✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवी रेशमी वीण..

प — प्राजु, Sat, 01/05/2008 - 21:10

प्रतिक्रिया द्या
22058 वाचन

💬 प्रतिसाद (50)
ऋ
ऋषिकेश Sat, 01/05/2008 - 23:18 नवीन

कोंडलेल्य

कोंडलेल्या आवेगाला बंधनं नको आता कसलीच बनसोक्त बरस तू चिंबं होऊन जाती मने आपलीच
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 01/05/2008 - 23:32 नवीन

व्याकरणाच

व्याकरणाची बंधने झुगारून लिहिली चारोळी माझेच मन म्हणाले मला तुला कसे सुचले ह्यावेळी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/06/2008 - 10:41 नवीन

व्याकरण

व्याकरण म्हणजे असते
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/05/2008 - 23:36 नवीन

बरस.....

बरसलेल्या मेघाला पाहून धरणी उद्गारली त्याने स्वत: रिक्त होउन झोळी माझी भरली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/05/2008 - 23:51 नवीन

वा वा...

धरणीची काया अशी काही शहारली की रोमांच उभे राहून हिरवी बिजे अंकुरली... - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/06/2008 - 01:18 नवीन

बीजे.....

बीज अंकुरे अंकुरे काळ्या मातीच्या कुशीत जसे रूजावे बियाणे तसे फुलेल शेत. (टीप : ही चारोळी कोठेतरी ऐकली आहे.) आपला, ('टीप'लेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/06/2008 - 09:33 नवीन

अंकुर

अंकुर जळण्याच्या भीतीने मी रुजणं थांबवलं नाही कोमजण्याच्या भीतीने मी फुलणं थांबवलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 01:09 नवीन

भेट

तुझ्या भेटीसाठी मी वाट तुडवू लागलो, वाटच चालायला लागली अन मी पहातच राहीलो. हा आपला एक छोटासा प्रयत्न,बाकी आम्हाला कवितेच्या प्रांताची विशेष माहिती नाही... (नवकवी) -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 01/06/2008 - 01:21 नवीन

पाऊस होऊन

पाऊस होऊन बरसावं म्हंटल तर तु लाजुन उघडतेस छत्री म्हणून म्हंटल ढगांना दूर व्हा.... बरसायचं आहे आज चांदणं होऊन रात्री
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 01:39 नवीन

पाऊस

पावसाळा आला की मला फक्त तू आठवतेस, कारण ढग बनून डोळ्यामध्ये तूच पाणी साठवतेस. -इनोबा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 01/06/2008 - 01:55 नवीन

धरती आणि

धरती आणि पाऊस यांचे निस्वार्थी प्रेम.... ती झेलते पाऊसाचा प्रत्येक थेंब...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 02:04 नवीन

पाऊस

पाऊस पाहताना मला वाटलं ढग ही रडत असेल, स्वार्थी जगाला मात्र त्याचे दुखः दिसत नसेल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/06/2008 - 06:13 नवीन

अरे वा..

छोटी टींगी, विनायक राव आपण तर एकदम बादशहाच आहात चारोळी मधले... सलाम! छान विणता आहात... आवडले. पाऊस पडाताना ती अचानक बावरली... विज कडाडल्यावर मला एकदम बिलगली... - प्राजु
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 01/06/2008 - 06:54 नवीन

एक प्रयत्न

(ग्रेसची क्षमा मागून) सुख मनास बिलगत नाही अदमास कशाचा घ्यावा पथ सर्व अन्य विसरुनिया शोधतो दु:खांच्या गावा नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 01/06/2008 - 07:46 नवीन

नाण्याच्या दोन बाजू

पडतो आहे तोच एक पाऊस एक म्हणतो शोधतो दु:खांच्या गावा दुसरा म्हणतो जिवलग बिलगावा भारत म्हणतो शेत आणि शेतकरी जगावा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 01/06/2008 - 08:06 नवीन

तुझ मला

तुझ मला बिलगणं मन उंच आभाळी उडणं आता हे रोजचंच झालाय अशी वेडी स्वप्न पडणं
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 01/06/2008 - 08:18 नवीन

वर्तुळ

स्वप्न आणी वास्तव आहेत जसे दिवस-रात्र गुंतवून तुम्हा-आम्हा चालू ठेवतात जीवनचक्र
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 01/06/2008 - 09:12 नवीन

रात्र

रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसेना का कुठे रुपे जरी अनंत नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/08/2008 - 00:01 नवीन

क्या बात है !!!!!!

वा नंदन ! सर्वोत्कृष्ट चारोळी ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ऋ
ऋषिकेश Sun, 01/06/2008 - 09:09 नवीन

जीवन हेच

जीवन हेच स्वप्न की जीवन हे वास्तव? मिठीतील जीवन स्वप्न अन मुठीतील वास्तव?!
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Mon, 01/07/2008 - 08:17 नवीन

सही

ऋष्या, अजुनही वास्तव मुठीतच आहे म्हणजे आमच्या सारखाच बॅचलर दिसतोस.. बरोबर ओळखलं का नाही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नंदन Sun, 01/06/2008 - 09:27 नवीन

वास्तव

वास्तवाची वीण उसवते स्वप्नांचा अन दिसे किनारा सुषुप्सेतली गोडस धुंदी क्लांत जिवा देतसे निवारा नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 11:09 नवीन

स्वप्न आणि वास्तव

स्वप्नांपेक्षा निराळे वास्तवातले जग, स्वप्नात सुखाचा ओलावा वास्तवात असे धग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 11:30 नवीन

विस्तव

स्वप्नास म्हटले मी एकदा येशील का वास्तवात... स्वप्न म्हणाले मी इथेच बरा तू जळत रहा त्या विस्तवात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 01/06/2008 - 11:32 नवीन

छान चाललं आहे,

मंडळी! चालू द्या! जळ्ळं आम्हाला काव्यात्मक दोन ओळी लिहिता येत असतील तर शपथ! :) तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 11:37 नवीन

असं काय तात्यानू...

आम्हाला तरी कुठं येतंय काव्यात्मक वगैरे...आपलं सहज काहितरी लिहायचं...या मंडळींना ते चांगलं वाटलं की बास! चला आता तुमच्या साधना कोळीण,रौशनी वगैरे महिला मंडळाला आणा रिंगणात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सहज Sun, 01/06/2008 - 11:39 नवीन

जळ्ळं

गद्यातले बादशाह आम्ही जाणून आहे मधली आळी पण जळ्ळं लिहता येत नाही काव्यात्मक दोन ओळी असे तरी लिव्हायचे कि वो! ;-) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Sun, 01/06/2008 - 12:03 नवीन

वसंत

काव्याच्या रम्य वसंतात काव्य खुलू लागले लेखणी झाली मुक्त अन काव्य बोलू लागले च्यामारी!चांगली कविता करतोय तर करू द्या की...राव,शेठ साहेब असली विशेषणं लावून डोकं पिकवू नका. (कवितेचा बॉयफ्रेंड) -इनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/06/2008 - 13:08 नवीन

रानफुले !!!

चारोळ्यांना अलिकडे
बरंच काही कळू लागलं,  
मनोगताच्या कुंडीकडून
काव्य इथे फूलू लागलं Image removed.

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/06/2008 - 19:42 नवीन

काव्य.....

कळत नकळत फुलू लागले काव्य जणू निरागस चेहेर्‍यावर उमलले हास्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकि Sun, 01/06/2008 - 19:16 नवीन

वा ! बिरुटे साहेब

चारोळी फुल्टू आवडली. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/06/2008 - 21:50 नवीन

सह्ह्ही...

नंदन, सहजराव, ऋषिकेश, स्वाती, विनायक, दिलीपजी, देवदत्त, छोटी टिंगी... आपण तर वीण एकदम घट्ट विणता आहात. खूप बरं वाटतंय. असेच चालू राहूदे. फुलता फुलता फुलाने काट्याला झिडकारले.. किड्यांनी ताबडतोब झाडंच पोखरले.... - प्राजु.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 10/16/2016 - 18:25 नवीन

पोखरलेल्या वाशांचं

पोखरलेल्या वाशांचं एक घर अजूनि तगून आहे वठलेल्या झाडाचं एक बीज अजूनि रुजून पाहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सागर सुभाष राणे Sun, 01/06/2008 - 22:03 नवीन

वाचुन आनद झाला

काही चारोल्या प्रेमवर पण लिहा. आम्हाला वाचायला आवाडतिल सागर राणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/06/2008 - 22:24 नवीन

आपणही..

सागर, आपणच लिहा ना.... एक शब्द घेऊन सुरू करा पुढे लिहितिल सगळी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/06/2008 - 22:29 नवीन

ह्म्म्म्म......

राणे साहेब तुम्ही सुरूवात करा....आम्ही मंडळी पडीकच आहोत इथे पुढचं विणायला ;) आपला, (पडीक) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सागर सुभाष राणे Sun, 01/06/2008 - 22:30 नवीन

खरच...

