Skip to main content

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

लेखक ग्रेटथिंकर यांनी सोमवार, 18/05/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे. या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे. http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis… An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign visits and the amount of money spent on those tours has opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”. Opposition leaders claim the government is refusing to share information fearing public outcry Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the talk of the town ever since he became the country’s PM in May 2014. While he has managed to win over the hearts of a few, there are many who wonder how much of the common man’s hard-earned money has been used to sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014 demanding to know the number of foreign visits Modi has made from May 2014 to November 30, 2014, the delegates who have accompanied him and the amount spent on these trips. The reply that he got from the Prime Minister’s Office (PMO) was far from satisfactory. स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.

वाचने 76133
प्रतिक्रिया 259

प्रतिक्रिया

In reply to by खंडेराव

मोदींविषयी कुठलाही आकस नाही, पण हे जे चाल्लय, ठासुन खोटे बोलणे आणि गेल्या ६० वर्षात काही झाले नाही, आता मी बघा काय करतोय, याला विरोध आहे. प्रेस वाले विरोधात लिहु लागले कि त्यांना शिव्या, दुसर्याच्या मातीवरुन आपली भांडणे काढणे, कोणी विरोध केला की तो सिक्युलर आणि काय काय याचा राग येतो.
अगदी अगदी.. चांगल्या कामाचे देखील अशा इतरांच्या अतिउत्साहाने म्हणा अथवा आक्रस्ताळेपणाने म्हणा, उगी अवमूल्यन होतेय असे वाटते मग. आता सोशल मिडिया आहे तेव्हा थोडेफार जोक होतील, दरवेळी लगेच ऑनलाईन ब्रिगेडने (कुठल्याही पक्षाची का असेना) प्रतिहल्ला, गोबेल्स नितीने "खोटे बोला पण रेटून बोला, पुरावे मात्र इतरांना मागा" असे प्रकार करण्याची काहीच गरज नाही. बरेचसे कट्टर समर्थक प्रत्येक जोक अगदी "दिल पे" घेतात असे निरिक्षण आहे. तेच लोक चिमणरावांचा नियम पाळण्याबद्दलचा धागा त्यांना पाठवल्यास मात्र "तू काहीही मनावर घेतोस" असे म्हणतात हे पाहून सखेद आश्चर्य वाटले होते. :) (असो, बाकी नेहमीचीच धुळवड, नेहमीचाच धुरळा..)

In reply to by हाडक्या

१००% सहमत. अश्या लोकांमुळे नेत्याचे नुकसानच जास्त होते. पहिल्यापासूनच मला मोदींची या बाबतीत दया येते. त्यांचे समर्थक आणि विरोधक, दोघेही कट्टर आहेत.

In reply to by चिनार

भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील. >>> हे पुन्हा एकदा समजावून सांगा. दहशतवादी हल्ले याने कसे थांबतील ?

ग्रेटथींकर अभ्यास वाढवा.. :) मन्सुर दार्वेश हा माईंचा भाउ का, कि हितेश चा साळा कि नानाचां मेव्हणा..... जेव्हा मनमोहन सिंग घरात बसुन गारगोटया खेळत होते तेव्हाचा जो सर्वसामाण्य माणसाचा पैसा वाचला त्याचि काय सोनियांना साडि चोळि घेतलि का राहुल ला धोतरजोड ? मोदिंच्या विदेश दौर्‍यानि काय साध्य होणार आहे हे कळायला अभ्यास लागेल, तो सुध्दा एकांगि नाहि. जाउद्या ये आप णेफळे लोगो के बस कि बात नहि. रच्याकने राहुल बाबा विपश्यना करायला बँकॉक ला का गेला बर ? इथे महाराष्ट्रात ईगतपुरि ला विपश्यना साधना केंद्र आहे तिथे का नाहि गेला ? णेफळे धागा काढुन पळायचे नाहि आता.

खर्चाचा तपशील द्यायला काचकूच कशासाठी मग,उपरोक्त कामे करन्यासाठी त्या देशाची ट्रिप करायची गरज नाही,संबंधीत मंत्रालये ही कामे त्यादेशाच्या मंत्रालयाशी संपर्क साधून करु शकतात , त्यासाठी आपल्या कार्यकाळातला एक चतुर्थांश वेळ् परदेशात दवडन्याची काहीच गरज न्हवती

In reply to by ग्रेटथिंकर

माफ करा, व्यक्तिशः तुम्हाला मला काहीच म्हणायचे नाही, पण या सारखा हास्यास्पद प्रतिसाद मी कुठेच पाहीला नाही.
संबंधीत मंत्रालये ही कामे त्यादेशाच्या मंत्रालयाशी संपर्क साधून करु शकतात
परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर अवलंबून राबवता येत? म्हणजे माझा अभ्यास काहीच नाही याबाबतीत, पण सारासार विचार केल्यावर हे शक्य आहे असे वाटत नाही.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर अवलंबून राबवता येत? म्हणजे माझा अभ्यास काहीच नाही याबाबतीत, पण सारासार विचार केल्यावर हे शक्य आहे असे वाटत नाही.>>>>>>>>>>>>अहो बुरोक्रसीवर नाही हो, संबधीत मंत्री जाऊ शकतात ,पन् या सर्वांना बाजुला सारुन हे साहेब् एकटेच फिरत आहेत,तिकडचे एकही पिएम् हिंग लावुन विचारत नाहीत, पण् यांचे जागतिक नेता व्हायचे मुंगेरीलालचे स्वप्न पुर्न करायला जनतेच्या पैशाचा वापर कशासाठी?

In reply to by ग्रेटथिंकर

देशांना भेटी देवून जागतिक नेता होतो काय? आणि तेही तिकडचे पीएम हिंग लावून विचारत नसताना? ते काही नाही. ग्रेटथिंकर, कराच तुम्ही मोदींवर केस. अगदी सुप्रीम कोर्टातच जावूया.

In reply to by काळा पहाड

मला खात्री आहे तो दिवस दूर नाहि जेव्हा ग्रेट्थिंकर साहेब केस जिंकतील आणी भारताला सोन्याचे (नाहि जरा कमीच पडलं, हिरे मोती वगैरे वगैरे) नि मढलेले दिवस दाखवणारे युवराज राज्य करतील. जे फक्त ५७ दिवस कुठे गेलो वगैरे नाहि तर प्यायलेल्या पाण्याचे व टांगाभाड्याचेहि बिल जनते समोर ठेवतील.

हा धागा खूप मोठ्ठा ट्रोल आहे. जाणकारांनी इथे उत्तरे देत वेळ घालवण्यापेक्षा गप्प राहिलेले बरे... काय म्हणतां..?

In reply to by संदीप डांगे

@ संदीप डांगे तुमची troll ची व्याख्या काय आहे नेमकी ? म्हणजे एकच agenda (मोदी विरोधाचा ) राबवणारे troll आहेत हे मान्य केले तर त्याची दुसरी बाजू किंवा विरुध्द टोक असणारे (सतत मोदिसमर्थन करून असंख्य चुकांकडे डोळेझाक करणारे आणि वर मी कुठलाच चष्मा घातलेला नाही असे म्हणणारे ) पण troll ठरतात का तुमच्यासाठी . जर ती दुसरी बाजू तुम्हाला संतुलित निरपेक्ष वाटत असेल तर मग प्रश्नच संपला

In reply to by पिंपातला उंदीर

तुमच्या या दोन ओळींच्या प्रतिसादात मूळ लेखापेक्षा जास्त मजबूत मुद्दे आहेत. चेपुछाप पिंका चेपुवर शोभून दिसतात. टोमणेवजा पिंका मिपावर टाकायच्या असतील तर प्रतिसादात असल्या तर चालून जातील. पण अशा मुद्देहीन, अभ्यासहीन पिंका लेख म्हणून यायला लागल्या तर मिपाच्या दर्जाचं काय होईल? इथे कुणीही कोणत्याही बाजूचं मत मांडावं. पण लेख म्हणून एक मुद्देसूद, अभ्यासू लिखाणाची अपेक्षा असते. निव्वळ शेरेबाजी करायची असल्यास माझ्यामते तरी मिसळपाव ही जागा योग्य नव्हे.

ग्रेटथिंकरराव, तुमचे बरोबर आहे. मोदींचे परदेश दौरे म्हणजे पैशाची वारेमाप उधळपट्टी आहे आणि जनतेच्या पैशावर मोदी पिकनिकवर फिरायला जातात. (पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन

In reply to by चिनार

नाही हो. :) असे लेख हे फार गांभीर्याने घ्यायचे नसतातच. तेव्हा लेखकाशी सहमती दर्शवून मोकळे व्हायचे कारण अशा लेखांवर उगीच चर्चा करण्यात काही अर्थ नसतो असे मला वाटते :)

जरा कुतूहल वाटलं म्हणून लेख उघडला आणि लेखकाचं नाव पाहिलं. नेहमीचे भाजप द्वेष्टे बघितल्यावर जरा हायसं वाटलं. माहिती अधिकार कायद्यासारख्या चांगल्या कायद्याचाही लोक कसा पूर्वग्रहदूषित वापर करतात ते बघून मौज वाटली. कॉंग्रेसचे महामहीम राहुल गांधी ५७ दिवस सुट्टीवर होते. कुठे गेले होते, काय करत होते, कोणाला भेटत होते - काहीही माहित नाही. दहा वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाचा उपाध्यक्ष असलेला हा माणूस आहे. त्याला भारताची सामरिक गुपिते नक्कीच माहित असतील, त्यामुळे तो कुठे जातो आणि कोणाला भेटतो हा नक्कीच देशाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे पण त्याच्याबद्दल कोणी माहिती अधिकारान्वये काही माहिती मागितल्याचे ऐकिवात नाही. मागे एकदा सोनिया गांधी आजारपणामुळे अमेरिकेला गेल्या होत्या. त्याची माहिती कोणत्याही माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेली आठवत नाही. आणि मोदींच्या दौऱ्यावर झालेला खर्च हा अपव्यय आहे की भविष्याकडे लक्ष ठेवून केलेली गुंतवणूक आहे ते मजण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो देण्याचीही या माहिती अधिकारवाल्या ग्रेट थिंकर लोकांची तयारी नाही. खरंतर यांना अशी माहिती मिळवून काय साधायचं असतं आणि ही माहिती कोणाकडे जाते ह्यावर कुणीतरी RTI अंतर्गत माहिती मागायला हवी. माहिती मागण्यात गैर काही नाही पण जेव्हा ती अशी पूर्वग्रह ठेवून मागितली जाते तेव्हा त्या अधिकाराचा तो दुरुपयोग आहे असंच म्हणायला पाहिजे. बाकी चालू द्या.

