भो पंचम जॉर्ज, भूप
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का? असल्यास कृपया इथे अपलोड करावी...
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु।॥ नयधु।॥
संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥
धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥
सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥ नयधु।॥
नीतिनिपुण मंत्री तुझे तोषवोत जनहृदंतरा ॥
सदा जनहृदंतरा ॥
राजशासनीं प्रजाहि विनत असो शांततापरा ॥
असो शांततापरा ॥२॥नयधु.॥
समरधीर वीर करुत कीर्तिविस्तरा ॥
पुत्र पौत्र सुखवुत तव राजमंदिरा ॥
सौख्यपूर्ण दीर्घ आयु भोग नृपवरा ॥३॥नयधु.॥
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ नयधु.॥
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का?
कोण पंचम जॉर्ज?
पंचम म्हणजे आरडी आणि
बाय द वे,
पंचम जॉर्ज
भो पंचम जॉर्ज
चाल हवि आहे हो!!!
भो पंचम जॉर्ज
साऊंडक्लाऊडवर अपलोड करून येथे
देताय नं
चाल कशी आहे
जॉर्जकाकांना याचा अर्थ माहित
मी ही हे ऐकले होते की
आयला..
अपलोड ?