मी सांगलीचा (आणि तसा ठाण्याचाही) आहे.पण सध्या नव्या मुंबईत राहतो.सांगलीत वर्षातून एकदा तरी येणे होते. कट्टा झाल्यास आणि त्यावेळी सांगलीत येणे असल्यास नक्कीच आवडेल.
माझा प्रोग्राम बदललाय. घरी पाहुणा येत असल्याने ९ तारखेला इथून बेळगावमार्गे थेट कोल्हापूर गाठेन. आणि तिथून १० ला लांजा. खिद्रापूरला किती वाजेपर्यंत पोचाल? लवकर निघालो तर येण्याचा प्रयत्न करीन नायतर थेट कोल्लापूर.
खिद्रापूरला एक च्या आत पोचायचे नियोजन आहे. २ तास कोपेश्वर आणि अर्धा तास जैन मंदिर असे जवळपास २:३०/ ३ तास खिद्रापुरात असू. कोल्हापूरला ५/६ पर्यंत पोहोचायाचा प्रयत्न आहे. संध्याकाळी कोल्हापूर कट्टा होणारच आहे अजून एक.
मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे. मी साधारणपणे १६ जून पासून २७ जून पर्यंत सांगलीत आहे. खादाडीचा धागा काढता येईल पण सध्या सांगलीत नसल्यामुळे फोटो कसे टाकणार ?
सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील ओळखीचे होते...
त्यांनी हजारदा बोलावलं पण जाणं काही जमलं नाही.
आता हळहळ तेव्हढी उरली.....
बाकी तो बॅटमॅन बोलावेल अशी काही शक्यता वाटत नाही!!!!
:)
मी १ ते ३ मे ला सांगली-मिरजेला गेलो होतो पण खादाडी केलल्या शिवाय येत नाही
या काही गोष्टी नक्की ट्राय करा.........गणपती दर्शना सोबतच
१. 'सांभा'ची भेळ आणि पाणी-पुरी (वखार भाग)
२. महाराष्ट्र बँकेचा वडा (भावे नाट्यमंदिरा जवळ)
३. गणेशचा नाष्टा - पोहे, वडा इ.(विश्रामबाग)
४. बसप्पा हलवाईचे - पेढे, खाजा इ. (विश्रामबाग / मिरज)
५. भडंग - भोरे / अंबा आणि इतरही
६. रामविश्वास - श्रीखंड / आम्रखंड
७. कृष्णाठच्या वांगी, गुळ, चुरमुरे आणि हळद नक्की सोबत न्या.
८. सुंगारेची भजी / स्टेशन चौकात भजी कढी
भावानो
शिंदे किंवा गोविंदाची बुर्जी - मधुबन कॉर्नर
आनंदरावचा अंडा sandvich - वालचंद कॉलेज जवळ
सरोवरची पाव भाजी - वालचंद कॉलेज जवळ
गीता फरसाण मार्ट - पापडी चटणी (आपण तर फिदा)
गुड इवेनिंग (पेंडसे) ची साधी आणि फराळी मिसळ - मारुती रोड
हळद भवन कॅण्टीन ची ब्रेड उसळ
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिराजीचा चहा (दर्दी लोक २/३/४ सुद्धा सहज पिवू शकतात . ) - १ नंबर शाळा
सरकारी दवाखान्य जवळ बेल्वल्कारांचे हॉटेल अनुराधा - खास झणझणीत मटणासाठी
स्टार टेक्सासची दही पुरी आणि पाणिपुरी.
कॉलेज कॉर्नरचा सँडवीचवाला.
कपाले भडंगवाल्याच्या गाड्यावरचे गरमागरम भडंग - गाड्याची अवस्था न बघता भडंग खायचे असेल तरच जावे.
सुनील कडे मिळणारी कच्छी दाबेली - याच्या गाड्याचे नाव माहिती नाही. टाटा पेट्रोल पंपाजवळ असतो.
कोर्टाबाहेर मिळणारा (ICICI सर्कल समोर) गोटी सोडा. त्यातही त्या सोडेवाल्यापुढे "गोटी सोड्यात दम नसतो" असा एखादा डायलॉग आपल्या आपल्यात टाकला तर तो उचकतो आणि आणखी स्ट्राँग बाटली उघडतो. ;)
तो आनंदराव की अनंतराव? मी कॉलेजात असताना वालचंद कॉलेजच्या समोर मिरज रोडवर एक गाडीवाला होता त्याला आम्ही अनंतराव म्हणत असू.
इतर काही ठिकाणे--- (सध्या माहित नाही ही ठिकाणे अजून आहेत की नाहीत)
१. वालचंद कॉलेजजवळील निलेश, जुनेद आणि सफा बेकर्या विश्रामबाग
२. वालचंद कॉलेजजवळ बँक ऑफ इंडियाच्या बाहेर दोन टपरीवाले होते.त्यांच्याकडचे पोहे आणि चहा भरपूर वेळा घेतला आहे.
३. सांगली-मिरज रोडवर विश्रामबाग बस स्टॉपजवळ अय्यंगार बेकरी
४. अय्यंगार बेकरीजवळून जाणार्या सांगली-मिरज रोडला ९० अंशात असलेल्या एका रस्त्यावर सुप्रसिध्द कॉफी आणि आईसक्रिम मिळणारे एक दुकान आहे/होते. त्या दुकानात जायला ४-५ पायर्या उतरायला लागतात. स्नो-डेन की असे काहीतरी नाव होते त्याचे.
५. विश्रामबागमधील एन.आय.आय.टी जवळील हॉटेल चिनार. या हॉटेलात आम्ही मित्रमंडळी कित्येकवेळा गेलो असू.
६. हॉटेल चिनारसमोरच असलेला फ्रूट ज्युसवाला.
(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
कट्टे करा.. मजा करा ... कोणी कोल्हापुरात करा कोणी सांगलीत ..
च्यामारी बारामतीला कट्टा झाला आहे का? असा धागा काढाव म्हणत होतो.. पण जळजळ शांत करुन घेतली उगाच..
कट्ट्याला शुभेच्छा
मी प्रॉपर साताऱ्याची आहे. सध्या पुण्यात असते आणि मिरजेची सून आहे ;)
कट्टा झाला तर नक्की आवडेल यायला… (नवऱ्यासोबत)
९-१० मे ला मी मिरजेतच आहे. तेव्हाच करू….
बरेच लोक आहेत सांगली मिरजेतील इथे :-)
सांगलीला गेलाच तर हरिपूर्ला बागेचा गणपती पण बघता येईई, तसेच नरसोबाची वाडी देखील.
खादाडीबद्दल विशेष आत्ता लक्षात नाही, जी काही एकेकाळी प्रचंड आवडायची, त्यांचा दर्जा आत्ता उरला नाही. :-(
प्रतिक्रिया
एकोळी??
सांगलीकर मिपाकर
मी पण
सहमत. सागलि ल कट्टा झाल्यास
सांगली
९ तारखेलाच एक धावता कट्टा करण
रात्र दिवस थोड़े आणी :))
नाय रे
खिद्रापूरला एक च्या आत
वोक्के!
कट्टे कर आगोबा! :-D
मी मिरजेत असलो तर भेटूच. बाकी
+१. ह्या धाग्याच्या
मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे.
सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील
मी सांगलीकर नाही पण...
सांगलीची खादाडी
भावानो
स्टार टेक्सासची दही पुरी आणि
आनंदराव की अनंतराव?
(आपुन शाकाहारी असल्याने बाकी
मी मिरजकर.१० वी पर्यंत.आता
मुलाच्या बुद्धिबळ स्पर्धे
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर,
! चला कट्टा करुया!
कट्टे करा.. मजा करा ... कोणी
होऊन जाऊद्या
पोहोचण्याचा प्रयत्न करीन !
होऊन जाऊद्या...
सांगली मिरजेतील कट्टा
मी मुळचा सांगलीचा. आजच
सांगलीच्या संस्थानाच्या