खरच आम्हाला लिहिता आले असते तर कवितेचा महापुर आनला असता आज. सागर राणे
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 01/07/2008 - 13:34 नवीन

असंबद्ध

फूल, काटे, किडे, झाड प्रेम, चारोळ्या -- फुल्टूच यार पडीक विणती शब्द येथे महापुरी ओळी चार [वरच्या पाच-सहा प्रतिसादांतले शब्द निवडून रचलेली ही असंबद्ध चारोळी :). कृपया हलकेच घ्यावी.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 14:04 नवीन

महापूर

आणा भाका विसरुन ती गेली खूप दूर... हृदयात ठेवून आठवणी अन नयनी महापूर... नंद्या भन्नाट चारोळी रचलीस रे... हि आपली अशीच... प्राजूच्या नादाने 'इनोबा' आता चारोळी रचू लागला... अन हास्यात रंगलेला 'तो' आता दूखः वेचु लागला... -इनोबा
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Mon, 01/07/2008 - 15:50 नवीन

जीवन....

सुख वेचता वेचता थोडे दु:खही वेचायचे असते... अरे बाबा, जीवन हे असेच जगायचे असते....
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 19:11 नवीन

सुख आणि दुखः

सुख क्षणभंगूर दुखः असे निरंतर सुख 'सुखाचा सोबती' दुखः खरा मैतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचू
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/07/2008 - 16:12 नवीन

पाचोळी

येथील कवींना आवाहन चारोळी सारखा पाचोळी प्रकार यखांदा करुन पघा. अदुगर बी यकदा आम्ही ही संकल्पना मांडली होती. पन कोनी काय उचलून धरली नाही ब्वॉ. संकल्पना- पहिल्या चारा ओळी लिहुन यकदम हवेत न्यायच, आन पाचवी ओळ लिहून दानकन जमिनीवर आदळायच. त्यो अर्जुनाचा दशांगुळे चालणारा रथ कंच्या तरी कारनान यकदम जमिनिवर आला अगदी तस्सा. आपला (प्रायोगिक) प्रकाश घाटपांडे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 18:20 नवीन

येकदम सही

डॉक्टरसाहेब,तुमची कल्पना आवडली.पांडवांच्या पांचाली प्रमाणे कवितेतली पाचोळीची(की पांचोळीची?) कल्पना छान आहे. खुलासा: अर्जुनाचा रथ कोसळला यांस त्याच्या रथाच्या चाकाला बसवलेले 'डिस्कब्रेक' कारणीभूत होते,असा आमचा निष्कर्ष आहे (या विषयावर आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहोत) त्यामुळे हे 'डिस्कब्रेक' बनवणार्‍या संस्थेवर दावा ठोकण्याच्या विचारात आहोत. (अर्जुनाचा वकील) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अवलिया Mon, 01/07/2008 - 18:37 नवीन

नरो वा कुंजरो वा

रथ नक्की कुणाचा कोसळला? आमच्या अल्प ज्ञानानुसार धर्मराजाचा रथ जमीनीला टेकला होता... चुक भुल देणे घेणे... (महाभारत तज्ञ) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 19:19 नवीन

रिटर्न ऑफ 'नरो वा कुंजरो वा'

नाना धरमपाजीचा रथ केवळ जमिनीला टेकला होता,ज्या वेळी त्याने अश्वथामा मेला अशी बोंबाबोंब केली होती ना तेव्हा...(नरो वा कुंजरो वा) मात्र अर्जुनाचा रथ खराब 'डिस्कब्रेक' मुळे आपटला होता. (-इति'हास्य' तज्ञ) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
देवदत्त Mon, 01/07/2008 - 20:57 नवीन

मी तर

मी तर कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले होते असे वाचले होते. (कुठे ते आठवत नाही. त्याचा संदर्भ कळला नव्हता. पण आता बहुधा ते अर्जुनाच्या रथाचे असावयास पाहिजे होते असे वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Mon, 01/07/2008 - 21:08 नवीन

'देवा'स ठाऊक?

देवा! अरे कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकले ते 'ट्यूब' फाटल्यामूळे,आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे!!!त्या ट्यूब बनवणार्‍या संस्थेवर आणि राज्य रस्ते प्राधिकरणावर हस्तिनापुरच्या न्यायालयात आधिच खटला चालू आहे,पण अर्जुनाचा रथ कोसळला तो खराब 'डिस्कब्रेक'मुळे. (इति'हास्याचा' गाढा अभ्यासक) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
स
सुनील Mon, 01/07/2008 - 21:15 नवीन

उदाहरण?

पंचोळीचे एखादे उदाहरण तरी द्या!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चतुरंग Tue, 01/08/2008 - 03:51 नवीन

चारोळी

चारोळी वाचून हसलो लेखणी घेऊन बसलो चार ओळी सुचेनात चारोळीवाचून बसलो! चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 03:58 नवीन

भावना

नको गप राहू सख्या उठ लाग तू कामाला सूप्त भावना रे तूझ्या कळू दे सार्‍या जगाला... (समद्यांचा जोडीदार) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा