Skip to main content

फक्त तू नाही आहेस..................

लेखक झंडुबाम यांनी गुरुवार, 11/06/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी उठल्यावर आरसा बघितला की जाणवतं जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस नंतर अंघोळ करताना दिसतात शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस एकटा असताना तुझा गंध जाणवतो खूप जवळ उभी आहेस वाटून जातं पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे तुझा मोहक आवाज कुठेच नसतो आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस रात्री आकाशाकडे एकटक बघणं होतं चंद्र रोजच्यासारखाच असतो पण चांदण्यात तू नसतेस तेव्हा तुझी एक एक आठवण माझ्या डोळ्यातून ओघळत असते आणि मग जाणवतं कि फक्त तू नाही आहेस फक्त तू नाही आहेस..........................................
लेखनविषय:

वाचने 1545
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान आहे कविता. मात्र "फक्त तू नाही आहेस" हे खटकलं. ते "सिर्फ तुम नही हो" चं भाषांतर वाटतं. "फक्त तू नाहीस" हे योग्य वाटतं.

भा पो

भा पो