Skip to main content

वांग्याचे काप

लेखक टक्कू यांनी मंगळवार, 09/06/2015 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणा-यांना देखील आवडेल अशी ही recipe. अगदी पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे. साहित्य: १. एक लांबट जांभळे वांगे २. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे ३. हळद, तिखट, मीठ चवीनुसार ४. १ मोठा चमचा रवा कृती: १. प्रथम वांग्याचे मध्यम जाडीचे काप करावे. सुरीने अथवा काट्याने त्याला दोन्ही बाजूने टोचे मारावेत. २. एका ताटात चणा डाळीचे पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे. बेसन पीठ मध्ये १ मोठा चमचा रवा मिसळावा. त्यामुळे काप खुसखुशीत होतात. वांग्याचे काप या पिठात घोळवावेत. हाताने हलकासा दाब द्यावा जेणेकरून पीठ आतपर्यंत शिरेल. ३. आता gas वर तवा तापत ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून हे काप दोन्ही बाजूने परतून घ्यावेत. झाकण ठेवू नये. काही महत्वाचे: १. कापांना पीठ लावून लगेच परतावेत. मध्ये वेळ गेल्यास त्यांना पाणी सुटते व काप मऊ होतात. २. तिखट आणि मीठ स्वादापेक्षा थोडे जास्त घालावे. म्हणजे कापांना चांगली चव येते. ३. रव्यामुळे काप खुसखुशीत होतात. yy ww cc gg ------------------ धागा संपादित केला आहे.

वाचने 12323
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अजून एक-दोन घटक मी वापरतो. ते म्हणजे चिंचेचा कोळ, तांदूळाचे पीठ वगैरे. कापांना आधी मीठ लावावे. नंतर त्यावर चिंचेचा कोळ लावावा. नंतर हळद, तिखट लावावे. चण्याच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ मिसळावे. तव्यावरचे काप मस्त चुरचुरीत आणि आकर्षक दिसत आहेत. लगेच उचलून खावे असेच. अभिनंदन.

छान दिसत आहेत काप. अगदी आवडता प्रकार, मी ह्यात डाळीच्या पिठाऐवजी ज्वारीचे पिठ वापरते अधिक चुरचुरीत होतात. फोटो छान आहेत.

वांग्यांबद्दलच एक गोंधळ माझ्या मनात आहे. जाडजूड वांग्यांपैकी एक प्रकार म्हणजे गडद जांभळी वांगी. त्यावर पॅटर्न नसतो. दुसरी फिकी जांभळी - त्यावर उभा उभा जांभळा-पांढरा पॅटर्न असतो. यातली कोणती या पाकृसाठी घ्यावी?

छान. परवाच करून बघितले. छान झाले होते. सौ. वटवाघूळ यांनापण आवडले.

बेसन ऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चव छान लागते . रवा घालण्याची गरज नसते .

मस्त आणि सहजसोपी दिसतेय! बाकी पंढरपूरची वांगी १ नंबर हे जाता जाता सांगतो!