४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे?
ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे.
काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का? का तर तुंम्हा श्रीमंताच्या सगळ्या आवड्त्या जागांचा अतिरेक्यांनी त्यांचे मनसुबे पार पाडण्यासाठी जास्त करुन वापर केला आणि नासधुस केली म्हणुन ?,मुंबई लोकलमधे ११/७ ला जेंव्हा स्फोट झाले होते आणि मध्यमवर्गातली आणि कसे तरी दोन वेळचे पोट भरणारी माणसे अतिरेक्यांच्या भक्ष ठरली होती तेंव्हा कुठे गेल्या होत्या तुमच्या संवेदना.
आज नरेंद्र मोदी मुंबईत येउन गेले आणि १ करोड रुपये विरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांना देण्याची घोषणा करुन गेले ,(राजकारण करु नये त्यांनी अश्या वेळी खरतर.) पण गुलछबु विलासरावांना लगेच मिरच्या झोंबल्या.व लगेच त्यांनी प्रतिक्रिया दिली "मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणी राजकीय फायदा घेवू नये. आणि महाराष्ट्रात येवून कोणीही नाटकबाजी करू नये, असा टोला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लगावला." हिच भाषा उत्तरभारतियांच्या विरोधात व मराठी साठी महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनाच्या वेळेस लालु आणि त्यांच्या चेल्यांना सुनवायला काय वाचा बसली होती की काय या विलासरावांची?
अतिरेक्यांवर विजय मिळवायला अजुन कीती वेळ लागणार अशी विचारणा सगळ्या वृत्तवाहिन्यांकडुन सैन्याच्या अधिकार्यांना विचारला जात होता.मला त्यांच्या या प्रश्नाचच हसु येत होत ,ज्या अतिरेक्यांना या हल्ल्याची तयारी करायला ६महिन्याचा कालावधी लागला.मग काहि दिवस अथवा काही अधिक तास त्यांचा खात्मा करायला भारतिय सैन्याला लागत असेल तर आपण वाट बघायला काय हरकत आहे?
जमेची बाजु एकच की या वेळेस व ते फालतू खट्ले आणि मानवाधिकारवाल्यांना व्यथा तोंडसुख घेण्याची संधी आपल्या शुर सैनिकांनी ठेवली नाहि.पार संपवुनच टाकले सगळ्यांना.आपल्या सैन्याच कौतुक कराव तितक थोड आहे.
माझी तर फार इच्छा होती ताज मधिल शेवटच्या अतिरेक्याला भर रस्त्यात भारतिय सैनिकांनी गोळ्या घातलेल्या बघायची .कुणाला हे फार जहाल वाटेल.पण जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश या निर्दयी अतिरेक्यांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्यांना दहशत बसणार नाही.भारत आणि जास्तकरुन मुंबई म्हणजे सहज ,निर्धोक येऊन निरपराधांचे बळी घेण्यासाठी आंदण दिले आहे का या अतिरेक्यांना?
येताजाता जी काँग्रेस कंदहार विमान प्रकरणाचा आणि भाजपा सत्तेत असताना संसदेवर झालेल्या हल्लाच पल्हाळ लावत असते ..........आता मुंबईवर झालेल्या भिषण हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची तयारी आहे का काँग्रेसची?तरी बर महाराष्ट्रात सरकार देखिल यांचच आहे .आता भविष्यात प्रत्येक वेळेस काँग्रेसला देखिल या हल्यासाठी जबाबदार धरुन कायम आरोप केले जातील तेंव्हा कुठे तोंड काळ करणार आहेत सगळे काँग्रेसी. आज मनमोहनसिंग यांच्या बरोबर आडवाणी मुंबईला आले नाहित यामागे राजकारण दिसतय्?स्वतः कायम अल्पसंख्याकाच लांगुलचालन करण्याच्या नादात मुसलमानांना डो़क्यावर बसवल .आणि ते देखिल केवळ आणि केवळ एकगठ्ठा मतांसाठी ...............बहुसंख्य हिंदुना डावलुन निधर्मिवादाचे फालतु गोडवे गाणार्या काँग्रेसला भाजपाला नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार तरी पोहोचतो का?
आताच त्या शकिल अहमद्ला एका वाहिनीवर प्रतिक्रिय देताना बघितल .....काय तर म्हणे आम्ही पाकिस्तानकडे त्यांच्या प्रदेशातील अतिरेक्यांच्या छावण्यां उध्वस्त करण्यासाठी परवानगी मागु?आणि जणु राजरोसपणे पाकिस्तान देणार आहे यांना परवानगी?मुर्ख पणाचा कळस म्हणायला हवा.
काहीही झाल तरी मुंबई थांबत नाही हा संदेश देण्याचा अट्टाहास आणि व्यर्थ कौतुक आता पुरे. .....हे स्पिरिट नसुन आपल्या संवेदना दिवसेंदिवस किती बधिर होत चालल्यात याच लक्षण आहे .........शेवटि देशासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी देश आहे हे विसरता कामा नये..........आता सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरुन जनतेच्या संरक्षणासाठी सरकारला भाग पाड्ण्यावाचुन दुसरा पर्याय उरला नाही आता.
अवांतर -मुंबईवर इतका अघोरी प्रसंग ओढवल्यावर मनसे आणि शिवसेना कुठे होती ?असे प्रश्न विचारणार्यांनी ह्या पण गोष्टिंची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न जरुर करावा की शहरात भिषण परिस्थिती ओढवली असताना रक्तदान करुन आणि रुग्णवाहिका पुरवण्यात याच दोन संघटना आघाडिवर होत्या. .................
ता क-अजुन संपले नाही असे समजते आहे? पण संपेल थोड्या अवधित .
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6003
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
यू सेड इट..
टाळ्या
वा
महत्त्वाचं काय?
उत्तम प्रतिसाद
In reply to महत्त्वाचं काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या
In reply to महत्त्वाचं काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
राष्ट्रपिता बनण्याचे निकष...
In reply to आपल्या by अनामिका
गांधीनी
In reply to आपल्या by अनामिका
ऍलन ऑक्टाव्हियन ह्युम
In reply to गांधीनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
फुटकळ गांधी वादाचे पुरस्कर्ते
सहमत
In reply to फुटकळ गांधी वादाचे पुरस्कर्ते by अनामिका
माझी तर
माझं मत...
मस्त प्रतिसाद ...
In reply to माझं मत... by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to माझं मत... by बिपिन कार्यकर्ते
पूर्णपणे सहमत
In reply to माझं मत... by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to पूर्णपणे सहमत by शक्तिमान
सहमत
In reply to पूर्णपणे सहमत by शक्तिमान
+१
बरेच काही...
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
व्यक्ती तितक्या प्रकृती "
अहो.... तुमच्
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती " by अनामिका
असेच म्हणतो...
In reply to अहो.... तुमच् by बिपिन कार्यकर्ते
जगाया तो जिंदा लोगोको जाता है, मुर्दो को नहि...
खुपच छान चर्चा रंगली आहे.
सहमत!!
अनामिका....
साफ असहमत
In reply to अनामिका.... by बबलु
हे
In reply to साफ असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
गल्लत
In reply to हे by llपुण्याचे पेशवेll
इस्लामी शिक्षा
In reply to अनामिका.... by बबलु
चांगला लेख
सारासार