Skip to main content

गाणं बघणं 

लेखक शेखर काळे यांनी बुधवार, 10/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ज्येष्ठ मित्रांनी प्रश्न केला की गाणं प्रत्यक्ष ऐकतांना जास्त का भावतं, किंवा जास्तं भावावं का ? जर मी तेच गाणं तबकडीवर किंवा कुठल्या ध्वनिक्षेपकावरून ऐकलं आणि तेच गाणं प्रत्यक्ष गायकाला गाताना ऐकलं तर ते श्रोत्याला वेगळं आवडेल का ? प्रत्यक्ष गाण्याचा परिणाम अधिक चांगला का वाटतो ? गाणार्याला श्रोत्याला समोर बघून अधिक चांगले गायचा हुरूप येतो का ? की श्रोत्यालाच द्रुक-श्राव्य असे दोन्ही तर्हेने ते गाणी अधिक भावते ? केवळ स्वरांतून श्रवण-जादू निर्माण करायला फार कमी लोकांना जमते. आपल्या शब्दांतून, सुरांतून श्रोत्यांपर्यंत भावना पोचवणे ही कला ज्याला आली त्याच्या दारासमोर श्रवणभक्तांची गर्दी जमलीच समजा. असे गायकांना एक वेगळे जग सापडलेले असते - ते आपल्या गाण्याने त्यांच्या श्रोत्यांना त्या जगाची एक झलक दाखवतात. अशा गायकांची तबकडी ऐकली तरी आपण एका वेगळ्याच जगात जातो. ते गायक समोर नसले तरी चालतात. बर्याच श्रेष्ट गायकांना प्रत्यक्ष गाताना बघणे हा केव्हढा अनुपमेय अनुभव! स्व. पं. भीमसेन जोशींना गातांना ज्यांनी पाहिले, त्यांना तो अनुभव कुणाला वर्णन करून सांगणे अशक्य. ते जणू स्वरांना मुर्त् स्वरूप द्यायचा प्रयत्न करायचे असे वाटत असे. त्यांना ते सूर प्रत्यक्ष दिसत आहेत आणि त्या सुरांना प्रेक्षकांना दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे मला तरी वाटले. असे सूर ज्या प्रेक्षकांना/श्रोत्यांना दिसले त्यांचे अहोभाग्य! पण त्याचबरोबर त्यांना सुरांना आपल्या आवाज व गाण्यातून प्रत्यक्षात समोर ऊभे करण्याची ताकत होती. असे अलौकिक गायक फार थोडे - बोटांवर मोजण्याइतके. बाकीचे गायक इतर काही कसरती करून आपली गायन प्रेक्षणीय करायचा प्रयत्न करतात, पण ते केवळ प्रेक्षणीयच होते, श्रवणीय नव्हे. पण हे अगदीच टोकाचे ऊदाहरण झाले. पट्टीचे गायकांकडून आपोआपच हात, मान किंवा इतर अंगविक्षेप होतात - ते गायक तल्लीन झाल्यामुळे. असे अंगविक्षेप ठरवून होत नाहीत तर ते आपसूकच होतात - ते गायक थांबवू शकत नाही. कुठला स्वरविस्तार चांगला जमत असेल तर हात आपणहूनच वर जातो, मान स्वत:हूनच वळते. मधले काही गायक हातवारे, कसरती करून गाणे अधिक ऊजळेल कसे तो प्रयत्न करतात. अशा गायकांचे स्वर मनात असतात - पण ते प्रत्यक्षात ऊतरत नाहीत.त्यासाठीचे हातवारे तर होतात, पण स्वर काही वेगळेच ऊमटतात. हे गायकांऐवजी नटच जास्त शोभतात.
लेखनविषय:

वाचने 2096
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

स्वर कानांनी टिपल्या गेले पाहिजेत, तर गाण्यातील शब्द ह्रुदयाला भिडले पाहिजेत आणि संगीतात मन गुंतून राहिले पाहिजे. उदा. जाने वो कैसे लाग थे जिनको प्यार को प्यार मिला. मूळ गाणे हेमंत कुमार (https://www.youtube.com/watch?v=cmWZHQAKMEk) तेच गाणे जगजित सिंग ह्यांच्या आवाजात (https://www.youtube.com/watch?v=Ig8Nw9Wh6bY) मला वैयक्तिक जगजित सिंग ह्यांच्या आवाजातील गाणे १-२% जास्त आवडले. पसंत अपनी अपनी खयाल अपना अपना. तसेच "तूम ना जाने किस जहां में खो गये" ह्या गाण्या बाबतीत. मूळ गाणे गायले आहे ते लता मंगेशकर, ह्यांनी.....(https://www.youtube.com/watch?v=1ViU4snrErE) तर तेच गाणे चित्रा सिंग ह्यांच्या आवाजात......(https://www.youtube.com/watch?v=8Vqn3tSKfL4)

In reply to by मुक्त विहारि

तर मुद्दा असा आहे की, गायक समोर असला तर मनाला गाणे जास्त भावते का ? आपल्या आवाजातून भावना श्रोत्यापर्यंत पोचवणारे गायक अत्यंत प्रतिभाशाली असतातच - आपण दिलेल्या ऊदाहरणावरून हे स्पष्टच आहे. परंतू जर जगजित सिंग स्वत: समोर बसून जर तेच गाणे म्हणत असतील तर ते जास्त परिणामकारक होईल काय ?

'कट्यार काळजात घुसली' मधील खांसाहेब जेव्हा सुरांच्या विश्वात रममाण होउन 'घेई छंद मकरंद ' , 'लागी कलेजवा कट्यार' या पदांमधल्या हरकती मोठ्या नजाकतीने सादर करतात , तेव्हा ते बघतानाही मजा येतो .

In reply to by सिरुसेरि

हा मजा वेगळाच आहे - एखाद्याला तल्लीन होऊन गाताना पाहणे, हा आनंद शब्दात वर्णू शकत नाही.

अगदी खरे आहे तुमचे शेखर काळे. हल्लीच्या काळात अनेक गायक गायिका विशेषता शास्त्रीय किंवा सुगम गाणे श्रवणीय होण्यापेक्षा प्रेक्षणीय होईल कसे याकडे जास्त लक्ष देतात. कानसेन प्रेक्षकांना ते लक्षात येते खरे. बाय द वे कधी कौशिकी ला ऐका आणि पहा सुध्दा. माझा तर जाम क्रश आहे तिच्या गाण्यावर. स्पेशली सैया मोरा रे........ https://www.youtube.com/watch?v=X8urYZ1MehE

In reply to by शशांक कोणो

अत्यंत सुंदर, श्रवणीय आणि प्रेक्षणीय देखील. अर्थात कौशिकी चक्रवर्ती ही दिसायलाही सुंदर आहेच.

एक अत्यंत बघणीय गाणं: https://www.youtube.com/watch?v=7iUaBALEfWA खरेतर या धाग्याचा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. एकादी कलाकृती घडत असताना अनुभवणे, पूर्ण झालेली कलाकृती एकांतात अनुभवणे, तीच कलाकृती गर्दीत अनुभवणे, हे सर्व वेगळाले अनुभव असतात. मी आपले या बाबतीतले अनुभव पण सांगू इच्छितो आहे, परंतु ते एक-दोन दिवसात लिहेन.

In reply to by चित्रगुप्त

आपले विचार मनाला भावलेच. (या विषयाला धरून) एखाद्या मैफिलीचा अनुभव आपण आपल्या मनात वर्षानुवर्ष बाळगतो, तसे आपण एखादे गाणेही लक्षात ठेवतो कारण ते एका अलौकिक क्षणी ऐकलेले असते - गाण्याबरोबर आपल्या मनात असते ती त्या क्षणाची आठवण.