Skip to main content

मिसळ पाव - श्री गणेशा!

लेखक हर्षल पतिंगे यांनी गुरुवार, 21/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रमंडळी, बरेच वर्षापासून विचार करत होतो की 'मिसळ पाव' खायला सुरुवात करुयात ; पण काही करून योग येईना. बरेच जण म्हणतात की योग हा येत नसतो, तो आणायचा असतो. येत नसेल तर त्याचा येण्या-जाण्याचा खर्च उचलायची तयारी दाखवावी लागते असं म्हणतात. तर मी ही तयारी दखवल्यावर योग तर एका पायावर तयार झाला येण्यासाठी. नशीब! (जाऊ दे सध्याच नशीबा बद्दल नको बोलायला. लवकर रुसायची सवय आहे म्हणतात त्याला) तस तर वेबसाईटच्या वरच्या कोपर्यातलं नुसतं चित्र बघायलाही भेटं देणं मला वावगं वाटणार नाही; पण त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच. असो. मी इथे माझी मिसळ वाढत जाईन; तुमची रसिकता 'पाव'ली कि मेजवानी झालीच म्हणून समजावी. (ह्या वेबसाईट वर मस्तपैकी मिसळ कोण बनवतं ते पण सांगा. मी पण तिथे हजेरी लावतो मग.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5623
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

मिपावर नक्की नविन का? पुढील शब्दांचे अर्थ सांगा,अनर्थ करायला मिपाकर समर्थ अाहेतच!!! पुलेशु रच्याकने पुभालटा टेम्पोत बसवणे सध्या हा बालवर्गाचा अभ्यास करुन ठेवा!

In reply to by अजया

खरच नवीन आहे मिपा वर. वर लिहिलेल्यापैकी एकाचाही अर्थ मला माहीत नाही. ह्याची शिकवणी कुठुन मिळेल? :) इथे तर प्रतिक्रियांचिच मिसळ झलेली दिसतेय.

In reply to by नाखु

काही सान्गता येणार नाही अश कारणांमुळे तुर्तास (आणि त्यानंतरही ) आम्ही मिपावर थंड घेत आहोत .... नाहीतर लेखच पाडला असता आयडींच्या गुणविशेषम्ना सकट ;) =)) !! आता आम्ही आमचा सारा टवाळपणा , मजेशीरपणा , स्पष्टवक्तेपणा बाजुला ठेवुन फक्त भावना बंबाळ लेखन करायचे ठरवले आहे :-|

In reply to by टवाळ कार्टा

मी पाहिलेला "गिरिजाकाका" हा नाहीच, कधीपण प्रतीसाद्-फुलांची अपेक्षा न ठेवणारा होता तो. तुझ्याकडून भावनाप्रधान पेक्षा भावना प्रधान (दोन्ही वेगळे शब्दच अर्थासहीत) लेखाची अपेक्षा असलेला जुन्या सुकांता-व्रुत्तांताचा वाचक. नाखु

In reply to by प्रसाद गोडबोले

मंगला गोडबोलेकाकूंना पण अ‍ॅड करा. भरीताची रेसिपी सांगताना त्या एकदा "अशी बरं का, अगदी 'स्नेहाळ' वांगी घ्यायची" म्हणाल्या होत्या. =))

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे तुमचे आणि इतर नवमिपाकरांचे स्वागत... :) तुमचे अनुभव विश्व आम्हा सर्वांसाठी खुले करा आणि बिनधास्त लिहा... :) @ प्रगोशी सहमत... अरे स्वसंपादनाची सोय काय को काढली रे बाबा ! संपादकांना अजुन किती छळणार आम्ही ? ही सोय परत देण्यात यावी यासाठी आता काय वेगळे करायचे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift

(ह्या वेबसाईट वर मस्तपैकी मिसळ कोण बनवतं ते पण सांगा. मी पण तिथे हजेरी लावतो मग.) ईथे न्,ना, नि, नी, ने सिरीज्वाले मिसळ बनवत्तात अशी माहिती आहे. विचारुन बघा.

मिसळीची माहिती हवीय,इथले नमुने बघायचे मग या मिसळपावचा पुराणपुरुष विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर सध्या थोबाडपुस्तकावर्/फेसबुकवर शिळोप्याची ओसरीत बसलेला असतो तिथे भेट त्याला,तुला बरच काही कळेल.