रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.
पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता
घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.
माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...
कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4970
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह
+++१११
In reply to व्वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
यातली नेमकी भावना मला कळाली
सुरेख कविता.मिपावर स्वागत
सुन्न करणारी कविता !
कविता सुंदर आणि खोल
नेमक्या याच कडव्याचा अर्थ
In reply to कविता सुंदर आणि खोल by गणेशा
ही कविता खुप सुंदर आहे,
In reply to नेमक्या याच कडव्याचा अर्थ by कहर
अगदी सुन्दर कविता.. वेदनेचा
अप्रतिम शब्द निवड. खुप आवडली कविता.
नेमके झाले काय
पहिल्या छूट
धन्यवाद सर्वांचे...
धन्यवाद सर्वांचे...
जोरदार
कविता आवडली. सत्य परिस्थिती.
थोड्या शब्दात
@चाणक्य हो मी तसा प्रयत्न
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
अफाट कविता आहे. सलाम
अतिशय सुन्दर!
आशयपूर्ण कविता, शब्द वेचून
@किसन