एचटीएमएलमधील table टॅग वापरून मिपावरील लेखनात असे करणे शक्य आहे.
माझ्या या व या लेखांत मी याचा वापर केलेला आहे.
यापेक्षा सोप्या पद्धतीने कुणी असे करत असेल तर जाणून घ्यायला आवडेल.
मी वापरतो त्या पद्धतीविषयी काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.
शेजारीशेजारी फोटो असे टाकता येतीलः
१. आधी पहिला फोटो टाका, त्याची उंची समजा ४०० ठेवली आहे.
२. त्यापुढे . (पूर्णविराम)हे चिन्ह टाका.
३. लगेचच त्यापुढे दुसरा फोटो तेवेढीच उंची ठेऊन डकवा.
याप्रकारे दोन्ही फोटो कमिजास्त रुंदी असूनही एकसारख्या उंचीचे शेजारीशेजारी येतील.
(मात्र दोघांची मिळून एकत्रित रुंदी जास्त भरत असेल, (सुमारे ८०० पेक्षा जास्त) तर ते फोटो एकाखाली एक असे येतात).
.
वरील दोन फोटो डकवताना दोन्हीची उंची ४०० ठेवली आहे. दोन्हीच्या मधे . चिन्ह दिसते आहे. (ही चित्रे मोदिग्लियानी ची आहेत)
.
वरील दोन चित्रे आधीप्रमाणेच (३००) उंची ठेऊन डकवलेली असूनही एकूण रुंदी जास्त झाल्याने एकाखाली एक आली. (ही चित्रे कोरो ची आहेत)
फ्लिकरवरचे फोटो अपलोड होत नाहीयेत.
उदा.
एरर
EntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7734 of /home/misalone/public_html/includes/common.inc).
तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन चित्रावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएल केल्यावर खालील दुवा मिळाला.
https://lh3.googleusercontent.com/A01vo9AjV6XTt_6VE3H4KSOiCZuNmerPMiwirmldjxdIscTlKN8d8ESitUsoNDCAbngw3HL17cR_8Ro=w1256-h799
फोटो प्रकाशित करताना घ्यायची काळजी
फोटोचा दुवा त्यावर राइट क्लिक करून 'कॉपी इमेज युआरएल' या पर्यायाद्वारे हमखास मिळतो (क्रोम ब्राउझर). JPEG फॉरमॅट मध्ये बहुतांश फोटोज असल्याने दुव्याचा शेवट '.jpg' ने होतो.
आपला फोटो पब्लिकली शेअर्ड आहे की नाही हे तपासण्यासाठी जिथे अपलोड केला आहे (उदा. पिकासा, फ्लिकर इत्यादी) तेथून लॉग आउट करून त्या फोटोच्या दुव्याद्वारे तो फोटो दिसतोय की नाही हे बघावे.
मोबाईलवरून ही सर्व प्रक्रिया करणे अवघड आहे.
मी संगणकावरून अपलोड करून ठेवलेल्या फोटोचा दुवा स्वतःला इमेलमध्ये पाठवून तो दुवा फोटो देण्यासाठी मोबाइलवरून वापरला आहे. पण १००% प्रक्रिया मोबाइलवरून करण्याचा अनुभव नाही.
हे अशक्य नक्कीच नाही. मिपावर कुणी ना कुणी केले असावेच. अशांपैकी कुणी लिहिले तर उत्तम.
तुम्हाला टाकायचा फोटो स्वतः काढलेला असेल तर सर्व प्रथम तो तुम्हाला आंतरजालावर कुठे तरी अपलोड करावाच लागेल.
यासाठीच ते पिकासाचे उदाहरण.
पण जर समजा तुम्हाला जालावरच असलेला एखादा फोटो संदर्भ म्हणुन द्यायचा असेल तर
१) त्या फोटोची URL प्रथम मिळवा. जर मोबाईलवर असाल तर त्या फोटोवर क्लिक करा, अनेक पर्याय येतील त्यातुन view image निवडा.
२) फोटोच्या वर त्याची URL येईल. ती काॅपी करा आणि मुळ लेखात दिलेल्या पायरी क्रमांक सहा पासुन पुढे फाॅलो करा.
आता माझे पिकासावेब हे https://plus.google.com ला जाते तसे फोटो https://photos.google.com/ मधे शेअर ऑप्शन आहे पण तो इथे इन्सर्ट करता येतो का? नवीन काही तरी भानगडि झालेल्या दिसतात. कृपया प्रकाश टाकावा
तुम्ही म्हणता तशी शेअर पर्यायातून घेतलेली लिंक या चित्रासाठी वापरत आहे.
जुन्या पद्धतीप्रमाणे फोटोवर राइट क्लिक केल्यावर कॉपी इमेज युआरएल या पर्यायाद्वारे मिळणारी लिंक खालच्या फोटोवर वापरली आहे.
त्याचीच चाचणी म्हणून वरच्या प्रतिसादात पहिल्या फोटोसाठी तो दुवा वापरला होता. तो चालत नाहीये.
ब्राउझरच्या अॅड्रेसबारमध्ये टाकल्यास त्या फोटोचे (फोटोसकट) गुगल फोटोजचे पेज ओपन होते.
ही सुविधा कदाचित अव्यवहार्य असू शकते. शेकडो मिपाकरांनी फोटोज मिपाच्या सर्वरवर अपलोड करणे सुरु केल्यास त्याला भरपूर स्टोरेज स्पेस लागेल. त्यासाठी अधिक खर्चही येईल. तसेच कुणी आक्षेपार्ह फोटोज वगैरे टाकल्यास उगाच कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. (या मला वाटणार्या शक्यता आहेत, खात्रीशीर माहिती नाही).
जर तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड करणे सोपे वाटत असल्यास तसे करून फोटोंचे दुवे इथे वापरता येतील. स्वतःचे प्रोफाइल पब्लिक नसल्यास या कामासाठी वेगळे फेसबुक पेज सुरू करता येईल. माझे फेसबुक प्रोफाइल पब्लिक असल्याने मी तेथे अपलोड केलेले फोटोज मिपावर (दुवा वापरून) प्रकाशित करत असतो.
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे----
मी गेली पाच वर्षे सर्व काम मोबाइलमधूनच करतो आहे.पुर्वी
१)photobucket dot com वापरली आणि आता त्याहूनही सोप्पी
२)postimg dot org ही आहे.
रेजिस्टर करून (कितीही अकाउंट उघडा) अॅल्बम बनवा.एक मिनीट लागेल.इथे फोटो अपलोड झाला की त्याच्याखाली लिंक्स येतात त्यापैकी "Direct link" या चौकोनातली लिंक वापरणे.
आपण काय लिहिणार आहोत आणि कोणते फोटो डकवायचे हे निश्चित असेल तेव्हा ते प्रथम फोनच्या "नोटस"मध्ये html code टाकून सेव करणे सोपे जाते सिवाय हे काम प्रवासात फावल्या वेळातही ओफलाइन करता येते. त्यासाठी खालील टेम्पेलटस करून ठेवायची आणि योग्य जागी फक्त लिंक्स पेस्ट करत जायचे. नंतर संपूर्ण लेख मिपाच्या लेखन चौकटीत पेस्ट करून "पुर्वपरीक्षण" करून फोटो हवे ढसे दिसल्यावरच "प्रकाशित करा" बटण दाबा.
टेम्प्लेट:
१)[img src="" width="500" /]
इथे [[[[ ]]]] हे कंस काढून <<<<<< इसे html चे कंस वापरा आणि " "च्या मध्ये फोटोंची लिंक पेस्ट करायची.
मिपाच्या टेक्स्ट एडिटरवरील टूलबारमध्ये पहिलेच बटन फोटो प्रकाशित करण्याचे असताना html कोड वापरावे असे का सूचवले आहे?
मोबाइलचा स्क्रीन फार मोठा नसल्यास ते बटन वापरून हे काम करणे कदाचित क्लिष्ट होत असावे हा माझा अंदाज.
ओफलाईन काम करण्यासाठीचे लिहिले आहे.ज्यांना तुकड्या तुकड्यात लेखन आणि फोटोंच्या लिंक्स टाकून काम करायचे आहे त्यांना हे सोपे वाटेल.
यापुढची पायरी-तुमचा तीन एमबीचा फोटो posting siteवर असला तरी इकडे ५ -६शे केबीचा येतो आणि न्याय देऊ शकत नाही .अशावेळी [a href="" ]मोठा फोटो इथे पाह [/a]वापरून ती लिंक " " च्या मध्ये टाका.
तुम्ही फोटोचा दुवा वापरलेला नाही. त्याऐवजी बहुधा फ्लिकरवरून फोटो एम्बेडचे कोड वापरलेले दिसत आहे.
