✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निरभ्र

श
श्रावण मोडक यांनी
Tue, 11/25/2008 - 12:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4739 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/25/2008 - 12:57 नवीन

मस्तचं

मस्तचं !! *** बाकी एक अगाऊ सुचना ! व्याकरणाची काळजी घेत लिहणे सोडा... मनमोकळेपणा दिसत नाही आहे लेखनात... एकदम छापील वाचत आहे असे वाटते कधी कधी .. ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 11/25/2008 - 13:10 नवीन

खूप तरल..

खूप तरल लिहिले आहेत, आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टायगर Tue, 11/25/2008 - 14:29 नवीन

कॉपी नको

लिखाण खूपच बांधीव वाटते. विषय हळवा असूनही त्यात ओलावा वाटत नाही. लिखाणातील शुष्कपणा जाणवतो. संदर्भही तपासा. "सहेला' रे आणि भैरवीचा काहीही संबंध नाही. तसंच चित्र म्हणजे साधारणपणे भैरवी. विरहाचेच सूर. हे वाक्‍य खूपच खटकते. संगीत माहीत किंवा येत असेल, तरच त्याचा वापर केलेला बरा. कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून त्याची कॉपी नको. अडॉप्टेशन करतानाही अभ्यास करावा लागतो.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 11/25/2008 - 14:46 नवीन

आभारी आहे

आपल्या प्रतिसादाबद्दल. "सहेला' रे आणि भैरवीचा काहीही संबंध नाही. सहेला रे म्हणजे भैरवी नव्हेच. तसं कुठंही म्हटलेलं नाही. तुम्हाला तसं दिसत असल्यास वेगळं. सहेला रे माझ्या (अल्प)माहितीनुसार (माहिती बरं, ज्ञान नव्हे) भूप रागात आहे. एक लेखक म्हणून संगीताचा मी ज्ञानी आहे असं कुठंही म्हटलेलं नाही. तसं तुम्हाला दिसत असल्यास भाग वेगळा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसंच चित्र म्हणजे साधारणपणे भैरवी. विरहाचेच सूर. हे वाक्‍य खूपच खटकते. खटकण्यास माझी काहीही हरकत नाही. पाहणाऱ्याच्या दृष्टिकोणावर (की दृष्टिकोनावर) अवलंबून. माझे सारेच पटावे असा आग्रह किंवा हट्ट नाहीच. कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून त्याची कॉपी नको. हाहाहाहा. तुमच्याच शब्दांत सांगायचं तर "अभ्यास करावा लागतो." हे खरंच. बाकी अभ्यासाअभावी मी फारसं बोलू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टायगर
ट
टायगर Tue, 11/25/2008 - 15:09 नवीन

चालू द्या

स्वत:वर फारच फिदा दिसताय. बराय चालू द्या. असंच "लित' रावा!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 11/25/2008 - 16:08 नवीन

लेख

आवडला. शब्दांच्या पलीकडचे काही शब्दांत किंवा रेषांत पकडण्याचा प्रयत्न, त्यातली तगमग सुरेख 'रेखाटली ' आहे. 'सहेला रे'चे योजनही अगदी चपखल. अशा वेळी सार्‍या कलांना संगीत बनायचे असते, ह्या विधानातला खरेपणा पटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/25/2008 - 22:39 नवीन

असेच म्हणतो !!

नंदनशी सहमत आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
भ
भाग्यश्री Tue, 11/25/2008 - 23:50 नवीन

नंदनशी

नंदनशी सहमत.. असेच वाटले वाचताना! खूप आवडला लेख! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मुक्तसुनीत Tue, 11/25/2008 - 23:56 नवीन

+१

हेच म्हणतो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
घ
घाटावरचे भट Tue, 11/25/2008 - 23:58 नवीन

'सहेला रे'

'सहेला रे' मधली भावना आर्त वगैरे आहे काय? मला नाही वाटत. मुळात भूप तितका आर्जवी प्रकृतीचा राग आहे काय? ते डिपार्टमेंट शुद्ध कल्याणाचे नव्हे काय? बाकी मुक्तक छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विसोबा खेचर Wed, 11/26/2008 - 00:09 नवीन

'सहेला रे'

'सहेला रे' मधली भावना आर्त वगैरे आहे काय? मला नाही वाटत. मल सहेला रे मधली भावना निश्चितच आर्त वाटते. सहेला रे आर्त तर आहेच, परंतु त्याहूनही खूप काही सांगणारं आहे असं मला वाटतं.. मुळात भूप तितका आर्जवी प्रकृतीचा राग आहे काय? ते डिपार्टमेंट शुद्ध कल्याणाचे नव्हे काय? असंच काही नाही, भूपातही खूप काही आहे.. आणि मुळात आर्जव हा शब्द सापेक्ष आहे... भूपासारख्या रागात एखाद्याला आर्जवही दिसू शकतं/दिसत असेल... शुद्ध कल्याणची गोडी वेगळी, भूपाची वेगळी..स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं.. ढोबळ मानाने म्हणायचं झालं तर ठराविक भाव-भावना ठराविक रागात दिसतात. परंतु एखादा राग म्हणजे एखाद्या भावनेचं डिपार्टमेन्ट आहे असंच काही म्हणता येणार नाही.. आपला, (भूप, शुद्धकल्याण आणि देशकार या तीनही रागांचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
व
विसोबा खेचर Wed, 11/26/2008 - 00:16 नवीन

