थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला
तंबाखुतल्या चुन्या इतकं
त्याच्याशिवाय मेली खर्याला कीकच येत नाही,हवी तशी.!
मी लै चांगला आहे, हे जनात.
आणि मनात???
मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की!
हे उत्तर ठरलेलं!
भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं.
देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"
हे कसं येतय बरं अजुन तोंडातून !
( मनात काहीही असलं तरी! )
शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले!
काही नवे धारण केलेले! त्यांना हे दाखवायचि इच्छा होतेच.."मी अजुनही तसाच्च आहे!"
आतून आवाज येतो, "भाड्या..किती बदलतो स्वत:ला...सारखा सारखा!"
अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!?
मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्यात????
सत्य अजुन आळणि आहे ?
का मीच???
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7553
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
वा!!
अवडल्या गेले आहे.
आवडल..
खूप छान कविता.
मुक्तक आवडलं.
मुक्तक फारच आवडले.
किती तो फटकळपणा ! आँ ?? =))
मस्त
गुर्जी, मस्त हो.. :)
द्या टोले.... फाडा बुरखे...
फाडा बुरखे
In reply to द्या टोले.... फाडा बुरखे... by संदीप डांगे
गळुन पडले किंवा फेकून दिले,
In reply to फाडा बुरखे by सूड
मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!"
In reply to गळुन पडले किंवा फेकून दिले, by अत्रुप्त आत्मा
देव? धर्म?? आध्यात्म???
आणखी काही
In reply to देव? धर्म?? आध्यात्म??? by आदूबाळ
मस्त..
मस्त!
खासच.
छान मुक्तक !
आवडलं
मला तरी मुक्तक आवडलं, आणखी
मलाही आवडलं.
In reply to मला तरी मुक्तक आवडलं, आणखी by किसन शिंदे
वा..
मस्त .... आवडले
रामा शिवा गोविंदा!
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच
आवडलं मुक्तक!
आवडलं मुक्तक!
गुर्जींना खरे ज्ञान उमगले :)
खोटे बोलणे म्हणजे काय?
काहीं खरं, कांही खोटं. कांही
एक सही पाऊल पडलयं
छान !
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे
वा!
हे हे हे हे :) एकदम बरोब्बर
In reply to वा! by पैसा