Skip to main content

कोल्हापूर कट्टा . .

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 22/04/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव

वाचने 56915
प्रतिक्रिया 305

प्रतिक्रिया

प्रत्येक सेकंदाचे अपडेट देण्याची गरज नाही, उगीच आम्हाला जळजळ! यशो जात नाहीये म्हणून भारी वैट्ट वाटण्यात आल्या गेले आहे. जरा गेली अस्तीस तर काय बिघडलं असतं?

In reply to by रेवती

हो ना ! आम्ही तलवारी बिलवारी धार काढून तय्यार ठेवल्या होत्या +))

In reply to by यशोधरा

रेफरन्स नाही कल्ला . पण धम्या म्हणजे काही तरी भन्नाट असणार नक्की :D

In reply to by अद्द्या

धम्या = धमाल मुलगा. एकेकाळचा लोकप्रिय मिपाकर (अजूनही लोकप्रियता कमी झालेली नसली तरी मिपावर सक्रीय नसल्याने नव्या लोकांना त्याच्याबद्दल ठाऊक नाही) पण त्याच्याच शब्दांत मिपाच्या वृद्धाश्रमातील एक सदस्य ;-) .

In reply to by अद्द्या

मेवे = मेघवेडा बिंगून पाहिले असता हा धागा अग्रस्थानी मिळाला - बेसिंगस्टोक मेळावा २०१०!

अबे ओ अद्द्या... कट्टे पे कितने मिपाकर गोळा हुवे थे ? ;) - -- --- ---- अजुन फकस्त ४ प्रतिसाद देणे की जरुरत हय रं बाबा... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

समस्त उपस्थित अनुपस्थित कट्टेकर्‍यांचे तांबडा पांढरा रस्सा, मिसळ आणि कोल्हापुरी साज देऊन सत्कार करण्यात येत आहेत!

च्यायला...!! मुळचा कोल्हापूरचा असून सुद्धा ह्या कट्ट्याला येऊ शकलो नाही. याची खंत मात्र कायम राहील.