Skip to main content

तपश्चर्येचे फळ ???

तपश्चर्येचे फळ ???

Published on 02/06/2015 - 22:22 प्रकाशित मुखपृष्ठ
मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली. वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला. चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले. इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता, रम्भा, उर्वशीचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याजा जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते. चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते. अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते. हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली. इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला सवाल पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो. संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखा साठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार कुठे? कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का? तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले. तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र बाकी आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.
लेखनप्रकार

याद्या 3833
प्रतिक्रिया 19

हां हां हा............ जबरदस्त कल्पनाविलास...... बाकी नेक्स्ट एपिसोडमध्ये ते शिक्षेबद्दल सांगा ज़रा....

खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली...
कठीण आहे पण असो... मग बायकोने तरी दिलेला भोग विलासच पुन्हा का जवळ केला ? की लुगाइ का सुख वैराग निर्माण मे असमर्थ होता है ?

In reply to by द-बाहुबली

अ‍ॅज फार अ‍ॅज आय बिलीव विरक्त प्रवृत्ती जन्मजात असते अथवा जराशा दुखा:तुन जन्म घेते सॉल्लीड ऑरगेजम मिळाला म्हणून कोणी विरक्त होत नसते हो _/\_

In reply to by द-बाहुबली

कोणी कसं कुठे विरक्त व्हावे याचे काही नियम आहेत असं काही ऐकण्यात नाही बुवा...? तुम्हाला हा शोध कुठून लागला?

In reply to by संदीप डांगे

वेल ओरगेजम नंतर काही क्षणतच फार फार फार फ्रेश वाटते व एक नवीन सुरुवात करावीशी वाटते... अजुनही बरच काही जोमाने करावेसे वाटते. आज फिर जिनेकी तमन्ना है व मरनेका इरादा सोडावा असे वाटते. पण मी हे अवांतर आपणास का सांगतोय ? मुद्यावर येउया.. फॉर योर काइंड इन्फोर्मेशन "विरक्त होणे" शब्दव्याप्ती स्वर्गाच्या उपभोगापासुनही विरक्ती याअर्थाने योजलेली आहे. ही विरक्तता परम मुक्तीसाठी मानली जाते. पुन्हा स्वर्गात हवा तेंव्हा ओरगेजम घ्यायचे साधन म्हणून कोणीच विरक्तता मानत नाही वापरत नाही, घेत नाही, साधत नाही, बनत नाही. तस्मात.. आपणास मुद्दा ध्यानात आला असावा असे वाटते. बा॑की कोणतेही शोध लावायला मी ओशो वगैरे नाही बरंका.. ध्यानात ठेवा :)

प्रतिसादाबाबत धन्यवाद. पूर्वी भृतहरीचा एक श्लोक वाचला होता नक्की आठवत नाही पण त्याच्यात संसाराचा त्याग करून लोक तपस्या करतात पण स्वर्गात ही अप्सराच असतात. असे काही तरी होते. त्या आधारावर ही कथा रचली. सहज गंमत म्हणून.

आहे तुजपाशी.. परी जागा.... नेमस्त माखु

हाहाहा, मजा आली. माझा एक मित्र नेहमी म्हणतो की धरतीवर पुण्यसंचय करायचा, व्यसनांपासुन दूर रहायचे, व्याभिचार नाही करायचा कारण हे सगळे पापाचे धनी. आणि हे सगळे करुन स्वर्गात जाउन काय करायचे तर अप्सरांना नाचताना बघायचे आणि सोमरसपान करायचे. वरती हेच करायचे आहे तर धरतीवर केले तर काय बिघडले. ;)

ओशोचं एक प्रवचन आहे यावर मस्त. म्हणे स्वर्गात अप्सरा असतात. का तर स्वर्ग फक्त पुरुषांसाठीच आहे. या सगळ्या देवदेव करणार्‍यांना स्वर्गात जाऊन तेच करायचे आहे ज्यापासून इथे पृथ्वीवर ते पळत असतात. ऐका पहिला भाग OSHO-Lagan Mahurat Jhooth Sab 01.mp3 मजेदार आहे हा भाग. ओशो: लगन मुहुरत झूट सब