मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रॉ मँगो राईस (कैरी-भात)

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात असेल तरी चालेल) १ वाटी कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्तं घ्यावे) २ हिरव्या मिरच्या चिरून कढीपत्ता २-३ लाल सुक्या मिरच्या १ टीस्पून मोहरी १ टीस्पून चणाडाळ १ टीस्पून उडदाची डाळ १/४ टीस्पून मेथीदाणे १/४ टीस्पून हिंग १ टीस्पून हळद १ टेस्पून काजू (तुम्ही शेंगदाणे ही वापरु शकता) मीठ चवीनुसार खोबरेल तेल (रोजचे वापरातले तेल घेतले तरी चालेल) . पाकृ: भांड्यात खोबरेल तेल गरम करून मोहरी. मेथ्या, डाळी व हिंगाची फोडणी करावी. डाळी लालसर परतल्या गेल्या की त्यात हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता व काजू घालून परतून घ्यावे. आता त्यात हळद घालून वरून शिजवलेला भात घालावा व मिक्स करावे. आता त्यात कैरीचा कीस, मीठ घालून हलके मिक्स करुन घ्यावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी. . हा भात तुम्ही लोणचं, पापड किंवा रस्समसोबत सर्व्ह करु शकता. आधी करुन ठेवला तर कैरीचा स्वाद छान मुरेल. .

वाचने 13859 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by स्मिता श्रीपाद

टीप आवडली पुढल्या वेळेस तसे करेन :) पण मी जनरली फोडणी खोबरेल तेलाची करते त्यामुळे त्याचा स्वाद ही छान येतो. धन्यवाद.

In reply to by नूतन सावंत

माहितगार Wed, 05/06/2015 - 15:46
छायाचित्रांनी भूक छान चाळवली, जरासे मेतकुट अ‍ॅडवण्याचा ऑप्शन वापरल्यास तेलकटपणा शोषला जातो आणि मेतकुटाचा खमंगपणाही येतो. आम्हीही या कैरीखीस भातास चित्रान्नच म्हणतो, चित्रान्न हा शब्द कोण कोणत्या भागात वापरतात ?

In reply to by माहितगार

पैसा Wed, 05/06/2015 - 16:26
मला वाटते चित्रान्ना हा कानडी शब्द आहे.

पैसा Wed, 05/06/2015 - 15:45
मस्तय! मला खूप आवडतो! फोटो आणि डिटेल पाकृ एकदम झक्कास!

In reply to by रायनची आई

माहितगार Wed, 05/06/2015 - 16:54
गूळ कसा घालता येईल कल्पना नाही (गूळ वा साखर अ‍ॅडवल्याने साखरभाताचा टच येईल ?). मुख्य मुद्दा, हा पदार्थ जरासा तरी आंबटपणा आवडून जाणार्‍यांसाठी अहाहा असा सुखकर आहे, आंबट कमी आवडत असल्यास कैरीचा खीस कमी घालणे हाच पर्याय. त्यातली कैरी वजा केली की फोडणीचा भात होईल हे वेगळे सांगणे न लगे :)

In reply to by माहितगार

अगदी बरोबर माहितगार :) धन्यवाद बाकी रायनची आई तुम्ही लेमन राईस कधी खाल्ला आहे का? त्याप्रमाणेच लागतो हा ही आणि कैरीचे प्रमाण आपल्या चवाप्रमाणे बसवू शकता :)

अजया Wed, 05/06/2015 - 18:39
आज आत्ता ताबडतोब करण्यात येत आहे.सकाळचा भात आणि शेजार्यांच्या झाडाची कैरी असा कच्चा माल तयार आहे!!

स्वाती दिनेश Wed, 05/06/2015 - 20:04
मस्त! कैरीभात आवडता आहेच.. आता मैत्रिण येणार आहे तेव्हा कैरीभात करेन. स्वाती

hitesh गुरुवार, 05/07/2015 - 10:37
पण ते तेलाचं सरोवर बघुन जीव खालीवर होतोय. इतकं तेल !

In reply to by hitesh

माहितगार गुरुवार, 05/07/2015 - 11:08
त्यांनी फोडणीत दाणे, दाळी, आणि काजू वापरले आहेत ते तळल्या जाण्यासाठी सहाजिक तेल अधिक वापरले जाणार, दाळींएवजी भट्टीतल दाळं (दाळव) , दाणे काजू नुसते अ‍ॅडवले + भात जरासा ओलसर असेल तर अगदी कमी तेलाच्या फोडणी वर चालवता येते. आणि उरलेला तेलकटपणाचा फिलही घालवण्यासाठी मेतकुट अ‍ॅडवणे हा उत्तम पर्याय असू शकेल.

In reply to by hitesh

सानिकास्वप्निल गुरुवार, 05/07/2015 - 11:23
दोन वाट्यांचा भात असल्यामुळे व फोडणीत इतर जिन्न्स असल्यामुळे तेल त्याप्रमाणे घेतले आहे. तुम्ही सगळं प्रमाण स्वत:च्या आवडीनुसार घेऊ शकता :)