स्वरात

स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं.. आणि मु़ळात वर म्हटल्याप्रमाणे भूपात आणि शुद्धकल्यणात बरचंसं साधर्म्य असलं तरी शुद्धकल्याणात अवरोही यमन आहे त्यामुळे भूपाचा अणि शुद्धकल्याणाचा स्वभाव वेगळा आहे... आमच्या किराण्याच्या शुद्धकल्याणाची गोडी काही औरच हे निश्चित, परंतु ग्वाल्हेरचा भूप देखील तेवढाच सुंदर आहे! असो.. आपला, (किराणा-ग्वाल्हेर प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Wed, 11/26/2008 - 00:26 नवीन

>>सहेला रे

>>सहेला रे आर्त तर आहेच, परंतु त्याहूनही खूप काही सांगणारं आहे असं मला वाटतं.. मला 'सहेला रे' चा हा पैलू जास्त ठळक जाणवतो, त्यातल्या आर्ततेपेक्षाही. >>स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं.. सहमत. परंतु एखाद्या रागाच्या प्रकृतीशी न जुळणारे बोल असलेली बंदिश एखाद्या रागात तितक्या परिणामकारकपणे कॅरी होऊ शकते काय? (हा जनरल प्रश्न आहे. 'सहेला रे'चा संबंध नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Tue, 11/25/2008 - 23:57 नवीन

खूप आवडलं

खूप आवडलं लिखाण. शब्दांच्या पलिकडली तगमग किती तरलपणे शब्दांत पकडली आहे!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/26/2008 - 00:12 नवीन

श्रावणराव,

श्रावणराव, छानच लेख..! आपला, (किशोरीताईंचा आणि त्यान्च्या 'सहेला रे..' चा निस्सिम चाहता) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/26/2008 - 02:05 नवीन

व्वा!

फारच सुरेख मुक्तक. सहेला रे... चा अगदी योग्य वापर केला आहे. सुरेख रेखाटन भावनांच्या चित्राचं शब्दांमध्ये..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/26/2008 - 12:18 नवीन

छानच

छानच लिहिलंय!! कालच बघीतले होते पण वेळ नव्हता म्हणून आज पुन्हा नीट वाचून काढले. मला स्वतःला रागांतले काही समजत नाही, त्यामुळे त्यावर बोलणे अयोग्य! अर्थात् गाण्यातला भाव समजतो, त्यातही मी आनंदी आहे!! :) एक तरल, अलवार हुरहुर दिसते; कवितेचा प्रवास दिसतो, अन् वेदनेतून आनंदाकडे जाणारी वाटही दिसते! खूप छान लेखन!! शुभेच्छा. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 11/26/2008 - 19:33 नवीन

धन्यवाद

सर्वांनाच धन्यवाद. राजे : मी व्याकरणात पडतच नाही. तशा काही चुका दिसतीलही, याच नव्हे तर इतर लेखनातही. आपसूक काही 'शुद्ध' लेखन झाले असेल तर तो डोक्यात आणि हातात बसलेल्या 'शिस्ती'चा परिणाम आहे. त्याला आता इलाज नाही. अर्थात, त्यामुळे लेखन शुष्क, कोरडे होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तशा जागा दाखवल्यात तर नेमके समजून घेता येईल. विसोबा आणि घाटावरचे भट : 'सहेला' मला आर्त वाटत आलं आहे. आणि लेखकाच्या भूमिकेतून तेच इथं उमटलं. पण आणखी एक भाग असा की, ही व्यक्तिरेखा मुळात जी आहे, तिची तीच धारणा आहे. अगदी काही म्हटलं तरी, आर्तता आणि आर्जव हे भाव तसे जवळचेच. त्यामुळं एक निश्चित, की इथं त्या विशिष्ट आविष्कारात 'सहेला' अस्वस्थ (आणि अंतर्मुखही) करतं. आणखी एक निश्चित की, एखाद्या कलाविष्कारातून ग्रहणकर्त्याच्या मनात निर्माण होणारे भाव वेगवेगळे असू शकतील. कारण हे सारे अखेर व्यक्तिसापेक्ष असते आणि शिवाय, त्या-त्या कलाविष्काराच्या प्रत्येक ग्रहणाची अनुभूती वेगळी असूही शकेल. त्यात पहिल्या खेपेस घेतलेला अनुभव आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्ये येणारा अनुभव छटेमध्ये वेगळा असू शकेलही. बाकी रागांविषयी मी अज्ञच. हे स्पष्टीकरण नव्हे; पण थोडीशी आटोपशीर, मुद्देसूद चर्चा झालेली असल्याने माझी भर. बाकी, हा तुकडा मी कथा म्हणून प्रकाशित केला. याला लेख म्हणावे की काय असा प्रश्न आता पडला आहे. प्राजू यांनी मुक्तक हा चांगला शब्द टाकला (माझ्यासारख्या संभ्रमित लेखकांसाठी ती एक सुरेख पळवाटच असते).
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा