Skip to main content

समर

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 13/06/2015 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा जन्म झाला माझा आता कुठे मी जगण्यास लायक होतो त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा मला वाटले मी नायक होतो प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो माझा लढ़ा निर्णायक होतो एवढे समर जिंकुनही कृष्ण तरी कुठे राधेचा होतो -जिप्सी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1097
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कल्पना खासच. आवडली कविता. पण शेवटच्या ओळी खटकल्या.. एवढे समर जिंकुनही कृष्ण तरी कुठे राधेचा होतो कृष्ण आणि राधा हे वेगळे करताच येत नाहीत. देहपातळीवरचं नातं नाहीये ते. रादर राधा-कृष्ण हे व्यक्तींचं नाव नसून एका भावनेचं , नात्याचं नाव आहे. जेव्हा राधाकृष्ण हा शब्द उच्चारला जातो तेव्हा डोळ्यासमोर उभी राहते ते अभीन्नता, सायुज्यता. तिथे कुठला भेद राहीलेलाच नाहीये.