२. नको बोलु बाबा काही
लेखनविषय:
१. हरवली पोर माझी
----------------------
नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
हातानी तुझ्या जेंव्हा
मला भरवला घास
कामामध्ये असे तुझ्या
फक्त माझाच ध्यास
कसे विसरेल बाबा
तुझी करुण कहानी
फाटलेल्या सदर्यात
विनलेली नाती
धुळीमधी माखलेली
तुझी जिंदगाणी
आधाराची परि माझ्या
प्रेमाची सावली
अंगणात विसावता
मायेची अंगाई
वेड्या या पोरीची
बाबा तुच विठाई
प्राजक्ताच्या सड्यामध्ये
होती ओघळली कविता
सासराला जाताना
तुझी रडवेली बोली
फाटक्या या संसाराला
ठिगळाची घाई
दूराव्याच्या अंतरात
जीव जाळीत राहि
नको बोलु बाबा काही
नको सांगु काही
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई
रडवेली लेक तुझी
सांग कुठवर जाई !!
वाचने
3881
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अप्रतिम.
सुरेख...
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.आवडली!!!!!
का
हळवे करणारी सुरेख कविता.
__/\__
मस्त रे गणेशा
दोन्ही छानच !!
भावस्पर्शी
नि:शब्द ....
सुंदर
सर्वांचे मनपुर्वक आभार
खुप सुरेख कविता
खूप आवडली...
हळवी कविता..