Skip to main content

(चा)वटपोर्णिमा

(चा)वटपोर्णिमा

Published on मंगळवार, 02/06/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे. या सगळ्यात माणसाची भावनिक उर्जा प्रचंड खर्च होते.एकीकडे तंत्रज्ञान वापरून ,संवादाच्या सहज सोप्या माध्यमांमुळे भावनिक जवळीक साधण्याचे प्रमाण सर्रास आढळते आहे.दुसरीकडे एकनिष्ठेची व्रते सांभाळत दुभंगलेल्या अवस्थेत आजच मनुष्यमन गेलेलं आहे.
लेखनप्रकार

याद्या 6601
प्रतिक्रिया 38

तमाशाचं दिल्खेचक बोर्ड बघून आत घुसावं आणि समोर बाबाम्हाराजांचं किर्तन सुरु असावं असं काहीतरी झालंय..

लेखकाच्या वैयक्तीक माहिती मधूनः
माझ्याविषयी मी आईबापानं ओवाळून टाकलेला गरीब माणूस हाये.आजूक लगीन झालेला मिलत नाय.तवा इथें आपन डबल गेम करायला आलेलो हाये..

In reply to by सदस्यनाम

'माझ्याविषयी ....'मध्ये लिहिलेलं माझ्याबद्दलची वस्तुस्थिती दर्शवते .त्यात सोयीस्कर हेतुदमन होत नाहीये हेच पुरेस आहे.

नुकतेच वटपोर्णिमेवर क्रांतिकारक काव्य वाचून मोठ्या अपेक्षेने इथे आलो होतो... बोर्डावर येथे झणझणीत रस्सा मिळेल असे लिहून लोकांना वरण खायला द्यावं असे झालंय इथे! अवांतर : एखाद्याने लिहिलेली वैयक्तिक माहिती धाग्यावर जाहीर करणे योग्य आहे का?

पुरुष मनांची घोर निराशा, खोडा पहाड निकला चुहा काहीही म्हणा धाग्याला प्रतिसाद मिळतील, हे निश्चित.

चारोळी धागा . डिलीट होणार हे निश्चित !

In reply to by प्रसाद गोडबोले

धागा डिलीट करायच्या लायकीचा असेलही परंतु त्यात मांडलेल्या विषयावर एकही सदस्याने मत व्यक्त केल नाही.विवाहसंस्था,स्त्री पुरुष नातेसंबंध या सगळ्याकडे आजचा तरुण कसा पाहतो या गोष्टी निश्चितपणे बोलल्या जाणं गरजेच आहे.थाटामाटात विवाह होत असले तरीही त्यात मानवी मनाची कुचंबणा जास्त होताना दिसते.मानवी मनाच्या भावविश्वातील सूक्ष्म हालचालींचा वेध घेण्याचा उद्देश हि पोस्ट टाकताना होता.

धागा डिलीट करायच्या लायकीचा असेलही परंतु त्यात मांडलेल्या विषयावर एकही सदस्याने मत व्यक्त केल नाही.विवाहसंस्था,स्त्री पुरुष नातेसंबंध या सगळ्याकडे आजचा तरुण कसा पाहतो या गोष्टी निश्चितपणे बोलल्या जाणं गरजेच आहे.थाटामाटात विवाह होत असले तरीही त्यात मानवी मनाची कुचंबणा जास्त होताना दिसते.मानवी मनाच्या भावविश्वातील सूक्ष्म हालचालींचा वेध घेण्याचा उद्देश हि पोस्ट टाकताना होता.

In reply to by फुंटी

या किंवा यासारख्यां विषयांवर पूर्वी चर्चा झालेले धागे आहेत. कृपया एकदा नजरेखालून घाला. चर्चाप्रस्ताव मांडताना इतकाही त्रोटकपणे मांडू नका.

In reply to by श्रीरंग_जोशी

चर्चांचे धागे असतीलही .परंतु प्रत्येक माणसाला त्यात रस वाटण कठीण असत.माझ्यासारख्या काही लोकांना एखादी चर्चा ,विषय स्वतःच्या लंगड्या विचारांना कुबड्या म्हणून पुढे सरकण गरजेच वाटत.असो.

In reply to by फुंटी

एखादा चर्चाप्रस्ताव मांडताना पूर्वी झालेल्या चर्चा वाचल्यास अधिक नेमकेपणाने नवे काही तरी मांडता येते. प्रस्तावात पूर्वीच्या चर्चांचे दुवे दिल्यास जुन्या - नव्या सदस्यांना चर्चा करण्यासाठी महत्वाचे संदर्भ मिळू शकतात.

In reply to by फुंटी

माझ्यासारख्या काही लोकांना एखादी चर्चा ,विषय स्वतःच्या लंगड्या विचारांना कुबड्या म्हणून पुढे सरकण गरजेच वाटत.
धाग्यात तुमची स्वतःची मते काय आहेत. तशी ती का आहेत याबद्दल लिहिलं असतं तरी धागा बराच हलला असता. बाकी सगळं ठीकच आहे.

In reply to by पैसा

मत ,विचार बनण ही एक प्रक्रिया असावी.जी माझ्या बाबतीत सुरु आहे.त्यामुळे या विषयावर माझं मत बनवण्याची आणि ते मांडण्याची घाई मला नाही.