Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Fri, 04/10/2015 - 18:38
काव्याचा ब्लॉग दुवा हा || शिवराय बोलले आज || वेळ आहे का थोडा चार शब्द सांगायचेत राहवत नाही म्हणून काही जबाब मागायचेत आधी आभार मानतो मोठं केलत मला पण खरंच सांगतो तुम्ही खोटं केलत मला अवघ्या तुमच्या जीवनात व्यापून टाकलत मला मनात सोडून सगळीकडे छापून टाकलत मला नाव माझं घेतलत सण माझे केलेत माझे छावे म्हणून राडे सुद्धा केलेत एवढ्यावर थांबला नाहीत मला देवासोबत बसवलत वाईट वाटतंय म्हणताना पण तुम्ही मला फसवलत माझे विचार घेतले नाहीत माझे आचार घेतले नाहीत चरित्र माझं ओरबाडलत पण त्याचे सार घेतले नाहीत नुसते प्रताप आठवू नका रे तत्व सुद्धा जपा स्मारक पुतळे झगमग नको माझे किल्ले जपा निष्ठा धैर्य न्याय नीती तत्व माझी कुठे गेली? अरे तुम्ही सगळे माझेच ना मग तुमची एकी कुठे गेली? काय नक्की साधायचंय कशात भूषण आहे हा विचार केला नाहीत तर सगळंच कठीण आहे स्वाभिमानात सामर्थ्य आहे त्याच्या जागी माज नको आणि आहे जिथे स्वाभिमान तिथे मुळीच लाज नको असो; याहून काय सांगू तुमचा काळ वेगळा आहे पण असे नका वागू ज्याने मला वाटेल मी एकटा आहे - अपूर्व ओक

Submitted by स्पा on Fri, 04/10/2015 - 19:25

Permalink

चाण चाण णिबंढयुक्त काव्य

चाण चाण णिबंढयुक्त काव्य
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/12/2015 - 15:36

In reply to चाण चाण णिबंढयुक्त काव्य by स्पा

Permalink

अगडि अगडि!

अगडि अगडि!
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 04/10/2015 - 20:08

Permalink

निष्ठा धैर्य न्याय नीती

निष्ठा धैर्य न्याय नीती तत्व माझी कुठे गेली? अरे तुम्ही सगळे माझेच ना मग तुमची एकी कुठे गेली? आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 04/10/2015 - 20:31

Permalink

मस्तय

मस्तय
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 04/10/2015 - 20:32

Permalink

आवडली

आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 04/10/2015 - 20:44

Permalink

आवडलं रे.

आवडलं रे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 04/10/2015 - 20:49

Permalink

काव्य आवडलं !

काव्य आवडलं !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/11/2015 - 00:07

Permalink

ताजा हाल की बातों को अच्छी

ताजा हाल की बातों को अच्छी तरह से उतारा है आपने .........सिर्फ आप शायर होते तो बात और होती!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sat, 04/11/2015 - 08:48

In reply to ताजा हाल की बातों को अच्छी by अत्रुप्त आत्मा

Permalink

सुना देता कोई चंद अशार शौक़ से

सुना देता कोई चंद अशार शौक़ से उर्दू की भी बात होती तो और बात होती
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on Sat, 04/11/2015 - 09:19

In reply to सुना देता कोई चंद अशार शौक़ से by वेल्लाभट

Permalink

ईरशाद!

ईरशाद!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sat, 04/11/2015 - 13:29

In reply to ईरशाद! by पॉइंट ब्लँक

Permalink

तो ठीक है...

मराठेतर काही पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व. एक ग़ज़ल पेश-ए-ख़िदमत है.. कुछ बातें है जो पराये नही जानते अपने जो बिना बताये नही जानते तजुर्बे कई अज़ीज़ोंके कर लिये लोग मेरे ग़मोंकी दवायें नही जानते चुभते है रोज़ ख़याल हमें दिल में हर बात को कैसे भुलाये नही जानते खुश है, जो दुनिया से जुदा रहते है रात की ज़ुल्मत, दिन के साये नही जानते ज़िंदा है अभी तक धडकन है क़ायम किसने है की मगर दुवाएं नही जानते अजीब है दुनिया का चलन हुआ ज़ियाद ये हाल है, हम अपने-परायें नही जानते -ज़ियाद
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on Sat, 04/11/2015 - 15:26

In reply to तो ठीक है... by वेल्लाभट

Permalink

लै भारि !

