मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा ! नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा। होशील बकरा। ताजाताजा।। लेख तू टाकसी । झुंडीने जमती शिंगे उगारती। जुने नवे ।। जास्त त्या रे माशा। करिती तमाशा। पण काही खाशा। भृंग त्यात ।। रेवा पै अजया। अनाहिता ताया। कौतुक कराया। येती पुढे ।। श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे मधाची रे पुटे। जिभेवरी ।। मग येई पुढे। चांडाळचौकडे। ब्याट्या प्रगो सुडेचिमणा क्याप्टन ।। चिमटे ते घेती। हैराण करती। गुर्जीही पळती । तांब्या संगे ।। चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।। कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं। स्वबोल ते सत्य। वाटे यासी।। दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप। डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।। नाखु आणि टका। वल्ली मापं मिकास्वॅप्स आणि बिका। भली मने।। जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या। आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।। जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।। ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव। चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।

वाचने 19270 वाचनखूण प्रतिक्रिया 108

In reply to by टवाळ कार्टा

तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका धाग्यात वाचलं त्याविषयी थोडसं लिहाल का टका सर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या Tue, 06/09/2015 - 13:47
लिहाल का टका सर
स्पा आणि त्याच्या संक्षी सरांची आठवण आली.. (गेले ते दिवस.. !! ते पूर्वीचं मिपा आज रह्यल नै बगा..!! वगैरे वगैरे)

In reply to by सदस्यनाम

श्रीरंग_जोशी Mon, 06/08/2015 - 21:19
कदाचित मद्यपान करणारे तसे न करणार्‍याला जो सल्ला देतात तो इथे लागू होईल. (म्हंजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्यातली मजा कळणार नाही.)