माझ्या एका ज्येष्ठ मित्रांनी प्रश्न केला की गाणं प्रत्यक्ष ऐकतांना जास्त का भावतं, किंवा जास्तं भावावं का ?
जर मी तेच गाणं तबकडीवर किंवा कुठल्या ध्वनिक्षेपकावरून ऐकलं आणि तेच गाणं प्रत्यक्ष गायकाला गाताना ऐकलं तर ते श्रोत्याला वेगळं आवडेल का ?
प्रत्यक्ष गाण्याचा परिणाम अधिक चांगला का वाटतो ? गाणार्याला श्रोत्याला समोर बघून अधिक चांगले गायचा हुरूप येतो का ? की श्रोत्यालाच द्रुक-श्राव्य असे दोन्ही तर्हेने ते गाणी अधिक भावते ? केवळ स्वरांतून श्रवण-जादू निर्माण करायला फार कमी लोकांना जमते. आपल्या शब्दांतून, सुरांतून श्रोत्यांपर्यंत भावना पोचवणे ही कला ज्याला आली त्याच्या दारासमोर श्रवणभक्तांची गर्दी जमलीच समजा. असे गायकांना एक वेगळे जग सापडलेले असते - ते आपल्या गाण्याने त्यांच्या श्रोत्यांना त्या जगाची एक झलक दाखवतात. अशा गायकांची तबकडी ऐकली तरी आपण एका वेगळ्याच जगात जातो. ते गायक समोर नसले तरी चालतात.
बर्याच श्रेष्ट गायकांना प्रत्यक्ष गाताना बघणे हा केव्हढा अनुपमेय अनुभव! स्व. पं. भीमसेन जोशींना गातांना ज्यांनी पाहिले, त्यांना तो अनुभव कुणाला वर्णन करून सांगणे अशक्य. ते जणू स्वरांना मुर्त् स्वरूप द्यायचा प्रयत्न करायचे असे वाटत असे. त्यांना ते सूर प्रत्यक्ष दिसत आहेत आणि त्या सुरांना प्रेक्षकांना दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे मला तरी वाटले. असे सूर ज्या प्रेक्षकांना/श्रोत्यांना दिसले त्यांचे अहोभाग्य! पण त्याचबरोबर त्यांना सुरांना आपल्या आवाज व गाण्यातून प्रत्यक्षात समोर ऊभे करण्याची ताकत होती. असे अलौकिक गायक फार थोडे - बोटांवर मोजण्याइतके. बाकीचे गायक इतर काही कसरती करून आपली गायन प्रेक्षणीय करायचा प्रयत्न करतात, पण ते केवळ प्रेक्षणीयच होते, श्रवणीय नव्हे.
पण हे अगदीच टोकाचे ऊदाहरण झाले. पट्टीचे गायकांकडून आपोआपच हात, मान किंवा इतर अंगविक्षेप होतात - ते गायक तल्लीन झाल्यामुळे. असे अंगविक्षेप ठरवून होत नाहीत तर ते आपसूकच होतात - ते गायक थांबवू शकत नाही. कुठला स्वरविस्तार चांगला जमत असेल तर हात आपणहूनच वर जातो, मान स्वत:हूनच वळते. मधले काही गायक हातवारे, कसरती करून गाणे अधिक ऊजळेल कसे तो प्रयत्न करतात. अशा गायकांचे स्वर मनात असतात - पण ते प्रत्यक्षात ऊतरत नाहीत.त्यासाठीचे हातवारे तर होतात, पण स्वर काही वेगळेच ऊमटतात. हे गायकांऐवजी नटच जास्त शोभतात.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2096
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाणं गातांना गायकाला/गायिकेला बघू नये, असे माझे मत आहे....
खरा वाद यावरच आहे
In reply to गाणं गातांना गायकाला/गायिकेला बघू नये, असे माझे मत आहे.... by मुक्त विहारि
घेई छंद मकरंद
बरोबर
In reply to घेई छंद मकरंद by सिरुसेरि
अगदी खरे आहे तुमचे शेखर काळे.
कौशिकी चे गाणे
In reply to अगदी खरे आहे तुमचे शेखर काळे. by शशांक कोणो
काही गाणी बघणीयच अस्तात ;)
एक अत्यंत बघणीय गाणे
जरूर जरूर
In reply to एक अत्यंत बघणीय गाणे by चित्रगुप्त
आस्सं आहे होय... मला वाटले