लै भारि !
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 04/11/2015 - 16:23

In reply to तो ठीक है... by वेल्लाभट

Permalink

माशाल्ला खुदा खॆर करे

माशाल्ला खुदा खॆर करे
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sun, 04/12/2015 - 12:46

In reply to माशाल्ला खुदा खॆर करे by स्पा

Permalink

बहोत शुक्रिया

बहोत शुक्रिया
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 04/12/2015 - 15:12

In reply to तो ठीक है... by वेल्लाभट

Permalink

जबराट..!

जबराट..!
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Fri, 05/08/2015 - 17:08

In reply to तो ठीक है... by वेल्लाभट

Permalink

मस्त!

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on Sat, 04/11/2015 - 07:23

Permalink

विचार छान मांडलेत.

विचार छान मांडलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विअर्ड विक्स on Sat, 04/11/2015 - 15:16

Permalink

काव्य आवडले ……

काव्य आवडले …… भाव न जाणुनी शब्दांची गुंफण पाहिली, भाव मोल न जाणुनी वृत्तांची कुंपण घातली. पद्य गद्य काही असेना , तृप्ती का न जाहली हर्ष आम्हासी आज , अपूर्व ने सद्य स्थिती ताडली.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sat, 04/11/2015 - 15:20

Permalink

सगळ्यांचे खूप आभार :)

सगळ्यांचे खूप आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sat, 04/11/2015 - 23:48

Permalink

अगदी मस्त चपराक.........

निष्ठा धैर्य न्याय नीती तत्व माझी कुठे गेली? अरे तुम्ही सगळे माझेच ना मग तुमची एकी कुठे गेली? ह्या ओळी जबरदस्त
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sun, 04/12/2015 - 12:46

In reply to अगदी मस्त चपराक......... by एक एकटा एकटाच

Permalink

:)

धन्यवाद्स
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Mon, 04/20/2015 - 16:21

In reply to :) by वेल्लाभट

Permalink

तुमची ही कविता

तुमची ही कविता Whatsapp वर फेमस झाली आहे. गेल्या दोन दिवसात ३ वेगवेगळ्या ग्रुपमधुन रिसीव्ह झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 05/08/2015 - 17:21

In reply to तुमची ही कविता by एक एकटा एकटाच

Permalink

हं....

हं.... प्रतिसाद उशीरा वाचतोय. हा तुमचा प्रतिसाद वाचण्यापूर्वीच मला एका नातेवाईकाने ही कल्पना दिलीन. पण वाईट इतकंच की नाव काढून्/बदलून अशा गोष्टी फॉरवर्ड होतात. असो. हे असं चौर्यकर्म भारी चालतं. माझ्या ब्लॉगवर मी प्रदर्शित केलेली आहेच. बाकी फेमस झाली तर हवीच आहे की.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 05/08/2015 - 17:02

Permalink

अप्रतिम कविता ... मनापासुन

अप्रतिम कविता ... मनापासुन आवडली.. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.. तरी आपल्याच विचारात जगणार्यांचीच आजकाल राजेशाही आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 05/08/2015 - 17:23

In reply to अप्रतिम कविता ... मनापासुन by गणेशा

Permalink

आभार :)

आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sat, 05/09/2015 - 06:56

Permalink

ही कविता तुमच्या नावाशिवाय

ही कविता तुमच्या नावाशिवाय दोन तीन वेळा कस्काय्वर आली. वाइट वाटले
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sat, 05/09/2015 - 08:38

In reply to ही कविता तुमच्या नावाशिवाय by प्राची अश्विनी

Permalink

हं......

वरती म्हटल्याप्रमाणेच. काय करणार ! यापुढे सगळं क्वापिराईट करायचा विचार करतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 05/09/2015 - 09:49

Permalink

सुंदर !!!

कविता आवडली. शाळेच्या दिवसांमधला कितवीलातरी असलेला "महापुरुषांचा पराभव" हा धडा आठवतो अशा वेळी. महापुरुषांच्या मृत्यूनंतर मागे उरतात ते त्यांचे विचार. या विचारांची पायमल्ली त्या महापुरुषाचे नाव घेणारे त्याचे अनुयायीच करतात. हा एक प्रकारे त्या अनुयायांनी त्या महापुरुषाचा केलेला पराभव असतो. माधव ज्युलियनांची एक ओळ पुन्हा पुन्हा आठवते, "पुर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून का?"
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5111 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com