Skip to main content

गणेश मंदीर

लेखक मॅक यांनी बुधवार, 03/06/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मिपाकरांसाठी काही प्रचि... प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे. प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे. प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात. प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात. प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर. प्रचि--०6 – प्रचि--०7 – प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत. प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत. प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.

वाचने 5080
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आयला मिरजेपासून इतक्या जवळ आहे होय? पाहणारच आता नेक्ष्ट टैम गेलो की. बादवे देवळाची शैली पाहता याची प्रेरणा म्ह. बेंगलोर साईडचे कुठलेसे देऊळ आहे असे वाटते. जालावर त्याचे तसे फोटो पाहिल्याचे आठवते.

In reply to by बॅटमॅन

वाडीला गेलो होतो तेव्हा असे मंदीर आहे हे बॅट्याने सांगीतले असे तर काय झाले असते. देवा त्याला माफ कर आणि त्याचे फक्त दोनच टायर पंक्चर कर (प्रत्येकी २ दा फक्त). चुटपूट नाखु+वल्ली+प्रगो कोल्हापूर कट्टेकरी

In reply to by नाखु

नाखुनकाका, असे मंदिर आहे हेच मला माहिती नव्हते. मग सांगणार ओ कसे?

In reply to by बॅटमॅन

फितूर असे या धाग्या पुरते घोषीत करावे लागेल. आणि बॅट्या मंदीर माहीत नाही म्हणजे काय ?? आत्ता देवाची शिक्षा डब्बल होणार!! मला सांगू नको. आम्च्या चिमणला बघ प्राधिकरणातल्या
सगळ्या बागा माहीती आहेत झुडुपांसकट (त्यावरील (लि)खाणा-खुणा सहीत).
तू कधी बिघडणार देव जाणे. सचिंत नाखु

In reply to by मदनबाण

मला वाटतंय हे मंदिर जायाशिम्पूर मधील आहे जे जे मगदूम college शेजारी आहे ( Kolhapur जिल्हा )

In reply to by पाटील हो

मी पण तिथेच शिकलोय...मिपावर याची माहिती लिहायची असा ठरविलेलं पण राहून गेल...कोल्हापूरहून जरी नरसिंहवाडीला गेलात तरी वाटेवरच मंदिर लागते...

a देऊळ एका वेगळ्या दिशेने b या भागाबद्दल अशी माहिती मिळाली की, प्रत्येक गणपतीवरची कमान ही गणेशरूप आहे.... (मुकुट, सोंड, एकदंत ई. ई. ) अजून एक, हे मंदीर फक्त वीटा, चुना ई.चा वापर करून बांधले आहे..सिमेंटचा वापर करणेत आलेला नाही..

फक्त आधुनिक बांधकाम म्हणून ठिक आहे. बाकी काही खास जाणवले नाही. शेवटच्या फोटोत तर चक्क ऑक्टोपसाचा भास होतोय मंदिराच्या जागी.

उदगाव हे गाव जयसिन्गपुरच्या थोडे अलिकडे आहे . तिथुन एक रस्ता वाडीला जातो . जयसिन्गपुरचे भडंग खुप प्रसिद्ध आहे . उदगावची लाकडी खेळणी खुप छान असतात. तसेच तेथे लोकनाट्याचेही बरेच प्रयोग असतात - जसे की - 'वहिनी माझी लक्ष्मी घरची '