Skip to main content

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

लेखक ग्रेटथिंकर यांनी सोमवार, 18/05/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे. या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे. http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis… An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign visits and the amount of money spent on those tours has opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”. Opposition leaders claim the government is refusing to share information fearing public outcry Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the talk of the town ever since he became the country’s PM in May 2014. While he has managed to win over the hearts of a few, there are many who wonder how much of the common man’s hard-earned money has been used to sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014 demanding to know the number of foreign visits Modi has made from May 2014 to November 30, 2014, the delegates who have accompanied him and the amount spent on these trips. The reply that he got from the Prime Minister’s Office (PMO) was far from satisfactory. स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.

वाचने 76133
प्रतिक्रिया 259

प्रतिक्रिया

नुकतेच पेट्रोल दर वाढल्यानंतर "मोदीं परदेश दौरे करतात पण त्यांच्या फिरण्याचा पेट्रोल खर्च भारतीयांच्या डोईवर" अश्या आशयाची पोस्ट what'up वर वाचली. दुसरे म्हणजे नुकतेच चीन दौऱ्यामध्ये त्यांनी तेथे राहणाऱ्या भारतीयांसमोर भाषण करताना मी पंतप्रधान होण्यापूर्वी भारतातील लोकांना भारतीय असल्याची लाज वाटत होती मात्र आता या वर्षभरात त्यांना भारतीय असण्याचा अभिमान वाटतोय असे म्हणून देशाची लाज काढण्याचा प्रयत्न केला, देशाच्या अस्मितेवर घाव घालणे ही खरेतर शरमेची बाजू ! परदेश दौरे करू देत मात्र आपण सत्तेवर येण्यापूर्वी देश कसा दरिद्री होता आणि आता देशाची परिस्थिती कशी सुधारली आहे हे सांगून स्वतःचे ढोल बडवण्यात काय हासील ? आजही पूर्वीसारख्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत, रोजगाराची परिस्थिती कुठे सुधारली आहे ? आताही आमच्या आया-बहिणी कितीतरी किलोमीटरचे अंतर तुडवून पाण्यासाठी वणवण फिरतायत अश्यावेळी आपल्या पंतप्रधानांना परदेश दौरे करून विदेश पाहण्यापेक्षा भारताचा दौरा करून अगोदर भारत पहिला पाहिजे असे मला वाटते.

In reply to by psajid

"मोदीं परदेश दौरे करतात पण त्यांच्या फिरण्याचा पेट्रोल खर्च भारतीयांच्या डोईवर" अश्या आशयाची पोस्ट what'up वर वाचली. what'up नका वाचु मग,

परराष्ट्र दौरा करणे योग्यच आहे . आपले परराष्ट्र खाते त्याबद्दल अधिक जाणते . पंतप्रधान म्हणून देशाने मोदींना निवडले आहे . ५ वर्षांनी त्यांचे मुल्यमापन जनता पुन्हा करेल . पण परदेशी जाउन देशाबद्दल वाईट उद्गार काढणे , पूर्वीच्या सरकारबद्दल टीका करणे हे सर्वथा चुकीचे आहे. या गोष्टीचे भक्त समर्थन करतात याचे आश्चर्य वाटते. पक्षीय अजेंडा वेगळा आणि जगात भारताचे प्रतिनिधित्व करणे वेगळे ! हे मोदींनी समजून घेतले पाहिजे . सामाजिक माध्यमांमधून याविषयी रोष प्रकट झाला आहे.

In reply to by कपिलमुनी

ह्याचे समर्थन करणारे म्हणजे खरे शहाणे. माझ्या माहीतीतरी कोण्त्याही पंप्रने असे केलेले नाही. हे मोदी का करत आहेत?

