३. नको येवुस पोरी
२. नको बोलु बाबा काही
१. हरवली पोर माझी कविता नावाची !
मनोगतः शेवटी बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले होते.. तुमच्या सर्वांचे आभार.
-
तुझ्या डोळ्यात बरसुन... कोरडीच ही कविता
आसवांच्या ओळींसंगे बाबा... गहिवरलेली तुझी कविता
मिटल्या पापण्यांच्या स्वप्नांत... अडखळणारी ही कविता
तुझ्या आठवांच्या थेंबानी.. हेलावणारी तुझीच कविता
माझं माहेर देऊळ
तुच होता मायबाप
क्षीण नसे कधी भाव
तिथं पिर्तीचे होते गाव
बोल ना रे बाबा काही
सांग ना रे काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
रातीच्या गच्च पहार्यात... तव आठवांची ही टिपुस कविता
वेदनेच्या अस्तित्व डोहात...खोल बुडालेली तुझी कविता
डोंगरायेव्हड्या दु:खात सार्या... तुझ्यासाठी हसणारी ही कविता
तुझ्याच साठी आज मात्र... शेवटचं रडणारी तुझीच कविता
प्राजक्ताच्या फुलांनी
दिले सर्वस्व झोकुनी
चालावे का मी तुझ्यामागे
सांग त्याच वाटेनी
आसवांच्या पालखीत
तव स्वप्नांची मुर्ती
क्षितिजापल्याड उडलेले
रिक्त भावनेंचे पक्षी
बोल ना रे बाबा काही
सांग ना रे काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
--शब्दमेघ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5775
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मर
मस्त....
गरजेचे नव्हते खरे.. पण सर्व
In reply to मस्त.... by ज्ञानोबाचे पैजार
तू
सुंदर आहे कविता.
:( का रे असं ?????
शेवट झालाच .. शेवटी!
धन्यवाद , सर्वांना त्या
इतर कविता वाचता वाचता, आपली
लिहित जा रे कविता.
In reply to इतर कविता वाचता वाचता, आपली by गणेशा
धन्यवाद वल्ली मित्रा ..
In reply to लिहित जा रे कविता. by प्रचेतस
धन्यवाद वल्ली मित्रा ..
In reply to लिहित जा रे कविता. by प्रचेतस
माझीही विडंबने संपली आता :)
In reply to धन्यवाद वल्ली मित्रा .. by गणेशा
मलाही असंच वाटलं होतं काही
In reply to इतर कविता वाचता वाचता, आपली by गणेशा