Skip to main content

मॉकटेल: मँगो पॅशन

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 07/05/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
passion 1 साहित्यः १. हापूस आंब्याचा पल्प - २ कप २. फ्रेश ऑरेंज ज्युस - १/२ कप ३. सोडा - १/२ कप ४. व्हॅनीला आईसक्रिम - ३ मोठे चमचे ५. आईस क्युब्स - ८ ते १० ६. चवीनुसार पीठिसाखर ** कृती: १. दिलेलं सर्व साहित्य ब्लेंडर मधे मिक्स करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा २. आपापल्या आवडिप्रमाणे सजवुन गाssssरेssssगार मँगो पॅशन पेश करा ** माझ्या मते मॉकटेल मधे साखर घालत नाहि पण ऑरेंज ज्युस मुळे पिताना जरा जरी आंबटपणा जाणवला तर सगळाच मुड जाईल म्हणुन पीठि साखर घातली आहे जेणेकरुन पटकन मिक्स होईल आणि पिताना साखरेचे कण लागणार नाहित.

वाचने 25799
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

In reply to by किसन शिंदे

आंब्याची मोठी फोड घेउन त्याला उभ्या आड्व्या चिरा द्याय्च्या,शंकरपाळी प्रमाणे, पूर्ण कापायचे नाही. मग फोड थोडी मागून वाकवायची, झाले !!

In reply to by नीलमोहर

किस्न्याला हे विस्कटून कसं सांगायचं हाच प्रश्न होता. धन्यवाद माझं काम केल्याबद्दल.

In reply to by टवाळ कार्टा

छान आहे पेयाकृती. आईसक्रिम + कोल्ड ड्रिंक (मिरिंडा वगैरे) असे काँबि ट्राय केले आहे ते छान लागतं पण मँगो पल्पसोबत ऑरेंज ज्युस असायलाच हवे का? नाही घातला तर चवीत फरक पडेल का?

In reply to by सानिकास्वप्निल

ऑरेंज ज्युस वगळला तरी चालेल. चवीत विशेष असा फरक पडणार नाहि. त्या एवजी फ्रेश क्रिम घालू शकता. अजून रिचनेस येईल.

In reply to by दिपक.कुवेत

क्रिम ची आयडिया जास्त आवडली. या महिन्याअखेर मिळणार आम्हाला पण हापुस चे आंबे, मग लगेच करणार. जीवघेणा फोटो आहे.

In reply to by पैसा

जोरदार हणुमोदण फार छळतो हा माणुस. उन्हाळ्यात तर नको जीव करुन टाकतो. पैजारबुवा,

In reply to by पैसा

अगदी अगदी. मी व्हॉट्सअ‍ॅप गृपवर पण हेचं ओरडतोय केव्हाचा. त्रास आहे हा माणुस. =))

In reply to by सस्नेह

नै...दीपक भौ मिपावर दिपक पनीरवाले म्हणून वल्डफेमस आहेत :)

In reply to by सूड

मी एकच दिवस पुण्याचं पाणी प्यायलोय म्हणून...तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))

In reply to by टवाळ कार्टा

तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))
असं का? बरं!!

मस्त,दीपक.सुरेख पेयाकृती.अतिसुंदर सादरीकरण.केलीच पाहिजे.पण मीही ऑरेंज ज्यूस वगळून फ्रेश क्रीम वापरून करेन.सानिका पेयाकृती हा शब्द आवडला.

का रे आम्हा सामन्य मनुष्यांवर अत्याचार करतोस तू ? ;) इथे डाळ विकत घेण्याचे वांदे आहेत ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)

कालच आस्वाद घेऊन झाला. फक्त 'सोडा - १/२ कप' ऐवजी मी 'थोडीशी… व्होडका' इतकाच बदल केला आणि... वरती आणखी बर्फाचे खडे टाकले. :)

In reply to by भाते

आल्यावर सीजन असला तर व्होडका घालून परत प्यायचा आनंद लूटू. १५ जून ला बहूतेक डोंबोलीत असणार आहे. काहिही सबब न सांगता तू मला नंदी पॅलेस ला भेटतो आहेस.

In reply to by मुक्त विहारि

हो निदान सध्याच्या कार्यक्रमानुसार. एनीवे पुणे कट्टयाला क्न्फर्म सांगीनच.

मँगो शेक घरी कसा करता येइल, इथे जर कोणि आधि क्रुति दिली असेल तर लिंक मिळेल का?