Skip to main content

अलविदा मागील वर्ष......

लेखक निनाद जोशी यांनी मंगळवार, 12/05/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागे राहिलेले वर्ष सुख दु:खानी भिजले काही उल्हासाचे क्षण काही काळोखी विरले वर्तमान हा कालचा आज भूतकाळ झाला आठवणीच्या सोबती नभी नवा सूर्य आला त्याचे दर्शन घेतले डोळे किलकिले करून त्यास म्हणालो ए दादा झोप झाली ना अजून थोडी उतरुदे धुंदी काल सरल्या वर्षाची थोडी ओळख होऊ दे मज कालच्या स्वतःची तुही झोप कि थोडासा जरा आराम कर ना मज सरत्या वर्षाला शेवटचे पाहू दे ना आधी मित्राला मी माझ्या मनामध्ये साठवतो मग तुला पहावया माझे डोळे उघडतो चल जाऊ दे मी केला त्याला बाय बाय आता येरे तू करण्या नव्या मित्राची सोय.....
लेखनविषय:

वाचने 609
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान..... पण थोडी अस्ताव्यस्त वाटली.