Skip to main content

मनात माझ्या

लेखक विदेश यांनी शनिवार, 23/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सखे घेतला हात तुझा हाती जेव्हा माझ्या वाटुन गेले जग मी जिंकले मनात माझ्या .. फुटू लागला प्रीतीचा अंकुर हृदयामधुनी होता पहिली नजरानजर वाटे मनात माझ्या .. आकाशाचे मीलन धरतीवर होई जेथे क्षितिजावर मी रंग उधळले मनात माझ्या .. फिरू लागलो जोडीने त्या उद्यानामधुनी उमलु लागली डोलु लागली फुले मनात माझ्या .. झाडाखाली विश्व विसरलो उन्हात जेव्हा सखये किती बरसला अवचित पाऊस मनात माझ्या .. आपण दोघे चांदण्यात त्या निवांत न्हात होतो चंद्रालाही खूप खिजवले दुरुनी मनात माझ्या .. जन्म हा केवळ दोघांचा सातही जन्म असावा मिळुनी घ्यावी शपथ दोघांनी आले मनात माझ्या .. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1045
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान आहे कविता!

पैसा .. आभारी आहे.