✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 05/26/2015 - 21:25  ·  लेख
लेख
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे. हा पक्षी तारेवर आला तो नेमका प्रकाश विरुद्ध बाजुने येत असताना. मळभ आले होते, थेट सूर्य नव्हता पण प्रकाश लक्ष्याच्या पलिकडुन असल्याने मनासारखा टिपता आला नाही. दुसर्‍यांदा आला तेव्हा कॅमेरा सरसावेपर्यंत महाशय गायब. सबब फोटो केवळ पक्षी ओळखण्या इअतपतच आले आहेत. मात्र पक्षी भक्ष्य खाताना टिपायला मिळाला, मजा आली. गेल्या चार पाच महिन्यात याचे दर्शन नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10

Book traversal links for ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

  • ‹ स्वच्छंद - ३
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
राहती जागा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9144 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

बी ईटर म्हणजे वेडा राघू.

प्रचेतस
Tue, 05/26/2015 - 21:28 नवीन
बी ईटर म्हणजे वेडा राघू. फोटो छान आलेत.
  • Log in or register to post comments

+१ वेडा राघू

मैत्र
Tue, 05/26/2015 - 22:38 नवीन
+१ वेडा राघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान आहेत फोटोज :)

सानिकास्वप्निल
Tue, 05/26/2015 - 21:39 नवीन
छान आहेत फोटोज :)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
Tue, 05/26/2015 - 22:11 नवीन
असले एक मूठभर महाशय हल्ली आमच्या घरासमोर बसलेले असतात. परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली, तेव्हा हा येऊन एकेक झुरळ घेऊन जात होता! मात्र एकच दिसतो नेहमी. त्याचं घर किंवा जोडीदार कुठे आहे काही कळलं नाही.
  • Log in or register to post comments

घटस्फोटित असू शकतो

श्रीरंग_जोशी
Tue, 05/26/2015 - 22:22 नवीन
तुम्ही म्हणताय तो पक्षी कदाचित घटस्फोटित असू शकतो. मूळ धाग्यातले पक्षी आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाय नाय!

पैसा
Wed, 05/27/2015 - 09:41 नवीन
आज त्याचा जरा डार्क जोडीदार पण आला होता. मधेच मातीत जाऊन बसले होते जमिनीवर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

परवा एकदा बरेच दिवस बंद

टवाळ कार्टा
Wed, 05/27/2015 - 11:21 नवीन
परवा एकदा बरेच दिवस बंद असलेल्या कपाटात सापडलेल्या डब्यातली बारीक झुरळे बाल्कनीत नेऊन ओतली
तुम्ही झुरळे बाटलीत जमा करून ठेवता? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो तर!

पैसा
Wed, 05/27/2015 - 11:33 नवीन
काही खास मिपाकर घरी आले तर पूस्प्गूचाऐवजी त्यांना द्यायला ठेवली आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...नक्की का? नैतर

टवाळ कार्टा
Wed, 05/27/2015 - 15:19 नवीन
खिक्क...नक्की का? नैतर काजूच्या पाकिटात बांधून पाठवाल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुंदर फोटो

सौन्दर्य
Wed, 05/27/2015 - 00:29 नवीन
फोटो मस्तच आहेत.
  • Log in or register to post comments

त्याचा चोची चा काळा रंग

चैत्रबन
Wed, 05/27/2015 - 01:56 नवीन
आणि डोळ्यांवरुन असलेला काळा पट्टा फार आवडला...
  • Log in or register to post comments

खूप छान आलेत फोटो. यांची घरे

कंजूस
Wed, 05/27/2015 - 05:53 नवीन
खूप छान आलेत फोटो. यांची घरे मुंब्राच्या खाडीपरिसरात चिखलात आहेत .मधमाशांचे कर्दनकाळ.बिचाय्रा मध गोळा करायला जातात परत येण्याची ग्यारंटी पसते. तुंगारेश्वर जाण्याचं काही ठरलं का?
  • Log in or register to post comments

मी जाउन आलोय तुंगारेश्वरला.

खटपट्या
Wed, 05/27/2015 - 06:43 नवीन
मी जाउन आलोय तुंगारेश्वरला. खूप छान जागा आहे पण चालावे खूप लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान फोटो... :)

मदनबाण
Wed, 05/27/2015 - 06:39 नवीन
छान फोटो... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel
  • Log in or register to post comments

वेडा राघू

यशोधरा
Wed, 05/27/2015 - 09:20 नवीन
ह्याचे मराठी नाव वेडा राघू अहे बहुतेक
  • Log in or register to post comments

फोटो मस्तच आहेत.

पाटील हो
Wed, 05/27/2015 - 09:33 नवीन
फोटो मस्तच आहेत.
  • Log in or register to post comments

blue tailed bee eater

अनुप कुलकर्णी
Wed, 05/27/2015 - 11:35 नवीन
blue tailed bee eater
  • Log in or register to post comments

हा वेडा राघू आहे. याच्या

श्रीगुरुजी
Wed, 05/27/2015 - 15:50 नवीन
हा वेडा राघू आहे. याच्या शेपटीला तारेसारखी १ किंवा २ टोके असतात.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो.

नूतन सावंत
गुरुवार, 05/28/2015 - 10:51 नवीन
सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा