Skip to main content

याचा अर्थ काय ?

लेखक हेरंब यांनी शनिवार, 29/11/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळी (२९-११-०८)सर्व वाहिन्या आलटून पालटून पहाताना जाणवले की प्रत्येक ठिकाणी अतिरेक्यांचा आकडा वेगवेगळा होता. गृहमंत्रालय १५ अतिरेकी ठार व एक जिवंत पकडलेला असे दाखवत होते तर महाराष्ट्राचे गृहमंत्री ९ ठार व एक जिवंत असे सांगत होते. केंद्र व राज्य सरकारच्या माहितीत असा फरक कसा असू शकतो ? तसेच आजच सकाळी ताजचे ऑपरेशन संपल्यावर एक अतिरेकी तिथे जिवंत पकडल्याचे सांगत होते. त्याशिवाय करकर्‍यांना मारणारा जिवंत अतिरेकी मोजला तर ते दोन व्हायला हवेत. ही गफलत जाणुनबुजून तर नव्हे ??? ज्यांना अतिरेकी मोजता येत नाहीत ते त्यांच्यापासून आमचे संरक्षण कसे करणार ? १६ - १० = ??? आणि तसे उरले असल्यास त्यांना शोधण्याची जबाबदारी कोणाची ?

वाचने 2581
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

शाळत गनिताला बराबर मास्तर भेटले नाय.

कोणाचाच कोणला मेळ नाहीए .

आता एस.एम्.एस. ची कॉम्पिटीशीन घेणार आहेत. खरे किती-ज्याचे उत्तर बरोबर त्याला ३० दिवसाचा ताज स्टे फ्री.

In reply to by विनायक प्रभू

सर्व मत्र्यांनाच ताज मधे पाठवा. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

सर्व मत्र्यांनाच ताज मधे पाठवा. व बरोबर पुन्हा लष्करला विंनंति करुन त्यांचे काही अतिरेकी पण. म्हणजे कळेल समोर मृत्यु आला की कशी फाटते ति? "अनामिका"

पोलिसांच्या कॉलिस मधुन गोळीबार करत सुसाट वेगाने पळुन जाणार्‍या अतिरेक्यांच काय झाल?? :? मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

In reply to by मदनबाण

दुसरा जखमी झाला होता त्याला उपचारानंतर अज्ञातस्थळी मुं.पोलीसांनी हलवले. त्याच्या चौकशीतून ह्या हल्ल्याची तयारी ५ महिने सुरु होती आणि पाकिस्तान लष्कराचा सक्रीय सहभाग होता हे उघडझाले आहे! चतुरंग