Skip to main content

आजारपण

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजारपण रुसलेत शब्द आज माझे लाडक्या माझ्या लेखणी वर, आहे त्रस्त आजारात म्हणूनी उमटली नाही कविता कागदावर ! तयार झाल्या मनात रचना शब्दांत मांडता आल्या नाही, रूग्णालयी उपचार घेता घेता कागदावर टिपता आल्या नाही ! होते भयाण चार दिवस ते गेली थकून माझी भार्या, पैसा वेळ झाला खर्ची झाली दुबळी माझी काया ! नको रे, आजारपण देऊ कोणा ताळमेळ सारा बिघडून जातो, गेलेल्या वेळेची करता भरपाई पुन्हा येथे जीव थकुन जातो ! यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४
लेखनविषय:

वाचने 2050
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

हं २

यल्लाप्पा येवु द्या. माझ्याकडे भरपुर "हं" तयार आहेत. उगाच वाया जातिल.

In reply to by यल्लप्पा सट्वज…

ह बघून मस्त वाटले.... इथे बिंधास्त लिहा.... थोडी-फार (कधी-कधी जरा जास्तच) मस्करी होणारच. (विशेषतः नव्या सदस्यांबाबत). पण मन मोठे करा. कदाचित तुम्हाला पण मिपा आवडेल...