बऱ्याच गोष्टीची चर्चा आधीच झाली आहे तरीही थोडेसे लिहितोच. परदेश दौरे कसे गरजेचे असतात वगैरे हे सगळे लोकांनी लिहिले आहेच. मी जरा वेगळा मुद्दा मांडतो. गेल्या वर्षभरामध्ये अश्या कोणत्या भेटी नरेंद्र मोदी दिल्या ज्या ते निवडून यायच्या आधीच ठरल्या होत्या?( जरी मनमोहन सिंग परत पंतप्रधान झाले असते तरी त्यांना या परिषदांना तरी हजेरी लावावीच लागली असती. ) -- ब्रिक्स परिषद, ब्राझील -- आसियान परिषद -- जी -२०, ऑस्ट्रेलिया -- युन जनरल असेम्बली, अमेरिका -- सार्क शिखर परिषद, नेपाळ -- Hannover Messe, जर्मनी जी-२० च्या परिषदेला गेल्यावर ते फिजी बेटांवर जाऊन आले जिथे ३३ वर्षानंतर आपले पंतप्रधान गेले आहेत. जर्मनी ला गेल्यानंतर फ्रांस आणि कॅनडा अश्या दोन भेटी ते घेऊन आले आहेत. कुणीही पंतप्रधान झाले असते तरी या भेटी देणे गरजेचेच होते. या वर्षीही सार्क शिखर परिषद, ब्रिक्स, जी-२० या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. या शिखर परिषदांना जाणे म्हणजे फिरायला जाणे असले गैरसमज लोक का करून घेताहेत हे काही कळले नाही. तीच गोष्ट इतर दौर्यांची पण.

In reply to by सव्यसाची

पण जे काय फॉरवर्डी फटाके वाजवले जातायत, ते इथे होउ नये, त्यासाठी फेबु आणि इतर माध्यमे आहेतच. आलेली माहीती खुशाल कशीही पुढे ढकलणा, एक मिनिटही अभ्यास न करता, याला माझा विरोध आहे.

In reply to by मृत्युन्जय

दौरे करावेत का? हो, केलेच पाहीजेत. जागतिक संबंध राखणे आणि वाढवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. याचा अर्थ ते हे करणारे पहिलेच आहेत का? नाही. त्यांनी जगभरातील व्यासपिठावरुन पुर्विच्या सरकारांची बदनामी करावी का? नाही, त्याला औच्यित्यभंग म्हणतात. समर्थकांनी खोट्यानाट्या बातम्या फिरवाव्यात का, म्हणजे जे भक्त नाहीत ते भक्त होतील? नाही. भारतात ६० वर्षात काहीही झाले नाही, आणि मोदींनी एका वर्षात ते केले, हे खरे आहे का? नाही. मागच्या सरकारने माध्यमांचा कमी वापर केला, हे फारच करत आहेत. मी आकाशवाणी एसेमेस सेवेचा वापरकर्ता आहे. आधी, पंप्र काय करत आहेत हे आठवड्यातुन एकदा कळायचे, इथे दिवसातुन २ मेसेज तरी येतात.

मोदी काहीही म्हणोत. १६ मे पूर्वीही भारतीयांना भारताचा अभिमान होता असे दिसते. दुवा एक शक्यता अशी आहे की १६ मे पूर्वी परिधानमंत्र्यांना व्हिसे वगैरे मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे लाज वाटण्याची माफक शक्यता असू शकते. (फिरेंद्रशेठच स्वतःला कायम गुजराती, गुजराती म्हणवून घेत असतात. आणि गुज्जुला दिला विसा, गुज्जु घुसले भसाभसा अशी म्हण आहेच. या प्रकाराचा व्हिश्याच्या मान्यतेत काही संबंध आहे काय? ते एक असो. ) मात्र आता पदावर अाल्यावर तशी अडचण येत नसल्याने त्यांच्या दृष्टिकोणात भारताविषयीच्या प्रतिमेत फरक पडला आहे असे दिसते. - भारताची लाज न वाटणारा एक सामान्य भारतीय नागरिक

In reply to by आजानुकर्ण

हे काय ऐकतोय मी...? भारतीयांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो..? कधीपासून...? आम्हाला तर जिथे तिथे भारताबद्दल घृणा वाटणारे भारतीय दिसत होते कालपरवापर्यंत... अगदी थर्ड वर्ल्ड टॉयलेट वैगेरे म्हणण्यापर्यंत मजल जात होती. बाकी इकडे तिकडे पिंका टाकणारेही दिसत होतेच. तेच पंप्र बोलले तर रिवर्स गीअर...? या भारतीयांचं काही खरं नाही भाऊ... उद्या हे पाकिस्तानचाही अभिमान वाटतो म्हणून सांगितील.. 'वयम पंचाधिक शतम' चा दाखला देऊन...

In reply to by आजानुकर्ण

भारताची लाज न वाटणारा एक सामान्य भारतीय नागरिक अगदी सहमत आणि असेच मी देखील म्हणतो. पण ते तुमच्याआमच्यासारख्या सामान्यांचे झाले. पण असमान्यांचे काय?

I feel ashamed to call myself an Indian: Rahul Gandhi


In reply to by विकास

भारताच्या पंतप्रधानांनी परदेशात असे वक्तव्य करणे आणि इतरांनी भारतात असताना म्हणणे यात बराच फरक आहे असे वाटते. बाकी "मंगोलियाच्या दौर्यादरम्यानही त्यांनी माझ्या पक्षाचे चिन्ह आणि तुमच्या राष्ट्रीय चिन्हात कमळ असल्याने या देशाशी माझा वैयक्तिक संबंध निर्माण झाला आहे असे म्हटले होते. " असेही वाचले. परदेशात असताना भाजपाचे प्रतिनिधी नसून सर्वच नागरिकांचे प्रतिनिधी आहोत इतपत जाणीव निदान पंतप्रधानांना असावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटत नाही.

In reply to by आजानुकर्ण

परदेशात असताना भाजपाचे प्रतिनिधी नसून सर्वच नागरिकांचे प्रतिनिधी आहोत इतपत जाणीव निदान पंतप्रधानांना असावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटत नाही. अहो ते फिरेंद्र असतील नरेंद्र नसावेत! ;) असो. याच ट्रोलसंप्रदायांच्या (तुम्ही नाही!) धाग्यात आधी म्हणल्याप्रमाणे, मोदींच्या जागी मी पंप्र असतो तर असे बोललो नसतो. पण त्यामुळेच ती जागा मिळत नसावी मला. :( त्यामुळे मोदींनी नक्कीच सर्व भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून वागले पाहीजे असे म्हणेन. पण त्याहूनही कठीण प्रश्न मला पडतो, मोदी विरोधक, मोदींना त्यांचे प्रतिनिधी आणि पंतप्रधान समजतात का?

मिपावर आलं-लिंबु-आवळा सुपारी वगैरेच्या व्यापार्‍यांना सुवर्णसंधी आहे. ह्या अश्या ओकार्‍या काढणार्‍यांचा इलाज पण होईल आणि तुम्हाला पैसा पण मिळेल क्काय??

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही म्हणजे मूळ मुद्द्याना उत्तर न देता विरुध्द मत मांडणाऱ्या ना ओकार्‍या काढणारे वैगेरे म्हणणे म्हणजे स्वतःची काही मत नसण्याचे आणि भक्त जे म्हणतील ते डोळे झाकून आपल्याला आवडते आणि म्हणून त्या सुंगधी ओकाऱ्या वाटणे याला काय म्हणावे . मध्ये मांडलेल्या अनेक मुद्यांना तुमच्यासारख्या लोकांकडून उत्तर मिळतील अशी अपेक्षा नाहीच

In reply to by पिंपातला उंदीर

उत्तरं दिली तरी कुठलाही पक्षीय संबंध नं लावता कळवुन घ्यायची वॄत्ती आहे का? आंतराष्ट्रीय संबंध म्हणजे काय गल्लीबोळातल्या मॅचचे स्कोर सेटल करण्याएवढं सोपं वाटलं का? तिथे जातीनी उपस्थित रहायलाचं हवं की. सत्ता कुठल्याही पक्षाची असु देत ह्या गुंतवणुकीचे परिणाम दिसायला वेळ लागणारचं आहे. पण किमान त्याची फळं आपल्याला नाही तरी पुढच्या पिढीला तरी चाखायला मिळतील हे लक्षात घ्या. असो. त्यामुळे सारासार विचार नं करता मतं लिहिणं टाळा. शेवटचा प्रतिसाद ह्या धाग्यावर. हल्ली त्रास करुन घेत नाही. रच्याकने... आवळ्याला हिंग लावलं तर मळमळ लवकर कमी होते असं म्हणतात,

बरं ते जाऊ द्या. सोसायटीचा अध्यक्ष झाल्यावर शेजारच्या सोसायटीचा दौरा केला. मला घ्यायला या सोसायटीचे अध्यक्ष फाटकात आले होते. त्यांच्या क्लब हौसात माझे भाषण ठेवले होते. माझ्या भाषणादरम्यान खट खट खट असा जयघोष चालला होता. विरोधक टेरेस वर दडून बसले होते. चडफडत होते. आमच्या सोसाटीतल्या बितंबातमी मंडळाने स्मार्टफोन मधल्या मोबाईल मधल्या कॅमे-याने चलचित्रण चालू ठेवले होते. या सर्व वातावरणाचा परिणाम होऊन मी बोलून गेलो, पूर्वी जेव्हां आमच्या सोसायटीतले लोक तुमच्या सोसायटीत कामानिमित्त यायचे तेव्हां स्वतःच्या सोसायटीचे नाव सांगताना ते लाजत असत, आज त्यांच्या माना उंचावलेल्या आहेत. मला थांबवत त्या सोसायटीचे अध्यक्ष म्हणाले दहा लाखाचं कर्ज पण देणार का ? यावर नकळत पुणेरी सवयीने पैसा काय आमच्या पिताश्रींचा आहे का असं बोलून गेलो...

फेसबुक फॉर्वर्ड्स बहुत दिनों पहले की बात है ( 369 दिन पहले की ) मैं एक देश में रहा करता था. मुझे अपने आप पर बहुत शर्म आती थी कि मैं इस देश में पैदा हुआ. उस देश के राजा बहुत लापरवाह और ढीले ढाले थे. छोटी छोटी रियासतों के मुखिया अपनी मनमर्जी करते थे. समुदाय विशेष को रियासतदारों से डर लगता था, लोग भयभीत थे. पूरा देश भीख माँगकर गुज़ारा करता था. जब भी कभी मैं विदेश जाता, मुझे वहाँ मुहँ छुपाना पड़ता था, लोग मुझे देखना पसंद नहीं करते थे, यहाँ तक कि लोग मुझे अपने देश में घुसने तक नहीं देते थे. और फिर आई सोलह मई की वह अलौकिक तारीख़, राजगद्दी पर देवता स्वयं विराजमान थे. अचानक जिन नदियों में निखालिश मैला बहता था वहाँ दूध उफना रहा था. पूरा देश खालिश दूध की चाय पी रहा था. जिस देश ने एक दिन मुझे अपने यहाँ घुसने से मना कर दिया था, उसी देश का राजा घुटनों के बल चलता हुआ हमारे राजा से मिलने पहुँचा था. आज विश्व के सारे देश मिलकर भी मेरे देश के मुकाबले घुइंयाँ लग रहे हैं. छब्बीस इंच का मेरा सीना अचानक छप्पन इंची हो गया था ( जाहिर है जब तक मेरा ख़ास सूट सिलकर नहीं आ गया, मैं अर्धनग्न अवस्था में ही रहा ) मैं हैरान था साहेब, अगले दिन मेरे बैंक खाते में पंद्रह लाख रुपये घुस गए थे. दरवाजे पर बुलेट ट्रेन खड़ी थी. स्वर्ग सिधारे मेरे पुरखे आज मेरे सपनों में आते हैं, यहाँ के किस्से सुन - सुन कर अपना सर पीटते हैं. वो तो स्वर्ग से वापस आने को भी तैयार बैठे हैं. अब जा कर महान हुआ है मेरा देश और मुझे गर्व है अपने देवता तुल्य राजा प

चिनार ह्यांनी चेपू वर फिरणारा संदेश मिपावर आपल्या नावावर येथे खपवला ते पाहून लखू रिसबूड आजही आपल्यात हयात आहे ह्याचे सखेद आश्‍चर्य वाटते. बहुतेक मिपाकर हा चेपू वर आहे तरीही असे धाडस करायला ... असो बाकी मोदींच्या परदेश दौर्यांवर अजून ओविसी घसरला नाही आहे अजून राजदीप बरखा सुद्धा बहुतेक ह्या मुद्यांवर रान माजवत नाही आहेत मोदींच्या प्रत्येक परदेश दौर्यात तेथील स्थानिक प्रसारमाध्यमे भारताविषयी सकारत्मक चर्चा करीत आहेत जर्मनीत मेक इन इंडिया ने भारावलेले वातावरण मी स्वतः अनुभवले आहे मंगोलिया च्या बाबतीत प्रसार माध्यमांनी च´ध चा मा केला आहे. मदत भारताने अफगानिस्तानला आजपर्यत २ पेक्ष्या जास्त अब्ज रुपयांची केली आहे त्यातून रस्ते दवाखाने आणि इतर उपयोगी गोष्टी तेथे बांधण्यात आल्या आहेत त्याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध एल नाही माझ्य्मते असा विरोध कोणत्याही विरोधी राजकीय पक्षाने मंगोलिया बाबत केला नाही ,

In reply to by निनाद मुक्काम …

चिनार ह्यांनी चेपू वर फिरणारा संदेश मिपावर आपल्या नावावर येथे खपवला ते पाहून लखू रिसबूड आजही आपल्यात हयात आहे ह्याचे सखेद आश्‍चर्य वाटते. बहुतेक मिपाकर हा चेपू वर आहे तरीही असे धाडस करायला मूळ संदेश चेपू वरचा आहे हे मान्य. तो मी मराठी मध्ये भाषांतरित केला. याचा अर्थ मी तो माझ्या नावावर खपवला असं होत नाही. तो केवळ एक प्रतिसाद म्हणून वाचावा. आणि त्यातील मुद्द्यावर चर्चा करावी. उगाच लखू रिसबूड वैगरे म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. मी माझ्या नावावर प्रतिसाद खपवून "आता सगळ्यांनी माझं कौतुक करा (किंवा शिव्या घाला)" असं कुठेही म्हटलेलं नाही. जर चेपू वरचा संदेश इथे देणं हे चौर्य होत असेल तर कोणत्याही प्रतिसादामध्ये अन्य कुठल्याही जालाची लिंक सुद्धा देऊ नये !

In reply to by चिनार

तु्म्हाला मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते कारण सादर लिंक मध्ये हा मजकूर हजारो लोकांनी चेपू वर शेअर केल्याचे दिसत होते. मजकूर अनुवादित केला म्हणजे त्याचा मालकी हक्क आपसूकच प्राप्त होत नाही ,असे आते तर काळे काकांनी नुकतेच अनुवादित केलेले पुस्तक स्वताच लिहिले असा दावा करून प्रकाशित करू शकले असते स्वतः अभ्यास करून वाचन करून लिखाण केले तर त्याचे कौतुक होईल , उगाच दुसर्याचा बौद्धिक संपदा आपल्या नावावर खपविण्याचा रिसबूड पणा केला तर टीका होणारा लखू रिसबूड हे नाव नाही तर एक प्रतिरूप आहे. ह्यापुढे अश्या लिखाणाखाली अनुवादित किंवा चेपू वरून साभार असे लिहिले तर ते लिखाण एक प्रतिसाद म्हणून नक्कीच वाचता येईल. मिपावर असे सभ्य मिपाकर आवर्जून लिहितात. बाकी आपण आणि मोदी समर्थक त्यामुळे मला अधिक वादात शिरायचे नाही , एक सल्ला देतो जर तुम्ही मिपावरील एखादे लिखाण त्या इंग्रजीत भाषांतरित केले व त्याखाली मूळ मिपाकाराचे नाव लिहिले नाही तर तो तुमच्यावर कॉपी राईट च्या संबंधित गुन्हा दाखल करू शकतो , काळे काकांनी त्यांचे पुस्तक अनुवादित करण्यासाठी मूळ लेखकाची रीतसर परवानगी घेतली होते हे आवर्जून येथे नमूद करतो.

In reply to by निनाद मुक्काम …

ह्यापुढे अश्या लिखाणाखाली अनुवादित किंवा चेपू वरून साभार असे लिहिले तर ते लिखाण एक प्रतिसाद म्हणून नक्कीच वाचता येईल. मिपावर असे सभ्य मिपाकर आवर्जून लिहितात. हो ..ही चूक झाली आहे हे मान्य.. स्वतः अभ्यास करून वाचन करून लिखाण केले तर त्याचे कौतुक होईल , उगाच दुसर्याचा बौद्धिक संपदा आपल्या नावावर खपविण्याचा रिसबूड पणा केला तर टीका होणारा लखू रिसबूड हे नाव नाही तर एक प्रतिरूप आहे. दुसर्याची बौद्धिक संपदा मी माझ्या नावावर खपवलेली नाही आणि खपवणार नाही. त्याची मला गरज नाही. आणि हा लखू रिसबूड आहे तरी कोण ? बाकी आपण आणि मोदी समर्थक हो..आहोत ! जय हिंद ! जर तुम्ही मिपावरील एखादे लिखाण त्या इंग्रजीत भाषांतरित केले व त्याखाली मूळ मिपाकाराचे नाव लिहिले नाही तर तो तुमच्यावर कॉपी राईट च्या संबंधित गुन्हा दाखल करू शकतो , ही वेळ येणार नाही. काळे काकांनी त्यांचे पुस्तक अनुवादित करण्यासाठी मूळ लेखकाची रीतसर परवानगी घेतली होते हे आवर्जून येथे नमूद करतो. काळे काका मध्ये कुठून आले कळलं नाही . कशाला त्या सदगृहस्थाला मध्ये खेचताय ? बाकी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो..काळे काकांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकाच्या विषयावरच आधारित असलेले दुसरे एक पुस्तक मी भाषांतरित केले आहे. पण रीतसर परवानगी नसल्यामुळे आजवर कुठेही प्रकाशित केले नाही .

In reply to by चिनार

चिनार लखू रिसबूड पु ल देशपांडे ह्यांचा व्यक्ती आणि वल्ली मधील मानसपुत्र . मिपावर कोणितर त्यांचे नाव धारण केले आहे असेच नाव आमच्या सोकाजी ने सुध्धा ठेवले आहे. बाकी रीतसर परवानगी घेऊन लवकरच आपले पुस्तक प्रकाशित करा , वाचायला आवडेल. आपल्याशी व्यक्तिशः वाद नाही ,

In reply to by निनाद मुक्काम …

मुळात परदेशी दौर्यांच्या वरून मोदींवर टीका होतांना बीबीसी ने वेगळीच माहिती पुरावे देऊन सांगितली आहे , ह्यातून मोदींची हुशारी दिसून येते अगदी मोदी समर्थकांना सुद्धा सुषमा स्वराज ह्यांनी मोदींच्या पेक्षा जास्त परदेशी दौरे परराष्ट्र मंत्री ह्यां नात्याने केल्याचे वाचून नवल वाटेल. ह्यामुळे मोदिनी स्वराज ह्यांना नामधारी मंत्री बनवले आहे ह्या आरोपाला सुद्धा उत्तर मिळाले आहे. चाणाक्ष देशी मिडीयाला ह्या बद्दल माहिती असू नये

ऑ,लिंक देणे आणि चेपुवरचे व व्हॉट्सापवरचे बिंडोकी प्रतिसाद ईथे देणे यात फरक आहे.

या चर्चेत माझे नाव आणण्याचे प्रयोजन समजले नाही.

भाजपा व मोदींना मतदारांनी ५ वर्षासाठी निवडून दिले आहे,मोठ्या जनदेशाने.तेव्हा सरकारच्या वा नरेंद्रच्या प्रत्येक कृतीचा,निर्णयाचा उठसूठ कीस पाडू नये असे ह्यांचे मत. नको तेवढे खोलात शिरायचे,चित्रविचित्र संख्या,आकडेवारी मांडायची,त्यांचे गोषवारे..पाश्स्चिमात्यांची ही पद्धत भारतातही रूढ होऊ लागली आहे.

प्रतापराव खरच मोदींविरुद्ध लेख टाकू नका आधीच मोदींना मत देवून पस्तावलोय. त्यात तुम्ही आमच्या दुखावर डागण्या देताय. तुमच्या प्रश्नाचे नि खंडेराव ह्यांच्या प्रतिसादाचे उत्तर आम्हा कोणाकडेही नाही हि वस्तुस्तिथी आहे. परंतु गिरे तो भी टांग उपर अशी आमची अवस्था झालीय.देशातला शेतकरी मदतीची वाट बघत असताना ज्या देशाचे कधी नाव एकले नाही तो देश मदत घेवून जातोय नि आमचा शेतकरी मोदींच्या नऊ लाखाच्या कोट कडे नुसता बघत राहतोय. नका देवू हो आमच्या दुखाला डागण्या...

