'' अरे, ऐकतोस ना रे...''
एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं.
'क्षणा' चा हि विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...
रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते ..
पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. .
रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती.
डब्यात कमी अधिक रेलचेल होती.
हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली .
कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं. कुणी एकांतात हरवलं होतं.
आम्ही हि आजच्या दिवसभरातल्या गोडव्यात अगदी मंत्रमुग्ध झालो होतो.
निसर्गाने देऊ केलेला आनंदाचा रसाळ प्याला नुकताच प्राशन करून मनं तृप्त झालं होतं.
त्यामुळे तना- मनात आनंदाचे लहरी वारे अगदी सुसाट वेगाने वाहू लागले होते.
म्हणावं तर आजचा ट्रेक अगदी प्रसन्नतेच्या वावटळात फिरक्या घेत पूर्ण झाला होता .
निसर्गाने आज असे काही रंग उधलेले होते कि काय बोलावं अन काय नाही, अशी ह्या मनाची स्थिती झाली होती.
किती सुंदर वातावरण होतं ते ..!
न बोलविता हि , ‘ कधीही , अवेळी दाखल होणाऱ्या पाहुण्या मंडळीसारखा हा वेडापाऊस...
कधी रिमझिम कधी धो धो बरसत लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतो .
तर दुसरीकडे जीव सृष्टीला ना ना विविध अलंकार परिधान करत लोकांकडूनच अमाप सौंदर्याची वाहः वाहः अन कौतुकाची वारेमाप थाप मिळवत राहतो.
आजचा आमचा दिवस अश्याच अलंकार चढवलेल्या लावण्यावती प्रमाणे नटाटला होता.
त्याने सगळेच मोहित झालो होतो. सृष्टी सौंदर्याचे अमाप सुख मनी ढवळत होतो.
त्यातच रममान होतो ...
तोच एकाकी ..हृदय पिळावनारं वाक्य कानी पडलं.
'अरे, ऐकतोस ना रे '
क्षणात ह्या वाक्यांनी हृदयावर एक घाव घातला अन वेदनेची ठिकरी उडाली..
नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.
एखाद्या फळा फुलांनी बहरलेल्या, अन गर्द छायेंनी नेहमीच
आपलसं करणाऱ्या, ' वृक्षावर 'आपल्या नजरेदेखत कुर्हाडीचा कत्तली घाव पडावा अन काळजात कळीची चर्र उठावी तशी काहीशी स्थिती झाली होती. काळजाला एक एक शब्द ते भिडले होते.
'अरे, ऐकतोस ना रे... , ऐक ना , थांब ना ..'
ती माउली कळकळीने हाक देत होती. आपल्या पाठमोऱ्या मुलाकडे पाहत.
पण तो तसाच चालत सुटला , आईचे ते बोल ऐकूनही न ऐकल्यासारखं करत, मागे जराही वळून न बघता ..
तेंव्हा मनात विचारांची गस्त सुरु झाली.
कशी हि माणसं असतात, काळीज नावाचं प्रकार असत कि नाही त्यांच्याजवळ , काही कळत नाही .. तो एक प्रश्न चिन्हच ?
जिथे काळीज नावच मनचं नाही तिथे ती आर्त हाक तरी कशी पोहोचणार, कशी भिडणार ?
काळजाची आर्त हाक कळायला आधी 'काळीज' असावं लागत तेंव्हा ती हाक काळजाला जावून भिडते.
पण कुणास ठाऊक त्या तरण्या मुलाकडे ते नसावं ?
अन्यथा तो असा चालत सुटला नसता . ..मागे न वळता ..त्या माउलीच्या डोळ्यात आसवे निर्माण करून ...
ती माउली मात्र तिच्या वेगानं धापा टाकत त्या पाठोपाठ लोकल मधून उतरती झाली .
'अरे थांब ना ' ऐक ना रे ... अशी आर्त हाक मारत, हृदय पिटाळत...त्या पाठोपाठ...
क्षणभर नजर तिथेच खिळून राहिली. ..त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ..त्या माउलीकडे.. त्या क्षणाभोवती रेंगाळत ..
विचारांचं काहूर माजलं मनात ...
अवघा क्षणाचा तो प्रसंग ...मनावर घाव करून भळभळती जखम देऊन गेला.
हे काळीज...खरच फार हळवं असत ..फारच हळवं...
भावनेनं उतू गेलेलं, प्रेमानं ओथंबून वाहिलेलं
कुणा ना कधी कळलेलं , एकांतात कायम गढलेलं
शब्दांशी मिसळलेलं , काळजाशीच नडलेलं
आक्रोशांनी रडावंलेलं , स्वतः वरच हास्यांलेलं
बंध नात्याशी जुळलेलं , कधी कुठे भांडलेल
क्षणात तुटलेलं..अन दुभंगून उरलेलं, दुरावलेल .
हे काळीज...खरच फार हळवं असत ..
संपल ते सगळ नाट्य , संपल सगळ .... डोळ्यात देखेतं...घडलेलं.. क्षणापूर्तीच.. .
गाडीने हळूच वेग घेतला अन ती पुन्हा धावू लागली.
काही क्षणाआधी ,नजर भेट झालेली ती मंडळी...
ती माउली , तिचा तो मुलगा ..अन ते वाक्य , तो सारा प्रसंग मनात तसच तरलत राहिला.
काय घडलं असेल त्या बंध त्या नात्यात....ते माहित नाही .
पण त्या माउलीच्या काळजाची ती आरोळी मात्र मनास अजूनही खूप यातना देते....कळवळत मनं त्यानं..
आई वडील , जन्मदाते आपले , अनेक स्वप्नं बघून , सुखाचा त्याग करून , काबाड कष्ट करून लहानाचं मोठ करून वाढविलेलं.
त्या माउलीच्या मनाची साधी हाक, ती कळकळ आपण ऐकू नये ... त्यास प्रतिसाद देऊ नये .तिला तसच एकट सोडूनी निघून जावे ..
काय बोलावं ह्या उपरी ..शब्द नाहीत ....
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..
तेंव्हा खरंच गुदमरत मनं ..
संकेत य. पाटेकर
http://manaatlekaahi.blogspot.in/2015/03/blog-post_14.html
याद्या
4429
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
शब्दबंबाळ !
दवणीय
नक्की घडलं काय होतं???
संडे हो या मंडे, रोज खाओ
या लेखात २५ निरनिराळे संकेत
कुठले म्हणे?
In reply to या लेखात २५ निरनिराळे संकेत by अत्रुप्त आत्मा
आइ तुझा विश्वास मी मोडणार नाही
ठीकठाक.
+१
In reply to ठीकठाक. by एस
खूप खूप धन्यवाद ..!
In reply to +१ by पैसा
धन्यवाद ...!
In reply to ठीकठाक. by एस
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी
आपलीच असली तरी शेवटी माणसंच ना ती? तर्हेवाईक वागणारच!!
In reply to आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी by सूड
आपली माणसे तर्हेवाईकपणे वागली
In reply to आपलीच असली तरी शेवटी माणसंच ना ती? तर्हेवाईक वागणारच!! by संकेत२५
परक्यांच्या तर्हेवाईक वागण्याचं कशाला कुणी मनावर घेतंय.
In reply to आपली माणसे तर्हेवाईकपणे वागली by सतिश गावडे
"आपलं कोणीच नसतं". हे एकदा
In reply to परक्यांच्या तर्हेवाईक वागण्याचं कशाला कुणी मनावर घेतंय. by संकेत२५
"आपलं कोणीच नसतं". हे एकदा लक्षात राह्यलं की फार त्रास होत नाही.
In reply to "आपलं कोणीच नसतं". हे एकदा by सूड
मिपासाठी पर्फेक्ट
In reply to आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी by सूड
"य" पासून कोणतं नाव चालू होतं
ब्लॉगची लिंक दिली आहे की
In reply to "य" पासून कोणतं नाव चालू होतं by आदूबाळ
यतिन यशवंत
In reply to "य" पासून कोणतं नाव चालू होतं by आदूबाळ
संकेत यशवंत पाटेकर
In reply to यतिन यशवंत by पिलीयन रायडर
कळलं काय उराला डसलं ते
धन्यवाद ..!