर्ज यांचे आगमन ज्या निमित्ताने भारतात झाले, तो १९११ चा दिल्ली दरबार. जॉर्ज आणि चुलत भाऊ रशियाचे झार निकोलस द्वितीय Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

भो पंचम जॉर्ज

१.५ शहाणा
Tue, 03/05/2013 - 19:13 नवीन
भो पंचम जॉर्ज" ही प्रार्थना पूर्वी शाळेत रोज म्हणावी लागतसे आसे मि पण एक्ले आहे आई कडुन.............
  • Log in or register to post comments

चाल हवि आहे हो!!!

अत्रन्गि पाउस
Wed, 03/06/2013 - 09:53 नवीन
...........
  • Log in or register to post comments

भो पंचम जॉर्ज

फोटोप्रशांत
Wed, 06/17/2015 - 16:09 नवीन
हो … माझा मित्र अनंत भार्गव लिमये ( वय वर्षे ९३ ) याच्या आवाजात... परन्तु ही `फाईल ' एम पी ३ आहे. ती एथे अप लोड कशी करायची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

साऊंडक्लाऊडवर अपलोड करून येथे

आदूबाळ
Wed, 06/17/2015 - 16:53 नवीन
साऊंडक्लाऊडवर अपलोड करून येथे लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फोटोप्रशांत

देताय नं

अत्रन्गि पाउस
Fri, 06/19/2015 - 09:31 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फोटोप्रशांत

चाल कशी आहे

चित्रगुप्त
Sun, 05/24/2015 - 23:14 नवीन
चाल कशी आहे, याबद्दल तर उत्सुकता आहेच, हे कवन कुणी केले, याबद्दलही आहे.
  • Log in or register to post comments

जॉर्जकाकांना याचा अर्थ माहित

सूड
Wed, 06/17/2015 - 16:51 नवीन
जॉर्जकाकांना याचा अर्थ माहित होता का?
  • Log in or register to post comments

मी ही हे ऐकले होते की

पद्मावति
Wed, 06/17/2015 - 17:20 नवीन
मी ही हे ऐकले होते की स्वातंत्र्यापूर्वी ही कविता म्हणायला लागायची शाळेत. पण फक्त हि पहिली ओळ माहीत होती. तुमच्यामुळे पूर्ण कविताच कळली. मला वाटतं की हाच पंचम जॉर्ज भारतात आला असतांना जन गण मन पहिल्यांदा गायलं होतं, बहुतेक..नक्कि माहिती नाही.
  • Log in or register to post comments

आयला..

चिगो
Wed, 06/17/2015 - 21:11 नवीन
गुलामांच्या प्रार्थनांमधे जर खरंच शक्ती असती, तर अजुनही भारतावर इंग्रजांचे राज्य असते..
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥ शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा
बघा ना, अगदी 'सूर्यवंशी'च बनवला त्याला..
संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥ धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥ सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥
अगागागा.. ज्याने कुणी हे भाटगीत रचले, त्याला त्रिवार दंडवत..
  • Log in or register to post comments

अपलोड ?

कंजूस
Wed, 06/17/2015 - 22:08 नवीन
अपलोड ? मी रेकॅार्ड केलेला खंड्या पक्षाचा आवाज vocaroo dot com या साइटवर अपलोड करून त्याची लिंक डाइरेक्ट लिंक इथे आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा