Skip to main content

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 06/05/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो. Simple, Free Image and File Hosting at MediaFire रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.) Simple, Free Image and File Hosting at MediaFire यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो. कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्‍या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते. आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत. १ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire २ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire ३ एकाचा टोन बदलल्यावर ..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो.... या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस. जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा. पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस. शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे... स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जयंत कुलकर्णी संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 87757
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by जयंत कुलकर्णी

खरं तर ह्या समीक्षक परि़क्षणाचीच वाट बघत होतो... चुका समजल्या, पुढच्यावेळीस लक्षात ठेवेन.

In reply to by सौरभ उप्स

श्री सौरभ, आकाशामुळे चित्राची रया गेली. जर आकाश एवढे ब्लँड असेल तर तो फोटो स्पर्धेला देऊ नये. तसेच जर नीट पाहिलेत तर सगळ्या कडांच्या बाजूला हॅलोज आले आहेत..ते टाळायला हवेत.

{बाप्पाचा फोटो स्पर्धेसाठी घ्यावा.}

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)


In reply to by मदनबाण

माझ्या मते देवीचा फोटो स्पर्धेसाठी द्यायाला हवा होता. कॉम्पोझिशन आणि सौम्य प्रकाश दोन्ही एकदम छान जुळून आले आहेत. गणपतीच्या फोटोत एकतर फार वस्तुंची गर्दी झाली आहे आणि फोटो थोडासा ओवर एक्सपोझड वाटतो आहे.

In reply to by रुपी

+१

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@पॉइंट ब्लँक, रुपी आणि एक्का काका... आता काय कराव ? बाप्पाच नाव पुढे केल्यावर आता देवीला पुढे कसं कराव ? :) असो... तुमच मत / दॄष्टीकोन पटला. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by मदनबाण

श्री. मदनबाण, कोणीतरी म्हटल्याप्रमाणे देवीचा फोटो द्यायला हवा होता. तो दिला आहे असे गृहीत धरले तरीही हा टोन या फोटोसाठी चुकीचा वापरला आहे असे वाटते. खरे तर हा टोन त्या लॅप व फोनच्या फोटोसाठी योग्य वाटला असता आणि या फोटोला ब्लॅक & व्हाईट. सेपिया वापरायचा असला तरी डार्क सेपिया वापरु नये या मताचा मी आहे....

लूव्र संग्रहालयातील एक शिल्प: . या देवी सर्वभूतेषु सौंदर्यरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः (वरील फोटो स्पर्धेसाठी आहे). आणखी एक फोटो: फॉन्तेन्ब्लो राजप्रासाद, फ्रान्स. .

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशीच शिल्प सापडतात का ?
आम्हाला खूप काही काही सापडते हो, पण खरे सांगा, आवडले ना हे शिल्प ?

In reply to by चित्रगुप्त

श्री. चित्रगुप्त, कुठल्याही फोटोग्राफीच्या स्पर्धेत शक्यतो दुसर्‍या एखाद्या कलाकृतीच्या फोटोला शक्यतो बक्षिस मिळत नाही.....पण फोटो मस्तच......

In reply to by अभिदेश

श्री. अभिदेश, अभिनंदन ! मस्तच फोटो. या प्रकाशात तुम्हाला अजून काही करता आले असते असे वाटत नाही...चांगला प्रयत्न.

In reply to by आसिफ

श्री. असिफ, रुळातून त्या डाविकडच्या गाड्या लक्ष दिस्टर्ब करत आहेत. त्या जर काढल्या असत्या तर फोटो चांगलाच होता....

खूप छान विषय! आणि सगळ्यांचेच सुंदर फोटो स्पर्धेसाठी फोटो Lion इतर काही फोटो पण चिटकवतो! :) व्हेनिस Leaving neuschwanstein castle Castle मेणवली Menwali इतर Black Rose

In reply to by शब्दबम्बाळ

श्री. शब्दबंबाळ, खरे तर व्हेनिसचा पहिला फोटो खूपच चांगला होता. मे जे टोन्सबद्दल लिहिले आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. जरी रं हिरवाच असला तेरीही दोन्हीचे टोन वेगळे असल्यामुळे याचा ब्लॅक & व्हाईट खूपच चांगला दिसला असता. फक्त थोडासा क्रॉप करावा लागला असता उदा.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire अर्थात हे तुम्हाला आवडायला फिजे असे मुळीच नाही. पण एवढे क्रॉप करायचे असतील तर फोटो जास्त मेगापिक्सेलचे लागतील किंवा तसेच काढावे लागतील.

In reply to by जयंत कुलकर्णी

आपल्या परिक्षणाबद्दल धन्यवाद! :) खर तर व्हेनिसचा फोटो माझा आवडता आहे. त्यातल्या रंगाच्या शेडशिवाय ते घराचे अर्धवट उघडे दार, खाली मध्यभागी दिसणाऱ्या पायर्या आणि जणू खाली मान घालून यापासून दूर निघालेली ती… असा काही माहौल वाटतो मला तो! :) पण ५ मेगा पिक्सेल च्या केमेर्याने काढलेला असल्याने डिटेल फारशी दिसत नाहीत म्हणून स्पर्धेला देणे टाळले!

हा स्पर्धेसाठी नाही 1

In reply to by यसवायजी

silhouette च्या फोटोग्राफीसाठी एजेस शार्प व बेकग्राऊंड खूपच ब्राईट असावी लागते.

In reply to by विशाल कुलकर्णी

श्री विशाल, मला खरे तर पुलाचा फोटोचे कंपोझिशन जास्त आवडले होते. वरील फोटोत फोटोशॉपमधे लेन्स करेक्शन जर केले असते तर फोटो अजून मस्त झाला असता. फिल्टर-लेन्स करेक्शन-कस्टम...

In reply to by पॉइंट ब्लँक

श्री पॉईंट ब्लँक, फोटो चांगला आहे पण मला वाटते की डावीकडील बाजूमधे थोडेसे डिटेल दिसायला पाहिजे होते. जरा करुन बघता का ?

क्रमांक काढणे म्हणजे कोणावर तरी अन्याय. माझ्या वतीने सर्वांना विजेते घोषित करतो. :) -दिलीप बिरुटे

फिरतीची नोकरीचा एक फायदा असतो . असे अनेक क्षण अनुभवायला मिळतात. हा सुर्योदय परादीप - ओडीशा तला paradeep

In reply to by मोहन

श्री. मोहन, रुल ऑफ ३ जर वापरला असता तर हा फोटू निश्चितच चांगला दिसला असता. म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेलच.

In reply to by सानिकास्वप्निल

सानिका, दिव्याच्या मधल्या काडीवर/पत्र्यावर ते धुरकट काय आले आहे ? त्यामुळे फोटोची मजा गेली. ते तुम्हाला फोटोशॉपमधे काळे करता येते का बघा. करुन तर बघा.....

@स्पा: उघड्या दरवाजाच्या फोटोतून अचानक कुठल्या कुठे पोचवलेत राव, व्वा.

In reply to by संदीप डांगे

मुंबई मॉर्निंगचा पहिला फोटो छान आहे... आणि मुख्य म्हणजे अक्षरांचा नियम तोडल्यावर तो अधिकच चांगला दिसत आहे. एखाद्या पुस्तकाचे मुखपृस्ट म्हणून सहज खपेल.... पण स्पर्धेला दिलेला फोटो निर्जीव वाटतो. पुढून काढला असता तर कदाचित चेहर्‍यावरील भावाने जिवंत झाला असता......असे माझे वाटते. तुम्हाला व इतरांना वेगळे वाटू शकते हे कृपया ध्यानात घ्या....

In reply to by जयंत कुलकर्णी

योग्य अभ्यास आणि परिक्षणाबद्दल शतशः धन्यवाद! कलेच्या बाबतीत प्रत्येकाचं मत भिन्न असू शकतं. तुमच्या परिक्षणातून एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याची नवी दृष्टी, नवा पैलू मिळत आहे. ते जास्त महत्त्वाचे आहे. कलाकृतीच्या बाबतीत चांगलं वाईट, उत्तम-निकृष्ट असंही काही नसतं हे एक कलाकार म्हणून माहित आहेच.

मस्त फोटो. गोट्याने आपली जागा पक्की केली आहे.

छान चित्रं ! यावेळी भाग न घेता फक्त एन्जॉय करणार आहे. क्रम लावणं हे स्पर्धेत भाग घेण्याहुन अवघड आहे... मतदानासाठी क्रमवारी ठरवत आहे..! :)

माझा फोटो स्पर्धेसाठी. 1

In reply to by सनईचौघडा

श्री. सनईचौघडा, स्पर्धेसाठी जरा जास्त कष्ट घेऊन फोटो काधावेत ही विनंती. रेकॉर्ड फोटोला शक्यतो बक्षिस मिळत नाही आणि पुढच्या वेळेला तुम्हाला ते मिळावे अशी इच्छा आहे......... :-)

In reply to by anandphadke

श्री. फडके, फोटो चांगलाच आहे. फांद्यांवरचे डिटेल्स व पिसांचे डिटेल्सही चांगले आले आहेत. पण...... चोच नजरेला फोटोच्या बाहेर घेऊन जाते आहे. तुमच्याकडे याचाच एखादा दुसरा फोटो असेल तर बघा....

उस्ताद अब्दुल रशीद खान साहब Ustad Abdul Rashid Khan गोटीपुआ कलाकार - समर्पण Gotipua 1 गोटीपुआ कलाकार - एकाग्रता Gotipua 2 उंची आणि सावल्या Shadows नभ उतरू आलं Dark clouds शिशिराची उदासी Winter स्पर्धेसाठी कुठला द्यावा यावर काही मदत हवी आहे.. उस्तादजी का शिशिर ..

In reply to by मैत्र

इथे देताना स्केलची गोची झाली आहे त्यामुळे काही फोटो compress तर काही stretch झाले आहेत. क्रॉप केलेल्या फोटो मध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे..