( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला ! तो थोडासा वाटुन घेता यावा म्हणुन इथे प्रकाशित करत आहे परत :) )
**************************************************************
सकाळचे साधारण साडेचार वाजलेत .
"प्रभाते मनी राम चिंतित जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा । सदाचार हां थोर सांडू नये तो । जनी तो ची तो मानवी धन्य होतो ॥".....थंडीने कुडकुडणाऱ्या स्वरात उमटणारे काही श्लोक ...... असपष्ट धूसर सा संधीप्रकाश..आणि काही साखरझोप मोड़णारे गजर..... इतक्यात एक हाक
"जय जय रघुवीर समर्थ "
मग मी -" आज्जी ,चैतन्य आलाय ,आम्ही गडावर चाललोय , परत येवू की नाही माहीत नाही...." आज्जी -"जास्त नाटकं नको .....गडावर रहाणार असल तर फ़ोन करून कळवा " मी -" हां हां हां :D " "जय जय रघुवीर समर्थ " ******************************************************************************** "जय जय रघुवीर समर्थ " "जय जय रघुवीर समर्थ.....प्रसाद, दर वेळी लेट करतोस ...अता चल पटा पट ...नाहीतर प्रातः पूजा चुकेल." "सज्जनगडाचं ना काहीतरी गणितच वेगळ आहे". "काही तरी अनामिक ओढ़ आहे यार..." "हो यार ... अरे कधी तरी यार शिवथर घळित जायच आहे ." " हो. आणि निवांत वेळ काढून एकदा पावस ला जाऊं येवुया " It is the best place for saadhanaa !! अशाच काही तरी गप्पा होत होत आम्ही समर्थ महाद्वारापाशी येतो अन् गप्पांचा ओघ आपोआप थांबतो ...भक्तिभावाने आपोआप मान झुकते . कुठे तरी इतिहासात मन पार डुंबुन जातं..... " इथं समर्थ असतील तेव्हा काय जागा असेल ही !" यावर चैतान्याच उत्तर- "...................................................................." मी -" अरे बोल की " चैतन्य ...कुठेतरी खोल विचारात गढुन गेलेला -" ...............परब्रह्म आदिअंति अनुर्वाच्य ........" मी -" ..............................................." ************************************************************************** ध्यानमंदिर एक प्रकारचा 'गंभीर' अंधार अन् अशात समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघालेली समर्थांची समाधी !! "आता सद्गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शु शकेना । ते स्वरुप मज अज्ञाना । काय कळे ।। श्री राम ।। " तय गंभीर आवाजाने सार वातावरण भारुन टाकलय... "उपमे द्यावा जरी मेरु। तरी तो जड़ पाषाण कठोरु । तैसा नव्हे की सद्गुरु । कोमल दिनांचा ।। श्री राम ।।" हे सगळं इतक भावोत्कट की अंगावर रोमांच उभे राहिलेत ! हां अनुभव ही कसा कधी कोठे विरून जातो लक्षातच येत नाही !! "म्हणोनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेची माझी वर्णना । अंतर्स्थितिचिये खुणा । अंतर्निष्ठ ची जाणती । । श्री राम । ।" एक शब्दातीत शांतता ....एक अनुर्वाच्च आनंद ! ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ *********************************************************************************** मग आम्ही धाब्याच्या मारुती कड़े जातो ... समोर पसरलेला उरमोडीचा जलाशय . इथे का कोणास ठावुक पण मन पार अंतर्मग्न होता . बोलावासचाच वाटत नाही.....