३. नको येवुस पोरी
लेखनविषय:
नको बोलु बाबा काही
काय सांगतील पोरी
या आसवांच्या ओळी
दु:खाच्या खाणीत
तव स्वप्नांची होळी
नको येवुस माहेराला
अवकळा सारी
क्षीण आहे भाव अन
जीव झाला भारी
सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
नाही काही इथं
सार सार संपल
तुझ्या पिर्तीची ओढ
बस हीच जीवन वेल
- शब्दमेघ
वाचने
3369
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर.
In reply to सुंदर. by चित्रगुप्त
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by गणेशा
साहित्य आणि चित्रकला
खासचं
मस्त
शब्दमेघच!
कवितामालिका आवडली.
In reply to कवितामालिका आवडली. by प्यारे१
बदल आवडला ! परंतु थोडासा भाव
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsउच्च कविता.
In reply to उच्च कविता. by प्रचेतस
+१
खूप सुंदर! प्रचंड आवडली!