दुवा (बहुतेक वेळी) https:// ने सुरु होईल अन .jpg किंवा .JPG ने संपेल
फ्लिकरवरचे HTML Embed ऑप्शन घेतल्यावर जे कोड मिळतं त्यात < img src = " नंतर सुरु होणारा दुवा घ्यावा अन तो मिपावर वापरावा. स्वतःला पूर्वपरिक्षणात फोटो दिसला नाही तर दुवा चुकलेला असू शकतो असे समजावे.
तसेच फ्लिकर मधून लॉग आउट करून मिपावर फोटो प्रकाशित करावा म्हणजे पूर्वपरिक्षणात न दिसल्यास तो पब्लिकली शेअर्ड नाहीये हे कळेल.
कुठल्याही फोटो शेअरींग साइटवरुन फोटोच्या फाइलचा दुवा द्यावा लागतो. तो तिथे दिसत असताना अॅड्रेसबारमधला युआरएल दुवा म्हणून वापरू नये.
तुम्हे वापरलेल्या दुव्यावरून फ्लिकर वर गेलो असता खालचा फोटो मिळाला (फोटोचा दुवा)
माझा प्रश्न पिकासावेब बद्दल.मला दुवा मिळतो त्याच्या शेवटी feat=directlink हा शब्द येतो आणि फोटो उमटत नाही.इतरांच्या याच साइटच्या फोटोच्या दुव्यात feat=embedwebsite असं दिसतं आणि त्याचा image tag काम करतो.
प्रश्न दुसरा: लेखातल्या फोटोवर प्रेस केले की इतर संस्थळावरच्या पिकासावेबचे फोटो असले तर copy link हा पर्याय दिसतो.मिपावरच्या कोणत्याच लेखाच्या कोणत्याच फोटोंवर copy link पर्याय मिळत नाही फक्त save/open image हे सामान्य पर्याय येतात.मोबाइलच्या ब्राउजरची असमर्थता असावी का?
#फ्लिकर :
#वेबसाईटवरुनच फोटो चिकटवावा लागतो, अॅप वरुन चिकटवता येत नाही.
या लेखात फोटो देण्याविषयी लिहिलेलं आहे आणि हे काम computer/laptop वरून करताना काही अडचण येत नाही.परंतू फक्त मोबाइलच वापरायचा झाला तर १) एकतर फुल वेबपेज उघडत नाही आणि दुवा मिळत नाही, अथवा २) फुल वेबपेज उघडले तरी इकडे भारतात नेट स्पीड फार कमी असल्याने वेळ फार जातो ,अथवा फोनची रॅम लगेच फुल होते , आणि ३) महत्त्वाचे डेटा फार खातो. पंधरा मिनीटांत पंधरावीस एमबी डेटा जातो. ४) आतापर्यंतची सर्व इतरही फोटोशेअरिंग साइट्सची अॅप्स फक्त फोटो घेतात पण त्यांची लिंक्स देत नाहीत.
प्रतिक्रिया
(No subject)
शेजारी शेजारी.
एचटीएमएल
शेजारीशेजारी फोटो
चोक्कस.
फ्लिकरवरचे फोटो अपलोड होत
:O
प्रयत्न
दुवा चुकलाय
धन्यवाद!
(No subject)
इमेजचा युआरएल
मी मोबाईल वरून अॉनलाईन येते.
मोबाईलवरून
तुम्हाला टाकायचा फोटो स्वतः
आता माझे पिकासावेब हे https:/
नाही चालत आहे
शेअर पर्यायातून घेतलेली
नाही दिसत आहे
फोटोचे फाइलनेम असलेला दुवा
डायरेक्ट अपलोड फोटो असा
कदाचित अव्यवहार्य
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---
खूप धन्यवाद
आपण काय लिहिणार आहोत आणि
[[[ हे कंस काढून html चे कंस
ही पद्धत का
ओफलाईन काम करण्यासाठीचे
कंजूस काकांनी सांगितल्याप्रमाणे......
प्रयत्न करतो आहे
दुवा चुकला आहे
(No subject)
(No subject)
फ्लिकर वरुन प्रयत्न केला
दुवा अयोग्य वापरलाय
माझा प्रश्न पिकासावेब बद्दल
जमले
फ्लिकर
फ्लिकर मोबाइल वेबसाइट
#फ्लिकर :
(No subject)
(No subject)
ग्फ्ग
(No subject)
http://postimage.org/ मी हे
खूप धन्यवाद कुलकर्णी सर
अविनाश कुलकर्णी
अरेरे!
ओ माय गॉड
छान