04 मार्च 2015 रोजी दिवसांतर्गत 9119 ह्या आपल्या सर्वाकलीन सर्वोच्च पातळीवर गेलेला आपल्या शेअरबाजाराचा निर्देशांक नंतरच्या काळांत मात्र घसरु लागला आणि गेल्या महिनाभरापासुन (15 एप्रिल) ह्या घरसणीने अधिक तीव्र स्वरुप घारण केले आहे. कालची बंद पातळी गेल्या अदमासे 04 महिन्यांतील नीच्चांकी पातळी आहे.
एखादा मोठा भुकंप होवुन गेल्यानंतर तसा भुकंप घडविण्यासाठी कारणीभुत ठरणारा दाब वा Energy पुन्हा लगे्च निर्माण होणे शक्य नसल्याने जरी छोटे धक्के (after shocks) परत परत जाणवले, तरी पहिल्यासारख्या मोठ्या धक्क्यांची पुनरुक्ती होण्याची शक्यता खुप कमी असते असे कोठेसे वाचले होते. (चु.भु.द्या.घ्या.) मात्र बाजारांतील 'भुकंपाच्या' बाबतीत नेमकी याच्या उलट स्थिती दिसते. एक मोठी पडझड बाजारांत मंदीची नवीन आवर्तने सुरु करते असे नेहमी पहायला मिळते. बाजाराची ही मानसिकता 'COCKROACH THEORY' या नावाने ओळखली जाते. ज्याप्रमाणे आपल्याला घरांत दिसणारे एखादेच झुरळ तेशी अनेक झुरळे आजुबाजुला नक्की असल्याची कल्पना देते, तसेच बाजारांत (अर्थातच अचानक) झालेली अशी घसरगुंडी पुढे आणखी वाईट बातम्यांचे ताट वाढुन ठेवले आहे याची खुणगाठ असते....When there is a bad news to the public, there may be many more related negative events that have yet to be revealed.
याचेच प्रत्यंतर म्हणुन की काय, सर्वोच्च पातळी गाठल्यापासुन सुरु झालेल्या घसरणीचा तपशील पाहिला तर त्यापासुन आजपर्यंत झालेल्या 42 सत्रांतील 09 वेळा बाजार एकाच दिवशी 01 टक्यापेक्षा अधिक प्रमाणांत (म्हणजेच 09 वेळा जवळ जवळ 100 अंकांनी) पडला आहे. गाठलेल्या शिखरापासुन तो 10% खाली आला आहे. सहाजिकच आता पुढे काय?? ह्या महिनाभराच्या कालावधीतील 09 वेळा झालेल्या 'सफाई' कारवाईतुन 'झुरळां'चा सफाया झाला असेल की नाही?? हा नेहमीचाच प्रश्न आहेच.
"थांबा, Don’t try to catch a falling knife.." असे कोणीसे म्हटले आहे, असे कोणी मंदीवाले म्हणणार असतील.. तर त्याला उत्तर म्हणुन बॅरॉन रॉथशिल्ड यांचे तितकेच सुप्रसिद्ध 'Buy, when there’s blood in the streets.' हे वाक्य तेजीवाल्यांच्या दिमतीला आहेच. थोडक्यात काय, स्व. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे 'एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे! हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?'..अशी स्थिती आहे.
मान्सुन बाबतचे प्रतिकुल अंदाज, निर्देशांकातील कंपन्यांचे अपेक्षाभंग करणारे निकाल,विदेशी गुंतवणुकीवरील टॅक्स बाबत घेतलेले निर्णय असे घटक या मंदीला कारणीभुत आहेत वगैरे कारणांची जंत्री मांडुन मुलभुत विष्लेषण (Fundamental Analysis) कराण्याचा मानस होता पण सकाळीच ऑफिसात आलेल्या आलेल्या एका क्लायंट्ने 'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....' अशी विचारमौक्तिके मला ऐकवल्याचा परिणाम म्हणुन कंपन्यांचे वार्षिक निकाल,त्यांचे ताळेबंद वा परदेशी गुंतवणुकदरांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटीसा यावर काही लिहिण्यापेक्षा थोडे तांत्रिक विष्लेषण करु पहातो.
बाजाराचे तांत्रिक विष्लेषण करण्याच्या प्रसिद्ध जपानी 'Candlestics' तंत्राप्रमाणे जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji'असे म्हणतात.
अशी रचना बाजारांतील विक्रीचा जोर मंदावला असुन मंदीवाल्यांकडुन सुत्रे तेजीवाल्यांकडे जात आहेत असे सुचित करते (का??... हे या तीन दिवसांतील भावपातळ्यांचे वरील वर्णन वाचल्यास अधीक स्पष्ट होईलच)
महत्वाचे हे,की गेल्या चार पाच महिन्यात फक्त दोन वेळा निफ्टी आजच्याच, म्हणजे 8000 पातळीच्या जवळ आला असता दोन्हीही वेळा हीच 'Morning Star Doji' ची स्थिती आलेखावर पहायला मिळाली व तेथुन निर्देशांकाने परत तेजीचा मार्ग अवलंबला आहे.
