अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणा-यांना देखील आवडेल अशी ही recipe. अगदी पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे.
साहित्य:
१. एक लांबट जांभळे वांगे
२. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे
३. हळद, तिखट, मीठ चवीनुसार
४. १ मोठा चमचा रवा
कृती:
१. प्रथम वांग्याचे मध्यम जाडीचे काप करावे. सुरीने अथवा काट्याने त्याला दोन्ही बाजूने टोचे मारावेत.
२. एका ताटात चणा डाळीचे पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे. बेसन पीठ मध्ये १ मोठा चमचा रवा मिसळावा. त्यामुळे काप खुसखुशीत होतात. वांग्याचे काप या पिठात घोळवावेत. हाताने हलकासा दाब द्यावा जेणेकरून पीठ आतपर्यंत शिरेल.
३. आता gas वर तवा तापत ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून हे काप दोन्ही बाजूने परतून घ्यावेत. झाकण ठेवू नये.
काही महत्वाचे:
१. कापांना पीठ लावून लगेच परतावेत. मध्ये वेळ गेल्यास त्यांना पाणी सुटते व काप मऊ होतात.
२. तिखट आणि मीठ स्वादापेक्षा थोडे जास्त घालावे. म्हणजे कापांना चांगली चव येते.
३. रव्यामुळे काप खुसखुशीत होतात.
------------------
धागा संपादित केला आहे.
------------------
धागा संपादित केला आहे.
वाचने
12323
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच छान
छान पाकृ.सगळ्यांची आवडती!
थोडा फरक....
छान दिसत आहेत काप.
वांग्याचे काप... बाप !
वांग्यांबद्दलच एक गोंधळ
या पाकृसाठी
In reply to वांग्यांबद्दलच एक गोंधळ by आदूबाळ
भरली वांगी करताना
In reply to या पाकृसाठी by सूड
वाहह....अल्टीमेट दिसताहेत काप.
इझ्झी हाय.करुन बगाया पायजेण.
छान पाक्रू, करुन बघाय पायजे..
अतिशय आवडता वांगी प्रकार..
तोंडात पाणी आले. माझी ही
आहाहा... ३ रा फोटो पाहुन जीभ
लय भारि !!!!!!!
वाह मस्तच !
मस्त
छान
छान
उद्याच करून बघणार!
छ्या; कायतरीच काय. नरसोबा
In reply to उद्याच करून बघणार! by चांदणे संदीप