Skip to main content

पुन्हा एकदा दमामि म्हणे …

लेखक दमामि यांनी मंगळवार, 09/06/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे …. कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे … चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे… आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे…. नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे …. चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8004
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

आधी होता .............. ..............केले त्याशी, त्याचा तांब्या सुटेणा, मुळ स्वभाव जाईना. (रिकाम्या जागा वकुबाप्रमाणे भराव्या)

अंदाज लावतो मी,ही जिलबी काय आहे? तांब्या परी चयाचा, पीsssठातं गेम आहे! ;-) एका हाती न कोणी,टाके कडि जराशी कढईत नीट येता,तळण्यात सेमं आहे मामी तुझिच खोडी, ना काढिलि कधी मी आत्मु स येथ कसला? , किलो चा भाव आहे? ;-) सोडुन दे 'अता' तू, 'बाजार' फारं झाला! मार्केट यार्ड मधला, मी 'कसंला' हमाल आहे! :P

In reply to by दमामि

भुर्र्र्र्र्र्र्रृर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमणराव तुम्हारा गुर्जी उडवून राह्यले बघा! :)

सुंदर ! मिपावर शिघ्रकवितेला पुन्हा धुमारे फुटू लागल्याचे पाहून बहुत तोष झाला ! =))

मृत्युंजयास नाय हो. अनाहितांनी पक्के ओळखले आहे म्हणे आयडी कोणाचा आहे ते. तिथे खुस्फुस चालली होती की अनाहितेचाच डु आयडी आहे म्हणुन.

In reply to by अजया

कुठ ऐकली? अहो, अनाहितांच्या खुसफुशीला सामान्य लोक कलकराट म्हणतात, दहा मैलावरूनही ऐकू येतो म्हणे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विंग्रजी असुदे नायतर देशी, गायीची शिंगे बरीक टोचक आहेत ;)

In reply to by सस्नेह

विंग्रजीतल्या गाय (guy) च्या डोक्यावर दृश्य शिंगे नसतात =)) ... पण वाच्यार्थाने शिंगे येऊ शकतात ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि गाय हत्या बंदीचा कायदा आहे,त्यामुळे हेवनवासी होणार नाही अशी आशा करतो.

आमच्या गुर्जींना वंदन करुन. असेल लेखणी समर्थ तर जिल्बीची रास आहे, तांब्याची करु नको खेचाखेची "मिळेल तो मला" हा फक्त भास आहे, टका ऐस नाही तर दमा मि ऐस स्वयंपिडीत होण्याची एवढी का आंस आहे? भाय म्हणता (अनहितांमागे) लपतो आहेस हा कोणता वनवास आहे ?

In reply to by सनईचौघडा

गुर्जीना वंदन करून, "मोद" झाला वाचुनी , "दर्दी" तुम्ही तर खास आहे, पण(क)मंडलू वा जिलबी , मजला न तो हव्यास आहे... नसे स्वयंपीडित मी, न समर्थ माझी लेखणी अन जगाचा भ्रम उगा , वनवास सर्वां त्रास आहे

आम्हा न वाटे कधी जीवन वनवास अथवा त्रास , जैसी दृष्टी तैसेची हे जग नको हा आंधळा विश्वास , घ्या दिक्षांत अता गुरुजींचा रांगेत* उभे राहुनी संपेल वनवास का त्रास मग जगा जीवन स्वच्छंदी, *(रांगेत आधी मी (पम्या) आणि मग टक्या आहे).

टका म्हणे माझा। यात नाही काही कट करू नका कटकट । विनाकारण ।। किंवा दमामि म्हणे | मी नसे कुणाचा डूआयडी लावू नका काडी | चरित्रास