In reply to by बोका-ए-आझम

सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च पदाधिकार्‍यांना जे थेट सरकारमध्ये नाही त्यांना सरकारची धोरणात्मक माहिती असणे यात गैर नाही. पण सामरिक गुपिते त्यांना ठाऊक असणे (खरे असल्यास) तत्कालिन संरक्षण मंत्री व पंतप्रधान व कॅबिनेटमधील सुरक्षा समितीचे सदस्य यांनी त्यांच्या पद व गोपनियतेच्या शपथेचा भंग केला असे म्हणावे लागेल. १९९८ साली वाजपेयी सरकारमध्ये स्व. प्रमोद महाजन व जसवंत सिंह मंत्री नव्हते. महाजन पंतप्रधानांचे राजकीय सल्लगार म्हणून व जसवंत सिंह पंतप्रधानांचे अमेरिकेतील दूत म्हणून काम करणार होते (स्वतः पंतप्रधानांकडे परराष्ट्र खाते होते) तेव्हा पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी या दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली होती. राहूल गांधी यांना भारताची सामरिक गुपिते ठाऊक असावीत हा दावा तुम्ही कशाच्या आधारे केला हे सांगितले तर बरे होईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

अहो मोदीसरकार सत्तेत येण्यापूर्वी कोणत्यातरी मोठ्या सरकारी बाबूने लिहीलेले पुस्तक कोणते ते? त्यात त्याने लिहीले होते की मनमोहनांकडून क्लीयर व्हायला सगळ्या फायली १० जनपथला जायच्या वगैरे.. त्यावरून असे वाटले असेल.

ग्रेट थिंकर ...यु आर थिंकिंग ग्रेट!!

नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे या दौर्‍यातुन मोदीनी चिनला अक्षरशः घेरलं, अगदी चिनच्या अधिकृत मेडीआने देखिल मोदीना "धुर्त-धोकादायक" असेच मानलं आहे. बाकी आपल्याला "सामरीक महत्व" या शब्दाचा अर्थच आपणास माहीत नाही असेंच वरील वाक्य स्पष्ट करत असल्याने... फार चर्चा न करता मोदीनी ज्या क्षणी अजित डॉवालना सोबत घेतलं तिथेच माझं मन जिंकलय असे म्हणेन. नाही दाखवायला राजनाथसिंह मंत्री आहेत पण खरं काम अजित भाउच करतात :) असो... बाकी यानुशंगाने मला मेक इन इंडीया मात्र विषेश पट्लं नाहीये. एक काळ होता जेंव्हा परदेशी प्लांट लागणार म्हटल्यावर हजारो स्थानीकांना रोजगार उपलब्ध्द होत असे, व अनेक लघुउद्योजकांनाही बरीच कामे मीळत असतं. आता काळ बदलला आहे, आता हे घडतेच असे अजिबात नाही. कारण आता सर्वत्र ऑटोमेशन झाले आहे. सर्व कामे यंत्र करतात व म्हणून ती जास्त अचुक, दर्जेदार व जलदही असतात. मानवी हस्तक्षेप प्रॉडक्शनमधे शक्य तितका टाळला जातो. स्थानीक लघु उद्योजकांनाही विषेश कामे मिळत नाहीत कारण भारतीयांना तो दर्जा राखता येतोच असे नाही. ( ऑटोमेशन असल्याशिवाय) म्हणजे पुन्हा ऑर्डर्स बाहेरच... मग मेक इन इंडीया नक्कि कोणाला जास्त फायदेशीर आहे ? सोपं उदाहरण घेउ, मला विदेशी गाडी हवी आहे ? त्यावर किमतीच्या जवळपास १००% टॅक्स भरल्याशीवाय ही गाडी भारतात येणेच शक्य नाही.. पण त्याच्या स्पेअरपार्ट्सना हे लागु नाही मग ? मेक इन इंडीया म्हणत भारतातच मॅनुफॅक्चरींग टाकायचे, खरे तर फक्त असेंब्लिंगच कारण (सर्व महत्वाचे) सुटेभाग बाहेरुनच टॅक्स वाचवत मागवायचे, इथे ते मशीन कडुन जोडुन घ्यायचे ( म्हणजे रोजगार गेला) व स्वस्तात गाडी भारतात विकायची... यात सामान्य माणसाला पैसा मिळणार कुठे हा यक्षप्रश्न आहे. एकेकाळी जपान, चिन वा इतरही अनेक देशांनी तिथेच उत्पादनाला चालना देउन देशामधे पैसा आणला सम्रुध्दी आणली हे सत्य आहे. आणी मोदीजी तेच करत आहेत पण... बदलता काळ सामान्य माणसाबाबत हे होउ देणार आहे काय ?

In reply to by द-बाहुबली

हैला ! कुणीतरी इथले 'भक्तांचे ' प्रतिसाद कॉपी करून मंगोलियन जनतेपर्यंत पोंचवा पाहू . आपला देश कसा महत्वाचा आहे यावर हिरीरीने टाकलेले स्तुतीवाचक प्रतिसाद पाहून उर भरून येईल हो त्यांचा . पुढचा दौरा कुठाय म्हणायचा ? कांगो ? भक्तांचा 'रिसर्च ' सुरु पण झाला असेल कांगो हा देश कसा महत्वाचा आहे यावर

ये एहे एहे एहे!!!! ग्रेटथिंकरांचा धागा मंजे पर्वणीच.

मोदींना सुचना आणि विनंती ! विनंती :- आपण देशाचे पंतप्रधान आहात याचे आपणास कायम स्मरण असु ध्यावे आणि गुंतवणुक करताना फक्त गुजरात एके गुजरात असे लक्ष नसावे ! एक दुवा :- माध्यमोत्सवाच्या मर्यादा सुचना :- आपण लोकांना फार जवळ जाउन भेटता, देशाला आणि आम्हाला तुमच्या सुरक्षतेची काळजी असल्याने योग्य अंतर राखुनच भेटी-गाठी घ्याव्यात. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

In reply to by बॅटमॅन

गुजरातचेच पंप्र आहेत हो ते खरयं... त्यांच्या मते महाराष्ट्रातील लोक "अडाणी" आहेत ! काही दुवे :- Metal and steel trade threatens to shift base to Gujarat, triggers political war BSE plans international bourse in Gujarat Gujarat allocates 3 lakh sq ft for commercial tower for BSE at GIFT city BSE plans international exchange in Gujarat, commodity bourse BSE’s Rs150 crore investment a major boost to GIFT मोदी महाराष्ट्रात काही शिल्लक तरी ठेवणार आहेत का ? इंजि कंपन्या, फार्मा कंपन्या आणि इतर तिकडेच जाणार असेल तर महाराष्ट्राचा 'विकास" कसा होणार ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

In reply to by मदनबाण

अहो मदनबाणराव,
Metal and steel trade threatens to shift base to Gujarat, triggers political war
या लिंकमधले पहिलेच वाक्य--- "The Metal and Stainless Steel Merchant’s Association (MASSMA), an apex body for the industry on Saturday threw a spanner in the Devendra Fadnavis government’s much touted initiative of improving the ‘ease of doing business’, claiming it was perturbed by the ‘licence raj’ and ‘regressive taxation policies’ in Maharashtra." म्हणजे मुद्दा कुणाचा? महाराष्ट्र सरकारशी संबंधित. या कंपन्यांच्या मते महाराष्ट्रात जास्त कर आणि परमिट लागतात. आणि ते गुजरातमध्ये जाणार असतील तर त्यांच्या मते गुजरातमध्ये या गोष्टी अधिक अनुकूल असाव्यात हा तर्क. त्यांचे ते मत योग्य आहे की अयोग्य ही पुढची गोष्ट झाली.पण हे मत योग्य असेल तर निर्णय कोणाचे चुकत आहेत? महाराष्ट्र सरकारचे. आणि तुम्ही दोष कोणाला देत आहात? मोदींना. कमाल आहे. तुमच्या बाकीच्या लिंका जी.आय.एफ.टी सिटीशी संबंधित आहेत. दुबईच्या फायनाशिअल हबच्या धर्तीवर अशी एखादी सिटी असावी हा गुजरात सरकारचा विचार आहे हे अगदी २०१०-११ पासून ऐकले होते. त्या सिटीसाठीच्या पहिल्या फेजसाठीचे कर्ज उभे केले गेले जुलै २०१४ मध्ये. त्यावेळी मोदी पंतप्रधान होऊन जेमतेम दिड महिनाही लोटला होता. अशा सिटीमध्ये बी.एस.ई आणि इतर आर्थिक संस्था गेल्या तर त्यात मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा अधिक वाटा नाही का? बाकी कसे आहे--मोदी कसे नालायक, मोदी कसे खलनायक, मोदी कसे पक्षपाती, मोदी कसे महाराष्ट्रविरोधी इत्यादी इत्यादी गोष्टी म्हटल्या की आपण कसे विचारवंत, नि:पक्षपाती विश्लेषक इत्यादी इत्यादी गोष्टी मिरवता येतात ना. चालू द्या.

In reply to by मदनबाण

उद्योग करणे जेथे जास्त सुलभ आणि फायदेशीर असते तेथेच उद्योग जाणार, कारण... कायद्याच्या परिघात राहून गुंतवणुकदारांसाठी जास्तीत जास्त फायदा कमावणे हे सर्व खाजगी उद्योगांचे प्रथम कर्तव्य असते. हे तत्व न पाळल्याने तोट्यात असणार्‍या कंपनीत आपला घाम गाळून कमावलेल्या संपत्तीची गुंतवणुक करणाची इच्छा असलेले कोण कोण लोक आहेत ? त्यांनी आपले हात वर करा बरे ! (तसे बघितले तर अश्या कंपनीत गुंतवणुक केल्यावर पैसे बुडाल्याने त्यांना हात वर करावेच लागणार आहेतच !! ;) ) खाजगी उद्योगांना आपल्याकडे आकर्षित करणारे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यांवर असते... त्यासंबंधीच्या राजकीय आश्वासनांवर / किंवा रडण्या-भेकण्यावर अनिश्चित काळपर्यंत विसंबून उद्योग उभारून तोटा सहन करावा असे म्हणणे विचारीपणाचे लक्षण नाही. याविरुद्ध, राज्याच्या/राष्ट्राच्या अस्मितेचे भांडवल/गाजावाजा करून "स्वत:चा" फायदा करून घेणे हा राजकारण्यांचा धंदा असतो... त्यावर फायदेशीर उद्योग स्थापीत होऊ शकत नाही. तेव्हा, या चढओढीत राज्यांनी रडण्याभेकण्याच्या बालिशपणाऐवजी त्यांच्या जमीनीवरची वस्तूस्थिती योग्य तर्‍हेने बदलणे जरूर आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रच्याकने, स्वातंत्र्यांनंतरच्या पहिली ४० वर्षे तरी महाराष्ट्र सर्व भारतात अग्रेसर औद्योगीक राज्य होते... ती जागा महाराष्ट्राला का आणि कशी मिळाली आणि आता ती का आणि कशी गमावली गेली याबाबत काही विचारमंथन दिसते आहे का ???!!!

In reply to by बॅटमॅन

गुजरातचेच पंप्र आहेत हो ते.
कैपण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना चीनमध्ये तिथल्या याकचा खरारा काढायला बरोबर नेले होते का पंतप्रधानांनी?

In reply to by मदनबाण

आपण देशाचे पंतप्रधान आहात याचे आपणास कायम स्मरण असु ध्यावे आणि गुंतवणुक करताना फक्त गुजरात एके गुजरात असे लक्ष नसावे !
म्हणजे कुठे गुंतवणूक करावी असं म्हणणं आहे? स्वतःचे उद्योग कर्नाटकाला दान देवून स्वतःच्या पायावर धोंडा मारणार्‍या महाराष्ट्रात? ममता बॅनर्जीच्या बंगालमध्ये? काँग्रेस रूल्ड राज्यांत? उद्योग तिथेच जातात जिथे जमीन सहज उपलब्ध होवू शकते. असं सहजपणे करू शकणारं सध्याचं एकमेव राज्य गुजरातच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या कर्तुत्वामुळे (उदा: जैतापूर) ती संधी गेली आहे. महाराष्ट्रातले शेतकरी सेझ ला कसा विरोध करतायत ते आपण पाहिलंच आहे. तसंही उद्योग इथं आले तर कोणता मराठी बिझनेसमन त्याचा फायदा करून घेणार आहे? मुळात मला एखाद्या मराठी बिझनेसमन चं नाव सांगितलंत तरी पुरे (पवार घराणं सोडून, त्यांचा फक्त जमिनी घेण्या-देण्याचा बिझनेस आहे). या उद्योगधंद्यांना स्कील्ड लेबर लागतं. मराठी लोक आहेत का स्किल्ड? एक फर्निचर करायचं तर राजस्थानी लोकांना बोलवावं लागतं. तेव्हा फार काही न बोललेलं बरं. झाकली मूठ सव्वा लाखाची (कारण त्यावर जायची मराठी लोकांची लायकीच नाही).

In reply to by काळा पहाड

@ गॅरी महाराष्ट्र सरकारशी संबंधित. या कंपन्यांच्या मते महाराष्ट्रात जास्त कर आणि परमिट लागतात. आणि ते गुजरातमध्ये जाणार असतील तर त्यांच्या मते गुजरातमध्ये या गोष्टी अधिक अनुकूल असाव्यात हा तर्क. त्यांचे ते मत योग्य आहे की अयोग्य ही पुढची गोष्ट झाली.पण हे मत योग्य असेल तर निर्णय कोणाचे चुकत आहेत? महाराष्ट्र सरकारचे. आणि तुम्ही दोष कोणाला देत आहात? मोदींना. कमाल आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा पूर्वी ऐकली होती...जर देवेंद्र भाजपाचे असतील तर आता अडचण कसली आहे ? चीनने मोदी यांच्या स्मार्ट सिटी योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. ही नियोजित स्मार्ट सिटी उभी कोठे राहणार? तर गुजरातमध्ये. तेव्हा माझे राज्य आणि माझे उद्योगपती यांचेच भले करण्याचा विडा मोदी यांनी उचलला आहे काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यास ते कितपत अयोग्य ठरेल? माझ्या पहिल्या प्रतिसादला दुवा देखील वाचण्याचे कष्ट घ्या... @काळा पहाड मराठी लोक आहेत का स्किल्ड? एक फर्निचर करायचं तर राजस्थानी लोकांना बोलवावं लागतं. तेव्हा फार काही न बोललेलं बरं. झाकली मूठ सव्वा लाखाची (कारण त्यावर जायची मराठी लोकांची लायकीच नाही). हॅहॅहॅ... मराठी लोक गाढवच म्हणायला हवे नाही का ? आमचे मुख्यमंत्री सुद्धा मराठी आहेत ना ? का ते सुद्धा गुजराती हवेत ? सत्ता नसताना जी भाजपा गोष्टी करत होती, ती सत्ता आल्यावर का करता येउ नये ? जाता जाता :- आमच्या देशप्रेमी विकासमूर्ती पंतप्रधानांनी ज्या देशाचे ते पंतप्रधान आहेत त्याच देशाचा नकाशा चीन भेटीत चीनच्या एका मिडीयाने चुकीचा दाखवला त्या बद्धल ब्र देखील काढला नाही... सेल्फी काढण्यात आणि ट्वीट करताना बहुधा त्यांना या बाबतीत लक्ष घालायला वेळ मिळाला नसावा ! प्रत्येक देशातील भाषणात तेच मुद्दे उगाळुन सांगत आहेत पण देशात सामान्य माणसाला दाळ विकत घेण्याची सुद्धा मारामार आहे, हे मात्र त्यांच्या ध्यानात येत नाही हे मात्र गमतीशीर वाटते !

In reply to by मदनबाण

नकाशा चुकीचा दाखवल्या बद्दल काय टीव्हीवर मारामारी करायला हवी होती का? त्यासाठी राजनैतीक मार्ग आहेत ना ? त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेल हे ग्रुहीत धरू नका.

In reply to by मदनबाण

हॅहॅहॅ... मराठी लोक गाढवच म्हणायला हवे नाही का ? आमचे मुख्यमंत्री सुद्धा मराठी आहेत ना ? का ते सुद्धा गुजराती हवेत ? सत्ता नसताना जी भाजपा गोष्टी करत होती, ती सत्ता आल्यावर का करता येउ नये ?
ते तुम्ही भाजपा सरकारला विचारा. मी अँटी-काँग्रेस असेन तर याचा अर्थ बीजेपी-समर्थक आहे असा होत नाही. बाकी तुम्ही माझ्या ऑब्जेक्शन्स बद्दल काही बोललाच नाहीत. हॅहॅहॅ वगैरे ठीक आहे पण मुद्दा कुठाय त्यात?

In reply to by मदनबाण

देशात सामान्य माणसाला दाळ विकत घेण्याची सुद्धा मारामार आहे, हे मात्र त्यांच्या ध्यानात येत नाही हे मात्र गमतीशीर वाटते !
पैसे वाटायला हवेत का मग? सामान्य माणसानंच आत्तापर्यंत पायावर धोंडा पाडून घेतलाय काँग्रेसला मत देवून. गरीबी हटावचा नारा केव्हापासून चालू आहे? बाकी या सामान्य माणसाला आपलं स्किल अपग्रेड करायला कुणी नको म्हणून सांगितलं होतं का? त्याच त्या प्रकारच्या प्रक्रिया वापरायच्या वर्षानुवर्ष. तिथं चायनीज लोकांनी पतंगापासून मोबाईलपर्यंत आणि लायटरपासून टीव्हीपर्यंत सगळ्या गोष्टीत त्या सुधारण्यासाठी मार्ग शोधले आणि बाजारपेठ काबीज केली. साधं उदाहरण देतो. अजून आमचे लोक बनवतायतच फुसक्या होळीच्या पिचकार्‍या. चायनीज पिचकार्‍या आता छोट्या टँक एवढ्या मोठ्या आहेत आणि ४० फूट लांब जातात. तेच जवळ जवळ प्रत्येक बाबतीत आहे. डोक्याचा वापरच करायचा नसेल तर कुणीतरी तुमची बाजारपेठ काबीज करणारच आणि मग तुम्ही डाळीला महाग होणारच. त्याला मोदी किंवा दुसरा कोणी तरी काय करणार? तो मेक इन इंडिया साठी इन्फ्रास्ट्रक्चर (जे काँग्रेस नं इतकी वर्ष वाळवीप्रमाणं लागून संपवलं) बनवणार. पण त्यासाठी त्याला वेळ तरी देणार की नाही? आणि तुमच्या कडे पैसे नसतील तर ते जगातून दुसरीकडूनच आणावे लागतील ना? तेच तर तो करतोय. की बसायचं त्यानं इथंच पैसे छापून वाटत? तर सेल्फी काय, ट्वीट काय! काँग्रेसला जनतेनं हाकललेलं आहे हे लक्षात ठेवा. सेल्फी काढली तर काय करायचं ते जनता बघून घेईल. तुम्ही त्या दळभद्री युवराजांच्या कमबॅककडं पहा नाही तर नाकाडावर पडेल तो पायात पाय अडकून.

In reply to by मदनबाण

काहीही झाले तरी सतत टिका करत राहायची हा स्वतःचा जन्मसिध्द अधिकार समजणारे अनेक लोक असतात. तुमचे प्रतिसाद वाचून तसेच वाटायला लागले आहे. तुम्ही अशा , अशा बातम्या वाचल्या असाल याची अपेक्षाच नाही. तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात National Institute of Pharmaceutical Education and Reseach आणि आय.आय.एम सुरू करणार याची तरतूद आहे याविषयी तुमचे म्हणणे काय? नागपूरमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पण सुरू करायची तरतूद जेटलींच्या जुलैमधल्या अर्थसंकल्पात होती. महाराष्ट्रातील आय.आय.एम पण (बहुदा फडणवीसांनी) नागपूरला नेले.आय.आय.एम नागपूर यावर्षी सुरू होणार की नाही माहित नाही पण २०१६-१८ च्या बॅचसाठी निश्चितपणे सुरू होणार आहे. म्हणजे पुणे, औरंगाबाद, नागपूर ही शहरे गुजरातमध्ये आहेत असे तुम्हाला वाटत असले तर तसे वाटायला काहीच आक्षेप असायचे कारण नाही.फक्त असे वाटणे हे वस्तुस्थितीला धरून नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की स्मार्ट सिटी फक्त गुजरात पुरती मर्यादित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे युवराजांच्या अमेठी मध्ये सुद्धा स्मार्ट सिटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. आणि हो ..आमच्या अमरावतीला सुद्धा स्मार्ट सिटी होणार बर का !!!

In reply to by चिनार

औरंगाबाद चे नाव देखील ऐकले आहे ! आणि हो ते महाराष्ट्रातच आहे हे ठावूक आहे ! ;) बादवे मुंबई चे सिंगापुर आणि कोकणचे कॅलिफॉर्निया झाले की कळवा बरं का... म्हंणजे स्मार्ट सिटी पूर्ण होताना पाहु काय ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

In reply to by गॅरी ट्रुमन

आणि आय आय एम नागपूरला होतेय ही बातमी यांच्यासाठी फार सुखावह नाही ...यांच्या नजरेत ही गोष्ट म्हणजे "विदर्भाला झुकते माप !" अशी आहे. म्हणजे परत सरकारवर टीका !

म्हणजे माझा पास... राजकारणावरील धाग्यावर शक्यतो लिहिणार नाहीच.. उपयोग शुन्य ... तसेही आपलेच बरोबर फक्त हा हेका आजकाल दोन्ही बाजुंचा( धागाकर्ता-रिप्लायकर्ते) झाल्याने पार अक्कल निघत आहे धाग्यांवर.. हे बरोबर वाटत नाही.. हे नमुद करुन जातो.

In reply to by गणेशा

मी पण राजकारणावरील चर्चांमध्ये भाग घेणे टाळतोच पण काही वेळा नाईलाज होतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

हे तु सांगितल्यामुळेच मी नक्की केले आहे... त्यामुळे तुलाच धन्यवाद... बाकी सर्वांनी आपपली मते भले ती टोकाची का असेना मांडावीत पण पुढच्याच्या मतांचा आदर जो पर्यंत करणार नाहीत तो पर्यंत तुमच्या मतांची किंम्मत शुन्यच असे मला वाटत आहे... हा या ध्याग्यावरील शेवटचा रिप्लाय... सर्वांची चांगली मते वाचायला आवडतील

पहील्या वर्षात... Modi- Foreign tour 51 day, 17 countries Manmohan Singh- 47 day 12 countries

In reply to by मोदक

या मुद्द्यावर प्रतिवाद करण्यास मुद्दे नाहीयेत म्हणून सोयीस्कर मौन आहे का..?
अगदी असेच. मोदी हे नाव ऐकले की अंगावर पाल पडल्यासारखे कोणत्या ना कोणत्या कारणावरून टिका करत राहायची हा अनेकांचा जन्मसिध्द अधिकार असतो.

माननीय पंतप्रधानांचे हे विधान वॄत्तपत्रात आलेले दिसत आहे. हे बहुधा काही दिवसांपूर्वीही वाचले होते. असे विधान पंतप्रधानांनीच परदेशात जावून करावे हे आपले सर्वांचे दुर्दैव... :-( News

In reply to by श्रीरंग_जोशी

आपल्याच देशातील लोकांचा उद्धार तसेच विरोधी पक्षांचा उद्धार कशाला करावा ? बरं मोदींची भाषणे ऐकायला येणार्‍या लोकांना हिंदूस्थानातील परिस्थीती ज्ञात नाही का ? आजच्या इंटरनेटच्या युगात क्षणात अपडेटेड माहिती मिळत असताना मोदींना नक्की काय नव्याने सांगायचे असते ? मेक इन इंडियाचा ढोल बडवायचा पण टेलिकॉम क्षेत्रात सुद्धा मेड इन चायनाला प्रवेश द्यायचा ? चीन आर्मी आणि चीन टेलिकॉम इंडस्ट्री यांचे सख्य आख्या जगाला माहित असताना आपण असे का करतो आहोत ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

In reply to by मदनबाण

तुमच्या-पक्षाला-जनतेनं-हाकललेलं-आहे. पडून रहा पाच वर्ष. चीन बद्दल एवढं सावध करायचा प्रयत्न करताय तर का नेहरूंनी हिंदी चिनी भाई भाई करून भारताच्या संरक्षण सिद्धतेकडं दुर्लक्ष केलं?

In reply to by काळा पहाड

तुमच्या-पक्षाला-जनतेनं-हाकललेलं-आहे. पडून रहा पाच वर्ष. काळूमामा आमचा-तुमचा पक्ष हा शोध कुठुन लावलात ? नेहरुंनी हिंदी-चीनी भाई भाई केले तर मोदींनी नी-हाव म्हंटले इतकाच काय तो फरक ! आपण गुंतवणुक शोधत फिरतोय आणि संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतोय, पण चीन-पाकिस्तान आणि रशिया यांच्या वाढत्या मैत्री बाबतीत मात्र मौन धरुन आहोत... एके काळचा हिंदूस्थानचा मित्र समजला जाणारा रशिया आता चीन आणि पाकिस्तानला शत्रास्त्रे पुरवु लागला आहे ! नुकतेच रशियाने चीनला S-400 विकण्याचा निर्णय घेतला आहे, जो आपल्या दॄष्टीने चिंतादायक आहे ! असो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

In reply to by मदनबाण

मदमस्त आजोबा,
आमचा-तुमचा पक्ष हा शोध कुठुन लावलात ?
आमचा कोणताही पक्ष नाही. तुमचा जो आहे, तो आमचा शत्रु आहे आणि तो आता संपेलच.
नेहरुंनी हिंदी-चीनी भाई भाई केले तर मोदींनी नी-हाव म्हंटले इतकाच काय तो फरक !
आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल समजाबद्दल आम्हाला आदर आहे. भारत-चीन यांची परस्पर देशांत गुंतवणूक, गुंतवणुकीतल्या फरकातील आर्थिक बदल वगैरे गोष्टी तुम्ही ज्या विस्तारपणे विष्लेषण करून मांडल्या आहेत, ते पहाता तुम्हाला गेलाबाजार राहुल गांधी यांचं सल्लागार पद तर नक्कीच मिळायला हवं होतं.
आपण गुंतवणुक शोधत फिरतोय आणि संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतोय, पण चीन-पाकिस्तान आणि रशिया यांच्या वाढत्या मैत्री बाबतीत मात्र मौन धरुन आहोत
मग काय घंटानाद करायचा काय त्यांच्या एंबसी समोर? की पदयात्रा काढूया पंधरा किलोमीटरची.. पाकिस्तान टू चायना व्हाया रशिया? पुन्हा सांगतो, खरंच अप्लाय करा राहुल गांधींच्या सल्लागारपदासाठी. लायक आहात.
एके काळचा हिंदूस्थानचा मित्र समजला जाणारा रशिया आता चीन आणि पाकिस्तानला शत्रास्त्रे पुरवु लागला आहे
अमेरिका हा पाकिस्तानचा एके काळचा मित्र आपल्याला आता शस्त्रं पुरवतोच ना? "आंतरराष्ट्रीय जगात कोणीही कुणाचा कायम मित्र नसतो, असतात ते कायम हितसंबंध" ही म्हण आपण ऐकली नसण्याचीच जास्त शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

काळू मामा... रागाच्या सल्लागार पदासाठी आपणच जास्त लायक दिसत आहात... ;) असो... चालु ध्या... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

In reply to by श्रीरंग_जोशी

हे कुठल्या वर्तमानपत्रात आले आहे, तेही कृपया सांगावे.

In reply to by प्रदीप

बातमीचा दुवा तुम्हाला मिळालेलाच आहे. थोडी एक्श्ट्रा माहिती सांगतो. आपल्या मनोरंजनाचे स्त्रोत असलेल्या माननीय श्री. सुब्रमनिअन स्वामी यांच्या सुपुत्री आहेत त्या पत्रकार. सुहासिनी ‘हैदर’

In reply to by नांदेडीअन

सुहासिनी ‘हैदर’ नी लिहिलेय का ते. धक्कादायकच आहे . बाकी सुसु मोदी सर्कार्च्याविरुद्ध कोर्टात जाणार होता ना ? राफेल डील विरुध्द ? काही नवीन बातमी आहे का ?

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदींच्या जागी मी असलो तर तसे बोलणार नाही. (म्हणूनच मला ती जागा मिळत नाही, हा मुद्दा वेगळा! ; ) ) तरी देखील एक लक्षात घेतले पाहीजे की ते अनिभांसमोर बोलत होते. त्यामुळे काही अंशी राजकीय भाषण करणारच. त्यात नवल अथवा दुर्दैवी असे काही नाही. अनिभांबरोबरचे कार्यक्रम आधीच्या कुठल्याच पंतप्रधानांनी केलेले नाहीत असे वाटते. कदाचीत इंदिरा गांधी सोडून. त् त्यामुळे तसे ऐकायला येणार नव्हते. पण अमर्त्य सेन आणि (तॄणमूल खासदार आणि हार्वर्ड प्राध्यापक ) सुगाता बोस यांनी "आम्ही बुद्धीवादी असल्याने आम्हालाच कसे माहीत आहे आणि तेच कसे खरे आहे" या संदर्भात इथल्या (बॉस्टनमधील) जाहीर सभात काय आणि कसे बोलले आहेत हे मी ऐकलेले आहे. असो.

In reply to by विकास

अनिभांसमोर असले तरी पंतप्रधान म्हणून अधिकृत परदेश दौरा होता म्हणूनच दुर्दैवी. बाकी भारतात काहीही झाले तरी मला भारतीय म्हणून देशाची लाज वाटणार नाही हे निश्चित. देशातील घडामोडींविषयी काळजी वाटेल, देशात सुधारणा व्हाव्यात असेही वाटेल पण देशाची लाज वाटते असे कधीही होणार नाही. गेल्या महिन्यात एक हजाराची नोट हा चित्रपट स्थानिक चित्रपट महोत्सवात पाहिला. पूर्ण भरलेल्या चित्रपटगृहात १० भारतीय देखील नव्हते. चित्रपट वास्तवावर आधारीत असला तरी चित्रपटातून भारताविषयी नकारात्मक चित्र परदेशी प्रेक्षकांपर्यंत पोचत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीहरी साठे यांच्याबरोबर प्रेक्षकांना प्रश्नोत्तरे करण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. बहुतेक प्रेक्षकांच्या प्रश्नात भारताविषयी नकारात्मकता होती (यात त्यांचा दोष आहे असे मला वाटत नाही). सुदैवाने शेवटचा का होईना प्रशन विचारण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी प्रश्न विचारण्याऐवजी मी वास्तववादी चित्रपटाबद्दल दिग्दर्शक व टीमला धन्यवाद दिले अन मग म्हंटले I would like to assure everyone here that there is one tool which is helping common and poor people in India to fight against exploitation. It is education. सुदैवाने ते बहुतेकांना पटले अन काही लोकांनी अनुमोदन दिल्याचे उद्गार काढले. नंतर दिग्दर्शक महोदयांनीही या गोष्टीला दुजोरा दिला व टाळ्यांच्या गजरात प्रश्नोत्तराच्या सत्राचा समारोप झाला.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी खाली त्यांच्या शांघायच्या भाषणाच्या सुरूवातीचे जे transcript दिलेले आहे, त्यात कुठेही 'तुम्हाला स्वतः भारतीय असल्याची लाज वाटत होती', असे मोदींनी म्हटल्याचे मलातरी दिसत नाही. तुम्ही दिलेल्या वर्तमानपत्राच्या बातमीत 'earlier you felt ashamed of being born Indian' असे त्यांनी म्हटल्याचे लिहीलेहे आहे. ह्या दोन गोष्टीत तफावत आहे, नाही का?

In reply to by प्रदीप

बातमीदाराने स्वतःची अक्कल पाजळली नाहीतर तो पत्रकार कसा ठरेल? बरं झालं आजकाल या मिडीयाच्या तोंडात मारायला युट्युबवैगेरे गोष्टी आहेत. मागेही भागवतांच्या स्त्री-पुरुष विषयीच्या विधानाचं कोंबडं करून चार दिवस नाचवत होते. पुर्ण भाषण ऐकल्यावर कळलं अरे हे तर काही भलतंच आहे. मीडीयाला काहीतरी सनसनाटी, आक्षेपार्ह केल्याशिवाय जेवण जात नसेल. किंवा तो पोपचा जोक म्हणजे पत्रकारितेचं बायबल आहे असं खरंच यांना वाटत असेल. आजकाल तर कुणाचं काहीही वादग्रस्त विधान हे वादग्रस्त नाहीच असे मी मनातल्या मनात स्वत:ला बजावत असतो. उगाच त्यांच्या टुकार खेळात आपल्या मेंदुचा चेंडू का होऊ द्यावा?