Skip to main content

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 15/06/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला तंबाखुतल्या चुन्या इतकं त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.! मी लै चांगला आहे, हे जनात. आणि मनात??? मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की! हे उत्तर ठरलेलं! भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं. देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!" हे कसं येतय बरं अजुन तोंडातून ! ( मनात काहीही असलं तरी! ) शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले! काही नवे धारण केलेले! त्यांना हे दाखवायचि इच्छा होतेच.."मी अजुनही तसाच्च आहे!" आतून आवाज येतो, "भाड्या..किती बदलतो स्वत:ला...सारखा सारखा!" अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!? मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्‍यात???? सत्य अजुन आळणि आहे ? का मीच???
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7571
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"----हे हे अप्रतिम जमलय.

अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!? मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्‍यात???? सत्य अजुन आळणि आहे ? का मीच??? हे मस्त

In reply to by संदीप डांगे

फाडा बुरखे
स्वत:चे मुखवटे गळून पडले की मग लोक दुसर्‍याचे बुरखे फाडायला सरसावतात, आपलं एक निरीक्षण नोंदवलं हो!!

In reply to by सूड

गळुन पडले किंवा फेकून दिले, की असं होतं. याच्याशी सहमत. मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :) "पलटू, शुभ दिन शुभ घडी, याद पडे जब नाम लगन-मुहुरत झूट सब, और बिगाडे काम"

देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!" हे कसं येतय बरं अजुन तोंडातून ! ( मनात काहीही असलं तरी! )
एक नंबर लिहिलंय! तसंच मांजर आडवी गेल्यावर, संध्याकाळी पाल चुकचुकल्यावर, एकटी साळुंकी दिसल्यावर, तळहाताला शीत चिकटल्यावर, लहान मुलाने गोल प्रदक्षिणा घातल्यावर...

मुक्तक आवडलं यावरून रंगोलीमध्ये लागणारं एक जुनं हिंदी गीत आठवलं. थोडा थोडा सच और थोडी बेइमानी, मुझे पानी में आग लगानी आ गई हाय रे दैया हाय जवानी आ गई... :-)

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला तंबाखुतल्या चुन्या इतकं त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.!
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. (गुण १०) =))

खोट बोलण खरच इतक वाईट असत का की खोट बोलल्यावर भयंकर अपराधी पणाची भावना मनामधे दाटून यावी? नेहमी खरे बोलावे या शिकवणूकी मुळे बर्‍याच वेळा नको तेव्हा फार दडपण येते. पैजारबुवा,

काहीं खरं, कांही खोटं. कांही आतलं, कांही बाहेरचं. ह्या आंत आणि बाहेरच्या दोन वेगळ्या जगांनीच आयुष्य सुंदर आणि रंगीबेरंगी बनविले आहे. आणि तसेही आपण अंतर्मनाशी प्रामाणिक आहोत हे काय कमी आहे? कविता/मुक्तकातला प्रामाणिकपणाच भावला.

आवडलं. "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबरजानी" हे गाणं आठवलं.