Skip to main content

मग कळेल मझा...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 13/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तू काही माझं ऐकणार नाहीस मीही आपला हट्ट सोडणार नाही... तू घरात बसून.... बायकोच्या हातची भजी खात, समाजातल्या विकृतींवर बोलणार... वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार जमलंच तर झणझणीत कविता पाडणार मला नाहीच रे जमणार... तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला आत एक अन बाहेर एक जमवायला आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार नाही रे जमत मला असं जगणं हे असं..., कौलातून झिरपणार्‍या.. थेंबभर कवडशांच्या मागे धावणं... केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घे... मग कळेल मझा... बेभान होवून जगण्यातला 'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला ! विशाल
लेखनविषय:

वाचने 2378
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तुम्ही सुरेश वाडकरांचे फ्यान आहात का? फ्यान नाही म्हणता येणार. पण त्यांची 'चप्पा चप्पा' सारखी गाणी आवडतात ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

रच्च्याक त्या 'मझा' साठी विचारताय का? तर नाही. हा शब्द आमचे आंतरजालीय कवि मित्र गिरीश कुळकर्णी नेहमी वापरायचे. ते नागपूरकर आहेत. त्यांची 'मझा' या शब्दाचा उच्चार करण्याची पद्धत मला जाम आवडते. त्यांच्यापासून हा 'शब्द' उचललाय. इथे 'ती' मजा नाहीये, तर 'तो' मझा आहे ;)

@मग कळेल मझा... बेभान होवून जगण्यातला 'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला ! >> येकदम सहमत! मस्स्स्स्स्स्त कडक कविता.

हे असं..., कौलातून झिरपणार्‍या.. थेंबभर कवडशांच्या मागे धावणं... केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घे...
मस्त एकदम .. सहज ओघवती पण विचार करायला लावणारी कविता.. आवडली एकदम

कल्पना आणि शब्दयोजना एकदम मस्त!

कल्पना आणि शब्दयोजना एकदम मस्त!

मझा नाही अला . :- \
'मी'ला विसरून
>>>> श्या ह्यात काय मजा ??

In reply to by प्रसाद गोडबोले

श्या ह्यात काय मजा ?? पंत, इथे 'मी'चा अर्थ 'स्वत्व' असा नसून 'अहं' असा वाचा, मग 'मी;ला विसरण्यातील 'मझा' लक्षात येइल. तो सहजासहजी विसरता येत नाही. कारण तो आपल्या व्यक्तीमत्वाचा एक मुलभूत घटक आहे. पण तो जर विसरता आला तर जे साधता येतं त्याला तोड नाही.