आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं .
डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो.
त्या निमित्ताने देशात बर्याच ठिकाणी फिरलो .
आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे !
मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं.
एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा. भत्ता ठरलेला असायचा त्यात बसणार बजेट लॉज शोधायचा आणि पुन्हा क्लायंटला भेटायचं . दिवसभर फिरल्यावर संध्याकाळ खायला उठायची .
दिवसभर दमला कि हॉटेलवर येउन एक बीयर आणि बिर्याणी घेउन टीव्ही बघत बसायचा.
अशा वेळी एकटाच असेल तर लॉजचा पोर्या , मॅनेजर हळूच "चाहिये क्या ?" विचारायचे कधी खूणवायचे.
पण अशा गोष्टींची तीव्र घृणा आणि भिती असल्याने यापासून ४ हात लांबच राहायचो. पण काहीजण फार चिक्कट असतात . फोटो बघा , आवडला तर पैसे द्या ई. सांगत मागेच लागायचे , त्यांना कटवणे फार कटकटीचे असायचे.
एकदा असाच रूम मध्ये टीव्ही बघत असताना दारावर नॉक झाले. दरवाजा उघडला तर समोरून एक विशीची एक तरूणी पटकन आत घुसली .
कसेतरी घातलेले तोकडे कपडे आणि फिकुटलेल्या चेहर्यावर लावलेली लाली आणि लिपस्टिक !
उत्तेजित होण्यापेक्षा अत्यंत केविलवाणा दृष्य होतं.
तिला शांतपणे सांगितले , बाहेर जा ! तर तिचा प्रेमळ आग्रह चालूच . म्हणलं, बाई , मला असला नाद नाही , तुम्ही जावा .
५-१० मिनिट असे झाले तेव्हा मी ओरडलो , जा नाहितर धक्के मारून हाकलेन.. तशी ती भेदरून रडायला लागली..
साब , करो ना . एक बार तो ! आज पैसा नही मिलेगा तो आज भी खाना नही मिलेगा आज तिसरा दिन है साब ! रेहेम करो! भूक लगी है साब. बहोत भूक लगी है !तिच्या फिकुटलेल्या चेहर्याचे कारण कळले आणि चिवटपणाच्या मागची अगतिकता. ------------------------------------------------------------- रूम सर्विसला कॉल करून अजून एक बिर्याणी मागवली. तिला जेवू घातलं आणि थोडे पैसे देउन पाठवलं. साला तेव्हापासून कोणी टाकून दिलं की जामं डोक फिरतं !! तेव्हापासून कळलं ,अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
वाचने
10198
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुभव वाचला. कसंतरीच झालं.
अतिशय वाईट अनुभव मुनीवर. :(
हम्म..
सुन्न करणारा अनुभव.
.
वल्ल्याने त्याचा मित्राचा
.
वाईट अनुभव
खरच फार वाईट आहे हे......।
कुणाच्या शरीराच्या भुकेपुढे
शरीरविक्रीच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता
In reply to कुणाच्या शरीराच्या भुकेपुढे by एस
मुनिवर्य
सुन्न व्हायला होतं असं काही
भूक !
अन्नाची किंमत पैश्यावर नाही
अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !अजून एक कटू सत्य ! सुन्न ! ताटात अन्न टाकून उठणार्यांचा राग येतो. जेवणावळी उठवल्यावर किती अन्न उकीरड्यावर टाकले यावरून आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणार्यांचा त्यापेक्षा जास्त राग आणि खरेतर तिरस्कार वाटतो. या निमित्ताने आमची आजी नेहमी "खाऊन माजा, टाकून नको" असे म्हणत असे, हे आठवले.:(
भूक या स्पर्धेच्या धाग्यावर
_/\_
......
कढीचा पाला, टमाटर
हे सालं पोट खुप खराब.
.
तेव्हापासून कळलं ,अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
:-(
हम्म..
हि सत्यकथा वाचून विश्राम
...
निशब्द
ज्वलंत अनुभव पण संयतपणे
:(
अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
मुनी
जरा अवांतर होइल
In reply to मुनी by नाखु
आपल्या इथे काय कोणी भुकेने
भूक !
लेखकाचा अनुभव सुन्न करणारा
In reply to भूक ! by मदनबाण
या त्या दोन मुली... त्यांना
In reply to लेखकाचा अनुभव सुन्न करणारा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)


या त्या दोन मुली... त्यांना पैसे दिले असते तर त्यांनी त्याचे काही खाद्य पदार्थ घेउन खाल्ले असते याची शक्यता तशी कमीच होती. तसेच रोज या मुलीं समोर इतर विक्रेते बोर,स्ट्रॉबेरी संत्र अशी फळ विकताना पाहतात, पण ही फळ काही त्यांना खाता येत नाहीत कारण जमवलेले पैसे त्यांच्या आई / त्या बाईला देण्यातच जात असणार, मग त्यांची ही फळ खाण्याची इच्छा मला पूर्ण करावीशी वाटली.आपल्याला ज्या गोष्टी सहजतेने उपलब्ध होतात त्याची किंमत आपल्याला कळत नाही,पण यांच्यासाठी मात्र ही गोष्ट आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी देणारा ठरली. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie बोला विठ्ठल ! :- नागरिकलोक जेवतात केंव्हा ?
सुन्न व्हायला झालं वाचून ....
सुन्न करणारा अनुभव
I am full. So better it go to dustbin.
याप्रकारच्या स्पाॅन्सर्ड
In reply to I am full. So better it go to dustbin. by सुमेरिअन
त्या स्त्रीची, तिच्यासारख्या
लेख आणि रिप्लाय सुन्न करण्यास
.
अन्नाची किंमत पैश्यावर नाही
फार संयतपणे लेख लिहिला आहे.
सुन्न करणारं लिखाण आहे हे..
एका घासासाठी!!
काय प्रतिक्रिया देणार ह्यावर!
सुन्न !
होय, सगळे संपवले तर २०/-
In reply to सुन्न ! by बबन ताम्बे
स्प्रुहणीय
In reply to होय, सगळे संपवले तर २०/- by बॅटमॅन
spRu
In reply to स्प्रुहणीय by अमित खोजे
प्रत्येकजण भुकेला.
तुम्हाला आलेला अनुभव मन बेचैन करणारा आहे.
रसगुल्ले
In reply to तुम्हाला आलेला अनुभव मन बेचैन करणारा आहे. by पद्मावति
अगदी
In reply to रसगुल्ले by वॉल्टर व्हाईट
सुन्न..
लहानपणी आजीकडे रहात होते.माझे
साध्या पद्धती
In reply to लहानपणी आजीकडे रहात होते.माझे by भाग्यश्री कुलकर्णी
धन्यवाद
मुनीवर, मन सुन्न झाले वाचून.
अन्नाची किंमत पैश्यावर नाही तर भुकेवर ठरते !
लेख सुन्न करणारा आणि
specially कंपनी sponsored
'अन्नाची किंमत पैश्यावर नाही