मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा.
१९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो.
रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी.
मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.)
यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो.
कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते.
आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा.
आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत.
१ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्..
२ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे.
३ एकाचा टोन बदलल्यावर .....
मित्रहो....
या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस.
जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा.
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस.
शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे....
शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे...
स्पर्धेसाठी शुभेच्छा !
जयंत कुलकर्णी
संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
87757
प्रतिक्रिया
146
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाट बघत होतो...
In reply to श्री. चिंटू, by जयंत कुलकर्णी
घारापुरी ला मिपा करांसोबत फिर्तेवेळी फोर्ट ला काढलाय
श्री सौरभ,
In reply to घारापुरी ला मिपा करांसोबत फिर्तेवेळी फोर्ट ला काढलाय by सौरभ उप्स
धन्यवाद,
In reply to श्री सौरभ, by जयंत कुलकर्णी
ग णप ती बा प्पा मोरया...

{बाप्पाचा फोटो स्पर्धेसाठी घ्यावा.}
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः मदनबाण.....आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)
माझ्या मते देवीचा फोटो
In reply to ग णप ती बा प्पा मोरया... by मदनबाण
सहमत..
In reply to माझ्या मते देवीचा फोटो by पॉइंट ब्लँक
+१
In reply to सहमत.. by रुपी
@पॉइंट ब्लँक, रुपी आणि एक्का
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingश्री. मदनबाण,
In reply to ग णप ती बा प्पा मोरया... by मदनबाण
लूव्र संग्रहालयातील एक शिल्प
:/
In reply to लूव्र संग्रहालयातील एक शिल्प by चित्रगुप्त
आवडले ना
In reply to :/ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्री. चित्रगुप्त,
In reply to लूव्र संग्रहालयातील एक शिल्प by चित्रगुप्त
ऊन पावसाचा खेळ...
मस्त!
In reply to ऊन पावसाचा खेळ... by अभिदेश
तुंग किल्ला आहे ना तो ..
In reply to ऊन पावसाचा खेळ... by अभिदेश
श्री. अभिदेश,
In reply to ऊन पावसाचा खेळ... by अभिदेश
मी काढलेले काही फोटो.
अस्वलाने मागच्या स्पर्धेत
In reply to मी काढलेले काही फोटो. by आसिफ
.
In reply to अस्वलाने मागच्या स्पर्धेत by वेल्लाभट
श्री. असिफ,
In reply to मी काढलेले काही फोटो. by आसिफ
हर्णे बंदर आणि सुवर्णदुर्ग किल्ला
फारच आवडले सगळे फोटो
या फोटोत ओढ लावण्यासारखं
In reply to फारच आवडले सगळे फोटो by ज्ञानोबाचे पैजार
खूप छान विषय!
व्वा !
In reply to खूप छान विषय! by शब्दबम्बाळ
श्री. शब्दबंबाळ,
In reply to खूप छान विषय! by शब्दबम्बाळ
आपल्या परिक्षणाबद्दल धन्यवाद! :)
In reply to श्री. शब्दबंबाळ, by जयंत कुलकर्णी
........
अंधा काणूण..
silhouette च्या
In reply to अंधा काणूण.. by यसवायजी
सेंट मेरी कॅथेड्रल, पर्थ (स्पर्धेसाठी)
श्री विशाल,
In reply to सेंट मेरी कॅथेड्रल, पर्थ (स्पर्धेसाठी) by विशाल कुलकर्णी
कात्रज दरीपूल (स्पर्धेसाठी नाही)
सर्वच फोटो खास आहेत. मला
माझा फोटो स्पर्धेसाठी.
सनईचौघडा,
In reply to माझा फोटो स्पर्धेसाठी. by सनईचौघडा
जयंत, चांगली माहिती दिली आहे.
श्री पॉईंट ब्लँक,
In reply to जयंत, चांगली माहिती दिली आहे. by पॉइंट ब्लँक
सर्वच फोटो क्लास.
माझीही प्रवेशिका
श्री. मोहन,
In reply to माझीही प्रवेशिका by मोहन
धन्यवाद जयंत.
In reply to श्री. मोहन, by जयंत कुलकर्णी
माझी प्रवेशिका
सानिका,
In reply to माझी प्रवेशिका by सानिकास्वप्निल
माझाही एक..... अर्थात
माझी प्रवेशिका
अजून काही
उघडा दरवाजा
माझेही काही क्लिक्स.
मुंबई मस्तच
In reply to माझेही काही क्लिक्स. by संदीप डांगे
स्पर्धेसाठीचा फोटो एक नंबर !!
In reply to माझेही काही क्लिक्स. by संदीप डांगे
संदीपभाऊ, एकाहून एक सुंदर
In reply to माझेही काही क्लिक्स. by संदीप डांगे
धन्यवाद!
In reply to संदीपभाऊ, एकाहून एक सुंदर by विशाल कुलकर्णी
मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो
In reply to माझेही काही क्लिक्स. by संदीप डांगे
योग्य अभ्यास आणि
In reply to मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो by जयंत कुलकर्णी
मस्त फोटो
छान चित्रं !
नमस्कार
श्री. सनईचौघडा,
In reply to नमस्कार by सनईचौघडा
माझी प्रवेशिका
श्री. फडके,
In reply to माझी प्रवेशिका by anandphadke
आणि ती सुद्धा लगेचच कारण ती
In reply to श्री. फडके, by जयंत कुलकर्णी
सर्वच मस्त..
माझी प्रवेशिका.
काही फोटो
स्केल
In reply to काही फोटो by मैत्र
उस्तादजी
In reply to स्केल by मैत्र
वेनिस येथील मास्क