मगाचचे सद्गुरुस्तवनातले श्लोक मनात रेंगाळत रहातात .... समोर पसरलेल्या निळ्याशार जलाशयाकड़े बघत कधी भावसमाधि लागते कळतच नाही.... पण मग थोड्यावेळाने पोटातले कावळे कावकाव करायला लागले की आपोआप सामाधी मोडते.... मग भोजनप्रसादगृहात भोजनबंधुंच्या भाऊगर्दीत प्रसाद घेताना लक्षात येत की गडाच्या महाद्वाराशेजारी असं का लिहिलय..... "तू विवंचना मुक्त होण्याचे स्थान आहेस ....पण ....पुन्हा तूच विवंचना युक्त आहेस !!!!!" असो ! इतकंच बोलून सगळेच भक्त त्या विवंचना विसरून जातात ...आणि त्या सगळ्याच भक्तातले आम्हीही एक असतो! मग सरळ आम्ही श्रीधर कुटीत जातो ..... श्रीधर स्वामींच्या विचाराने आणखीनंच कसंसं होतं . " चैतन्य ,आपण असं ,श्रीधर स्वामींसारखं का नाही रे करू शकत ?" " तेवढी पुण्याई अजुन जमली नाही मित्रा !अजुन खूप लहान आहोत रे ! पण तुझं ही खरं आहे रे .... अजुन कित्ती दिवस दूर रहायचं बाप्पापासून ? अजुन कित्ती दिवस ? सद्गुरु सद्गुरु .......? " सद्गुरु विण जन्म निर्फळ। सद्गुरुविण दू:ख सकळ। सद्गुरु विण तळमळ। जाणार नाही ॥ श्रीराम॥ मग पुन्हा एकदा तीच गंभीर शांतता मनाला भारुन टाकते. पण मनात कुठेतरी खोलवर चालु असलेली विचारांची द्वंद्व चालूच रहातात . मग आम्ही दोघे ठार मुक्यासारखे चुपचाप गड उतरु लागतो . *********************************************************************************** संध्याकाळी घरी पोहचतो तेव्हा तस्साच तो संधीप्रकाश पुन्हा भरून राहिलेला असतो. आज्जी -" आलात का महाराज ! काय खायला काही पोहे ,उप्पीट करू ?" मी न कळत काही तरी उत्तर देवून जातो ! माझ्या ही लक्षात येत नाही ! आज्जी देवा पुढे दिवा लावते ...मग स्वयंपाक घरात जाते .... कंद्यापोह्याच्या वासाने पोटातले कावळे परत जागे होतात . आज्जी काहीतरी गुणगुणत पोहे आणून देते . आज्जी चे गुणगुणणारे शब्द स्पष्ट होता जातात ......"कल्याण करी रामराया । देवराया ,कल्याण करी रामराया ॥ जनहित विवरी ,कल्याण करी रामराया ॥ "************************************************************************************ ( अवांतर : सज्जनगड ! मनाच्या कोपर्यात कोठेतरी घर करुन बसलेला ! आज कोठुन तरी ह्याने डोके वर काढले . अन आठवणींचे मोरपीस कोणीतरी अलगद हातावरुन फिरवावे तसे काहीसे झाले ! असेच आमच्या बालपणीच्या मित्राविषयी - अजिंक्यतार्याविषयी - कधीतरी निवांतपणे - आठवणींना मोरपीस सापडल्यावर :) ) ( अन्यत्र अन्य नामाभिधानांनी पुर्वप्रकाशित )
वाचने
14769
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
सज्जनगडावर जेमतेम ३-४ वेळा
अशाच आमच्या आठवणी लोहगडाशी
छान आहे लिहिलेले..
In reply to अशाच आमच्या आठवणी लोहगडाशी by प्रचेतस
छान लेख.
In reply to छान आहे लिहिलेले.. by गणेशा
सुरेख लिहिलंय
पुरवणी
In reply to सुरेख लिहिलंय by पैसा
होय ;)
In reply to पुरवणी by पैसा
अर्रर्र! असे होते होय! :(
In reply to होय ;) by प्रसाद गोडबोले
गैरसमज नसावा यशोधरातै ! :)
In reply to अर्रर्र! असे होते होय! :( by यशोधरा
सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि ||
सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि
In reply to गैरसमज नसावा यशोधरातै ! :) by प्रसाद गोडबोले
+१११११११११११
In reply to गैरसमज नसावा यशोधरातै ! :) by प्रसाद गोडबोले
फिर --
In reply to +१११११११११११ by बॅटमॅन
भावनाओं को समझो.
In reply to फिर -- by नाखु
असां काय नाय ओ!
In reply to फिर -- by नाखु
पोहोचले
In reply to असां काय नाय ओ! by पैसा
+१
In reply to गैरसमज नसावा यशोधरातै ! :) by प्रसाद गोडबोले
@ प्रगो
In reply to +१ by नीलमोहर
छान
सुरेख. सज्जनगडावर जायचे आहे,
सुरेख
सज्जनगड नि शिवथरघळ ही खरंच
रडवू नकोस
हृद्य आठवण.
In reply to रडवू नकोस by नाखु
सुरेख
लेख आवडला. सज्जनगडावर मीही ३
लेख आवडला. मी सज्जनगडावर
भावनाबंबाळ गोग्गो लिखाण असा
सज्जनगडच्या वातावरणायेवढीच ओढ
गव्हाची खीर ना हो?
In reply to सज्जनगडच्या वातावरणायेवढीच ओढ by गिरकी
येस्स
In reply to गव्हाची खीर ना हो? by बॅटमॅन
+११११११११
In reply to येस्स by प्रसाद गोडबोले
ताक मात्र अगदीच फुळकवणी होते.
In reply to +११११११११ by बॅटमॅन
हो ते ताक म्हणजे ताक फ्लेवर्ड
In reply to ताक मात्र अगदीच फुळकवणी होते. by प्रचेतस
नक्कीच. प्लान मुक्कामीच आहे
In reply to हो ते ताक म्हणजे ताक फ्लेवर्ड by प्रसाद गोडबोले
कधी बे?
In reply to नक्कीच. प्लान मुक्कामीच आहे by प्रचेतस
पावसाळ्यात. असणार आहेस का?
In reply to कधी बे? by लॉरी टांगटूंगकर
मी मागच्या पावसाळ्यापासून हा
In reply to पावसाळ्यात. असणार आहेस का? by प्रचेतस
पण ह्या पावसाळ्यात नक्की आहे
In reply to मी मागच्या पावसाळ्यापासून हा by सस्नेह
व्वा.. मस्त प्लॅन
In reply to पण ह्या पावसाळ्यात नक्की आहे by प्रसाद गोडबोले
हो. लिंबची विहीर राहिलीच.
In reply to व्वा.. मस्त प्लॅन by स्वच्छंदी_मनोज
तारखा सान्गणे. येतो.
In reply to हो. लिंबची विहीर राहिलीच. by प्रचेतस
श्रीमंत, यावेळी आम्हाला पण
In reply to नक्कीच. प्लान मुक्कामीच आहे by प्रचेतस
नोटेड .
In reply to श्रीमंत, यावेळी आम्हाला पण by विशाल कुलकर्णी
ठरवा
In reply to नोटेड . by प्रसाद गोडबोले
:)
In reply to ठरवा by नाखु
सहमत. रादर त्याचमुळे आठवल्या
In reply to ताक मात्र अगदीच फुळकवणी होते. by प्रचेतस
छान मुक्तक !
सहमत ..
In reply to छान मुक्तक ! by सस्नेह
औदुंबरही. पलिकडील देवीचे
In reply to छान मुक्तक ! by सस्नेह
गोग्गोड लेखनाचा पुरावा की
म्हणजे ?
In reply to गोग्गोड लेखनाचा पुरावा की by सूड
जियो यार... , कसलं ओघवतं
जमून आलेला लेख.
छान अनुभव.आणि नाद खुळाचा
कास पठार ठोसेघर करून दुपारी
जय जय रघुवीर समर्थ
खरडफळ्यावरून-
लेख आवडला...
माझी अशी जागा - कमळगड