कैकेयीला का शिक्षा नाही?
बर्याच दिवसांनी स्व. सुधीर फडके यांनी गायलेले गीतरामायणातील 'माता न तू वैरिणी' हे गीत ऐकण्याचा योग आला. त्यांनी या गाण्यात आपल्या स्वरांतून भरताच्या मनातील भाव इतक्या परिणामकारकरीत्या प्रकट केले आहेत, की श्रोत्याच्या मनात तो प्रसंग मूर्तीमंत उभा राहतो.
माझ्या मनात असा प्रश्न आला आहे की कैकेयीला दशरथाच्या मृत्यूचे कारण होणे आणि रामाला वनात जाण्यास भाग पाडणे या कृत्यांबद्दल काहीच शिक्षा मिळालेली नाही. रामायण-कालात बर्याच गुन्ह्यांना तात्काळ शिक्षा मिळायची - ऊदा. श्रावणाच्या आईवडिलांनी दशरथाला शाप देणे, रामाने शंबुकाचा वध करणे, गौतमाचा अहिल्येला शाप, आणि सर्वप्रसिद्ध रामाने सीतेचा त्याग. पण मग तोच नियम कैकेयीला लागू झालेला दिसत नाही. असे का?
यात काही राजकारण असावे असे मला वाटते. जाणकार व अभ्यासू यावर प्रकाश टाकतील आणि आपले अभ्यासपूर्ण मत देतील अशी अपेक्षा आहे.
रामायणात लिहिलेले आहे की कैकेयीचा विवाह अशा अटीवर झाला होता की तिच्या मुलाला राजपद मिळावे; कारण दशरथ राजाला त्याच्या इतर राण्यांकडून संतती प्राप्त होत नव्हती. पण तशी ती दशरथाला कैकेयीकडून देखील प्राप्त झाली नाही - तेव्हा हे अटीचे कलम रद्द होत नाही काय?
बरं, बर्याच अभ्यासकांनी, आणि रामायणातही, म्हटलेले आहे की तशी कैकेयी वाईट स्त्री नव्हती. पण मला असे वाटते की हे स्पष्टीकरण ओढून ताणून आणलेले आहे. कैकेयी जरूर एक महत्वाकांक्षी स्त्री होती. तिला स्पष्ट दिसत होते की तिच्या मुलाला राज्य मिळणे शक्य नाही; कारण परिस्थितीच अशी आली की दशरथाच्या सगळ्या राण्यांना जवळ जवळ एकाच वेळी मुले झाली (अवांतर: हे खरे आहे का? सगळी मुले काही दिवसांच्या अंतरांनी जन्मली की काही वर्षांनी?) आणि तिचा मुलगा सगळ्यात वडील नव्हता.
यामागे गांधार राज्याचे काही राजकारण होते का? जेव्हा कैकेयीने आपली मागणी दशरथाच्या पुढे मांडली (रामाला वनवासात पाठवणे वगैरे) तेव्हा तो नाही म्हणू शकला नाही. कैकेयी (व तिच्यामागून गांधार) दशरथावर इतका दबाव टाकू शकले की त्याला नाही म्हणता आले नाही व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला (आणखी एक उदाहरण स्व. लालबहादूर शास्त्री दबावामुळे व कदाचित ताश्कंद करारावर मनाविरुद्ध सही करावी लागली).
पुढे रामायणात कैकेयीचा काहीच फारसा भाग नाही - इतकी महत्वाकांक्षी स्त्री एकदम मागे पडलेली दाखवलेली आहे. किंवा असेही झाले असावे की शिक्षा तर झालेली आहे परंतु रामायणाकाराला ते दाखवायचे नाही - त्यामुळे कैकेयीला मागे सारण्यात आले व तिचा उल्लेख केवळ इतरांबरोबर होऊ लागला.
या विषयावर काही प्रकाश टाकावा ही विनंती आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गांधार?
विकिपीडियातल्या संदर्भ
बरोबर .. कैकयी केकय देशाची राजकन्या होती.
या नाट्यात बरेच अनुत्तरित
कैकैयी ही गांधार देशीची
बरोबर .. कैकयी गांधार देशीची नव्हती.
माझ्या माहिती प्रमाणे....
पण ...
प्रियकामा
ते बा.भं.चे लेखनस्वातंत्र्य
दोन वर
मी जे वाचलंय ते..
पण शिक्षा होण्यासाठी कैकयीने
कथेच्या बांधणीच्या स्वरुपात
लबाड बायकांच्या मागून
वाह! छान शोध लावलात.
(No subject)
काही खास व्यक्तिगत अनुभव...?
आपल्या अपत्यांचे हित पाहणे हा
ऐतिहासिक व्यक्तींना देव