या धाग्यावर आता गंमतच चालली आहे. एकतर मूळ आरोप बिनबुडाचे. सग्ळ्यांना सविस्तर प्रतिसाद दिला आहे. पण त्याकडे काणाडोळा करुन उत्तर नाही उत्तर नाही म्हणुन जितं मय चालु आहे. त्यामुळे चालुच द्यात. मोदीद्वेष्ट्यांनी कितीही रागराग केला तरी काही होणार नाही. जास्त जळजळ वाढली तर लिव्हर खराब होतय एवढे त्यांनी ध्यानात ठेवावे म्हणजे झाले :)

In reply to by मृत्युन्जय

चिनार यांनी फॉरवर्ड छापले, त्याला मी सविस्तर प्रतिसाद दिला. नांदेडियन, श्रीरंग जोशी यांनीही व्यवस्थित उत्तरे दिली. ना तुम्ही काही लिहिले ना चिनार यांनी..
एकतर मूळ आरोप बिनबुडाचे. सग्ळ्यांना सविस्तर प्रतिसाद दिला आहे. पण त्याकडे काणाडोळा करुन उत्तर नाही उत्तर नाही म्हणुन जितं मय चालु आहे. त्यामुळे चालुच द्यात.
कबुल तरी करा कि हा अंगापेक्शा बोंगा मोठा दाखवायचा प्रकार मोदीसमर्थक करताय? कि गिरे तोभी टांग उपर?

In reply to by खंडेराव

आपण माझे सगळे प्रतिसाद खरोखर वाचले आहेत? की उगाच आरडाओरडा करायचा म्हणुन इथे प्रतिसाद देत आहात. धाग्याच्या विषयाला अनुसरुन सगळ्या आक्षेपांना उत्तर देण्यात आले आहे. त्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले असावे. असेलच तर खालील प्रतिसाद वाचावा: http://www.misalpav.com/node/31327?page=1 तुमच्या सोयीसाठी त्यातील काही वाक्ये उद्धृत करतो:
मला कुठल्याही पक्षातील प्रचारकी थाटाच्या व्यक्तींची चीड आहे. त्यामुळे आंजावर असले प्रचारकी चाळे बघितले की मी बर्‍याचदा साले काढतो. मोदींना त्यांच्या विरोधकांपेक्षा समर्थकच जास्त गोत्यात आणणार असे दिसते.
भाजपाच्या बर्‍याच निर्णयांवर मी वेळोवेळी टीका केलेली आहे. जिथे समर्थन योग्य आहे तिथे ते योग्यच आहे. खासकरुन ट्रॉल छाप धाग्यांवर (मग ते कोणाचेही असो) मी टाकच केली आहे. पण आपले ठवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे बघायचे वाकुन हा प्रकार मला मान्य नाही. खालील वाक्येही वाचा (आधीच्या प्रतिसादाखाली ३ -४ प्रतिसाद सोडुन आहे). त्यातीलही काही वाक्ये उद्धृत करतो:
अधुनमधुन व्हॉट्सअ‍ॅप आणि चेपु वर जी ढकलगाडी येते त्याने डोके पिकते. तो प्रचारकी थाट आणि थापेबाजी खटकते आणि मिडियामधुन आणि अधिकृत सरकारी बातम्यांमधुन जी माहिती मिळते त्यामुळे सरकारची धोरणे आवडतात. मोदी सरकार माझ्यातरी पसंतीवर उतरले आहे. प्रचारकी थाटाची जी वाचाळ यंत्रणा उभी आहे ती सरकारी असेल तर त्याला मात्र माझा विरोध आहे.
माझी मते अजुन डिटेलमध्ये जाणुन घ्यायची असतील तर एकदा सगळेच प्रतिसाद नीटपणे वाचा म्हणजे जाणवेल.

In reply to by खंडेराव

खंडेराव , मी तुमच्या धाग्यावर अजून प्रतिसाद दिला नाही. सवडीने देइलच . श्रीरंग यांना प्रतिसाद दिलेला आहे. तो वाचावा.