Skip to main content

पावसात जळाया लागलो...

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 08/06/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 19409
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

उत्तर भेटणारही नाही. जे अस्तित्वातच नाही ते कोण कसे सांगणार? ;)

In reply to by सतिश गावडे

मंजे जे अस्तित्वात नाही त्याच अस्तित्व नाकारुन तुम्ही अस्तित्वात असणार्या गोष्टीच अस्तित्वात असण शक्य नाही अस म्हणत आहात तर ते अस्तित्वावरच शंका घेण्यासारखे आहे..!!

In reply to by सतिश गावडे

काव्य मस्त ( कळले शष्प नाही तरीही ) . ....................................याला म्हणतात कंपू बाजी ! ( जय टाटा मोटर्स चा नाका !! )

In reply to by सतिश गावडे

कंपु म्हणजे काय? >>> तुम्हाला अलझ्यायमरर्स झाला आहे का सर ? http://www.misalpav.com/comment/652220#comment-652220 खी खी खी

In reply to by स्पंदना

लोकसंगीतात लोकांची भाषा असते. फ़ायरबंब हा रुळलेला शब्द आहे. जर मराठी शब्दच वापरायचा ठरवला तर मला तरी "अग्निशामक दलाची गाडी" असा लांबलचक शब्दच समोर येतो. दुसरा सुटसुटीत शब्द मला माहिती नाही. याच नियमाने "राया माझ्या हिरीला इंजिन बसवा" या लावणीत इंजिन या शब्दाऐवजी "पाणी उपसायचे यंत्र" असा शब्द वापरायला हवा होता त्यांनी.

In reply to by सतिश गावडे

"आगीचा बंब" हा शब्दही चालेल. मीटरमधे बसतोय का बघा. -आख्खे बालपण अग्निशमन दलात काढलेला खटपट्या.

In reply to by खटपट्या

हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये बसते किंवा कसे हे सूडला विचारावे लागेल. त्याच्याकडे शिंप्याकडे असते तशी मीटरपट्टी आहे.

In reply to by सतिश गावडे

अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे बसतेय का असे म्हणतोय...

In reply to by खटपट्या

चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार प्रकाश टाकतील.

In reply to by सतिश गावडे

सगा बाबा इनोद व्हता त्यो!! कवितेला आणि कधी भाषेचा लगाम रुचेल होय?

In reply to by स्पंदना

अरारा... म्या उगाच शिरेसली घेतला. पुढच्या वेळी इनोद लिवाल तवा "हा इनोद हाये" आसा सपष्ट लिवा. ;)

In reply to by सतिश गावडे

हो चालेल. कधी कधी गाण्याचे संगीत आधीच तयार असते आणि त्या चालीवर गीतकाराला गाणे लीहायला सांगीतले जाते. अशावेळी गीतकार गाणे लीहून आधीच तयार असलेल्या चालीवर म्हणून बघतो. या प्रक्रीयेला गाणे मीटरमधे बसवणे असे म्हणतात. चू.भू.दे.घे.

In reply to by खटपट्या

तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये. चाल तयार होती, मी फक्त एका प्रतिसादाला मीटरमध्ये बसवलं. ;)

काव्य आणि पैजारबुवांचे कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट ! सध्या आय.टी. मधे रेसेशन आहे का? रेसेशन आले की अ‍ॅप्रैजल मनाप्रमाणे होत नै, सॅलरी रेज मिळत नाही, इन्फ्लेशनशी पगार जुळत नाही, मग नाईलाजाने मैनेसाठीचे बजेट कमी होते अन मैना नाराज होऊन, सोडून ("दुस-याकडे") जाते असे ऐकवीत आहे. या काव्य सुमनामागे अशी काही कल्पित प्रेरणा दडली आहे का की ज्यामुळे भर पावसात आगडोंब उसळलाय? :-)

In reply to by बबन ताम्बे

या काव्य सुमनामागे अशी काही कल्पित प्रेरणा दडली आहे का की ज्यामुळे भर पावसात आगडोंब उसळलाय?
हे शिघ्रकाव्य आहे. प्रेरणा इथे आहे.

In reply to by खटपट्या

एका ऐकलेल्या जोकवरून हे सुचले. सिच्युएशन : २००७/०८ ची आय. टी. तील मंदी. दररोज एका बॅचलर आय.टी. इंजीनीयर बरोबर फिरणारी मुलगी विचारते. "आज क्या खिलायेगा? " तो , " क्या करे, रेसेशन है. पेमेंट कम आ रहा है आजकल" ती " पाणीपुरी भी नही? " तो , " क्या करे. इस टाइम सॅलरी भी कम आया है" ती " तो आज कुछ् भी नही? " तो" नही" ती" तो ठिक है, आजसे तू मेरा भाई है" कृ. ह. घे.

ही... ही... ह्या.... ;) उगाच असेच एक महान काव्य आठवले ! :- माझं हे सारं सामान गं सखू... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur

"कामासाठी जर कोणी उपलब्ध नसेल तर आपण आपल्या हाताने काम करावे" याची साधी शिकवण हे मध्यमवर्गीय आईवडील मुलांना देत नाहीत आणि मग मुलांवर अशी गादिवर तळमळत पडण्याची वेळ येते. हाहाहा पाताळविजयम मद्राशी शिणेमातील हास्य

आयला प्रतिसादांचा रोख भलतीकडॅच वळला. असो, पण सगा साहेब कविता नादभरीच! विरही पुरुषांच्या व्यथेला एक गगनभेदी वाचा फोडली! दुस-या कुणाला सांगून समजतं का हो हे दु:ख! मस्त रचना!

१०० झाल्याबद्दल सगाचा सत्कार ज्येष्ठ समाजसेविका सन्नी लिओनी यांच्या "एकटेपणा विसरण्याचे १०० प्रकार" याची सीडी देउन कर्णेत येत आहे शुभेच्छूक - समस्त रामदेवी संप्रदाय