आजही (दि, 06/07/08 मे दरम्यान) पुन्हा अशीच रचना होताना दिसते आहे.यावरुन बाजाराने तळ (Bottom) गाठला आहे असे म्हणावयाचे का??...तुम्हाला काय वाटते?? -प्रसाद भागवत
वाचने
27393
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत.
लेख आवडला.
>>जेंव्हा आलेखावर (charts) (1
असं का होतं पण ???? +१
In reply to >>जेंव्हा आलेखावर (charts) (1 by आदूबाळ
(1)मंदीच्या भावनेने बाजारात
In reply to >>जेंव्हा आलेखावर (charts) (1 by आदूबाळ
गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे
+१
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
@डॉ.साहेब.... मी स्वतःला
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
डॉ साहेब, एक सांगु का,
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
डॉक्टर साहेब - ज्याला
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
(१) राहिली गोष्ट विश्लेषकांची
In reply to गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे by सुबोध खरे
भागवत साहेब
In reply to (१) राहिली गोष्ट विश्लेषकांची by प्रसाद भागवत
शिस्तीत sip करावी
शिस्तीत ???
In reply to शिस्तीत sip करावी by टवाळ कार्टा
फंडामेंटल्स (मूलभूत तत्वे) :
'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....'हे वाक्य फार्फार आवडलं. =))आवडला लेख !
@ भागवत साहेब
मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक
In reply to @ भागवत साहेब by सुबोध खरे
पि डां साहेब
In reply to मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक by पिवळा डांबिस
गोष्ट मस्त आहे.
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या
जर आपण 10 वर्षांचा कालावधी
In reply to भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या by पगला गजोधर
निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये
In reply to जर आपण 10 वर्षांचा कालावधी by प्रसाद भागवत
कोणतीही चालेल. त्यातल्या
In reply to निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये by मराठी_माणूस
इतर फंड
In reply to भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या by पगला गजोधर
धन्यवाद भागवत सर :)
होय.बरोबर
In reply to धन्यवाद भागवत सर :) by पगला गजोधर
@प्रसाद
In reply to होय.बरोबर by प्रसाद भागवत
रिअलटाइमऑनलाईन PEG रेशो (पी इ ग्रोथ) कोठे पाहायला मिळतो ?? किंवा कसा मिळवायचा याबद्दल आपण मार्गदर्शन करू शकाल काय ? * जुना प्रतिसाद संपादित केला आहेPEG रेशो संदर्भात आपल्या
In reply to @प्रसाद by पगला गजोधर
धन्यवाद :)
In reply to PEG रेशो संदर्भात आपल्या by प्रसाद भागवत
टेक्निकल आणि फंडामेंटल
अगा आयायायायायायायाया..बाबो !
In reply to टेक्निकल आणि फंडामेंटल by सुधीर
:(
In reply to अगा आयायायायायायायाया..बाबो ! by चिनार
"योग्य किंमत शोधणं अधिक महत्वचं आहे"
In reply to :( by सुधीर
बहुतेक
In reply to "योग्य किंमत शोधणं अधिक महत्वचं आहे" by पगला गजोधर
आपण म्हणता ते बरोबर आहे सुधीर
In reply to टेक्निकल आणि फंडामेंटल by सुधीर
बरोबर
In reply to आपण म्हणता ते बरोबर आहे सुधीर by बेकार तरुण
अॅग्रीड
In reply to बरोबर by सुधीर
सुदर्शन सुखानि
बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी
वैयक्तिक मत
In reply to बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी by चिनार
माझ्याकडून दोन पैशे ...
In reply to बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी by चिनार
@आकाशकंदील, प्रतिसादाबद्दल
प्लीज :)
In reply to @आकाशकंदील, प्रतिसादाबद्दल by प्रसाद भागवत
मला नक्कीच आवडेल. एका
In reply to प्लीज :) by पगला गजोधर
@आकाशकंदील,गजोधर साहेब,..
In reply to प्लीज :) by पगला गजोधर
६४०० चा कॉल?
गोडसे साहेब, असे RBI च्या
In reply to ६४०० चा कॉल? by मार्मिक गोडसे
ओ.के.
ओह्,,,चुक एकदम मान्य. मला
In reply to ओ.के. by मार्मिक गोडसे
६४०० चा कॉल बाय कराच भागवत
In reply to ओह्,,,चुक एकदम मान्य. मला by प्रसाद भागवत
पहाडसाहेब, तांत्रिकदृष्ट्या
In reply to ६४०० चा कॉल बाय कराच भागवत by काळा पहाड
मला शेअर मार्केट चे शुन्य
https://www
In reply to मला शेअर मार्केट चे शुन्य by गणेशा
युलिप मधे गुंतवणुक करावी का ?
पुरेशा किंमतीचे विमा संरक्षण
In reply to युलिप मधे गुंतवणुक करावी का ? by सिरुसेरि
खरे म्हणजे ही माझी व्यावसायिक