Skip to main content

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)

लेखक विकास यांनी गुरुवार, 27/11/2008 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! या मूळ चर्चेस तात्काळ खूप प्रतिसाद आल्याने. येथे अधिक प्रतिसाद करणे आणी नवीन वाचणे सोपे जावे म्हणून हा धागा चालू केला आहे. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद डेक्कन मुजाहिदीनने घेतली जबाबदारी - मुंबईत बुधवारी रात्री ठिकठिकाणी गोळीबार करत सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिदीन नावाच्या संघटनेने घेतली आहे. मिडियाला इ-मेल करुन संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. येथे अतिरेक्याचे छायाचित्र पाहू शकाल.

वाचने 19626
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by अप्पासाहेब

अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही. =)) फालतु विधाने नका करु ! जर योग्य पध्दतीने मुद्दा मांडा !!! काय परिणाम होतील त्या **डेच्याला फाशी दिली तर ? जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ

In reply to by अप्पासाहेब

पण निदान एन्काऊंटर तरी करा साल्याचं! सांगा, पळुन जात होता, घातल्या गोळ्या! तेही नसेल जमत तर दुसर्‍या एखाद्या कैद्याला फितवून (पैसे/शिक्षेत सवलत इ.इ.) त्याच्याकरवि मारा त्याला...सांगा कैद्यांच्या अंतर्गत हाणामारीत अकस्मात मृत्यू! काय च्यायला, कसले बोडक्याचे प्रश्न निर्माण होतील हो? उभ्या जगात....उभ्या जगात एकतरी देश असा दाखवा की जो स्वतःवर असा हल्ला झालानंतरही आपल्यासारखं दुसर्‍याच्या दारचं कुत्रं भुंकेल म्हणुन आपलीच गळचेपी करुन घेतो! मालक, मतांचं राजकारण आहे सगळं. अफजलला फाशी दिली तर तेच फिस्कटेल हो. एक पक्ष 'अफजल अल्पसंख्याक आहे त्याला आम्ही समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय, शक्य ती मदत करु' म्हणत मतांचा जोगवा मागतो तर दुसरा पक्ष 'अजुन अफजल जिवंत का?' असं विचारुन भडकलेल्या भावना मतांमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय. तिसरे म्हणजे काश्मिरातले स्वयंघोषित राजकारणी आणि मानवाधिकारवाले! त्यांनाही अफजलमुळे स्थानिक लोकभावनांचा मलिदा मिळतोय ना! गंगेचं गटार झालंय हेच खरं!

In reply to by अप्पासाहेब

पण एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा मुळे हे करता येत नाही, अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही. काय सांगता काय राव. आईशप्पथ आम्हाला काहिच माहित नव्हतं.शिवराज पाटिल आणि तुम्ही एका गावचे काय? लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते तो बरा करण्याचं देशी जबरा औशीद हाय आपल्याकडं वेताळ

Appsaheb, there is no comparison between a terrorist and our national heroes. you r insulting our history by comparing them. I am fully agreed with Jainache Kart.

शासनाच्या नाकर्तेपणामुळे व गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे झालेल्या या हल्ल्यानिमित्त तातडीने राज्यसरकारने राजीनामा द्यायला हवा.राज्यात राष्ट्रपती लागवट त्वरीत लागू करायला हवी.

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, दोन अश्रू ढाळी.. आपल्या शहीद पोलिस अधिकार्‍यांना अभिवादन म्हणून एक मेणबत्ती पेटवाल? http://features.ibnlive.in.com/packages/mumbai-attack-light-a-candle.php

नेताजी सुभाष हयात असुन, त्यांचे वास्तव्य कोठे आहे हे नेहरु , शास्त्री , इंदिरा , मोरारजी यांना माहीत होतेच पण ते .... अप्पासाहेबांनी चांजलाच जावईशोध लावला बॉ अन्यथा माजी राष्ट्र्पती कलाम आणि आत्ताच्या प्रतिभाताइ अश्या व्यक्ती तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणार नाहीत. त्यांना गप्प बसावे लागत आहे... आता आप्पासाहेबानी तोंडात मिठाची गुळणी न धरता त्या एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा बद्द्ल लिहवे. जैनाचं कार्ट यांच्याशी सहमत अतिरेकी हे मनोरुग्न असतात मनोरुग्नांना व्याधि अनेक शंकरराव

अगदी बधीर व्हायला झाले आहे... काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन.. परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...

अगदी बधीर व्हायला झाले आहे... काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन.. परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...

मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा खरच जर श्रद्धांजली द्यायची मनापासुन इच्छा असेल तर आपली मन आणि मनगटे पेटवा. उगिच फालतु अमेरिकन नाटक इथे नको. मेणबत्त्या पेटवण्याचा फायदा एकच .त्या मेणबत्तीचे उत्पादन करणार्‍यांचा धंदा तेजीत येतो. "अनामिका"

अनामिका, तुमच्या भावना कळतात, पण म्हणून इतरांच्या भावनांना अमेरिकन नाटक म्हणून कृपया हिणवू नका. :(

यशोधरा इथे कुणाच्या भावना दुखावण्याचा अथवा कुणालाही हिणवण्याचा प्रश्न नाही . श्रद्धांजलीच द्यायची ना तर ती देवापुढे हात जोडुन निर्मळ मनाने देखिल देता येतेच की त्यासाठी मेणबत्त्याच कशाला हव्यात पेटवायला? आयबीएन आल्यापासुन हा तमाशा जास्तच वाढू लागलाय.आज मेणबत्त्या पेटवायच्या आणि उद्या याच शहिदांची नाव आठवण्याचे कष्ट घ्यायचे.आपण सर्वसामान्य फक्त हृदयातुन विचार करतो पण या माध्यमांना आपला टिआरपी वाढवण्याशी मतलब असतो. तुम्ही दुखावला गेला असाल तर क्षमा करा. "अनामिका"

In reply to by अनामिका

सहमत अनामिका ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