✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ?

द
दा विन्ची यांनी
Mon, 05/04/2015 - 22:42  ·  लेख
लेख
सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ? batman आणि point blank सोडून कुनी स्थानिक मेम्ब्र हाईत काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10709 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

एकोळी??

सूड
Mon, 05/04/2015 - 22:44 नवीन
एकोळी??
  • Log in or register to post comments

सांगलीकर मिपाकर

श्रीरंग_जोशी
Mon, 05/04/2015 - 22:46 नवीन
सांगलीकर मिपाकर म्हंटलं की पहिलं नाव आठवतं अमितसांगली यांचं. इतर अनेक मिपाकर सांगली किंवा जवळपासचे असतील असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

मी पण

क्लिंटन
Mon, 05/04/2015 - 22:46 नवीन
मी सांगलीचा (आणि तसा ठाण्याचाही) आहे.पण सध्या नव्या मुंबईत राहतो.सांगलीत वर्षातून एकदा तरी येणे होते. कट्टा झाल्यास आणि त्यावेळी सांगलीत येणे असल्यास नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

सहमत. सागलि ल कट्टा झाल्यास

थोर्लेबजिराव
Tue, 05/05/2015 - 10:52 नवीन
सहमत. सागलि ल कट्टा झाल्यास अनि तेवा साग्लित अस्ल्यस जरुर येनर...!!
  • Log in or register to post comments

सांगली

कपिलमुनी
Tue, 05/05/2015 - 11:02 नवीन
सांगलीला कट्टा करू . पण आधी सांगलीमधली खादाडी असा एक धागा सांगलीकरांनी काढा ;)
  • Log in or register to post comments

९ तारखेलाच एक धावता कट्टा करण

प्रचेतस
Tue, 05/05/2015 - 11:16 नवीन
९ तारखेलाच एक धावता कट्टा करण शक्य आहे. खिद्रापूरला जाताना सांगलीमार्गेच जाणार आहोत. पैसाताईही तेव्हा सांगलीतच असावी.
  • Log in or register to post comments

रात्र दिवस थोड़े आणी :))

यसवायजी
Tue, 05/05/2015 - 11:30 नवीन
रात्र दिवस थोड़े आणी :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाय रे

पैसा
Tue, 05/05/2015 - 11:33 नवीन
माझा प्रोग्राम बदललाय. घरी पाहुणा येत असल्याने ९ तारखेला इथून बेळगावमार्गे थेट कोल्हापूर गाठेन. आणि तिथून १० ला लांजा. खिद्रापूरला किती वाजेपर्यंत पोचाल? लवकर निघालो तर येण्याचा प्रयत्न करीन नायतर थेट कोल्लापूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खिद्रापूरला एक च्या आत

प्रचेतस
Tue, 05/05/2015 - 11:40 नवीन
खिद्रापूरला एक च्या आत पोचायचे नियोजन आहे. २ तास कोपेश्वर आणि अर्धा तास जैन मंदिर असे जवळपास २:३०/ ३ तास खिद्रापुरात असू. कोल्हापूरला ५/६ पर्यंत पोहोचायाचा प्रयत्न आहे. संध्याकाळी कोल्हापूर कट्टा होणारच आहे अजून एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वोक्के!

पैसा
Tue, 05/05/2015 - 11:55 नवीन
मग माझं खिद्रापूर क्यान्सल झाल्यात जमा. कारण आम्ही १२ च्या दरम्यान घरून निघू. ६ पर्यंत कोल्लापूरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कट्टे कर आगोबा! :-D

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/05/2015 - 11:48 नवीन
कट्टे कर आगोबा! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी मिरजेत असलो तर भेटूच. बाकी

बॅटमॅन
Tue, 05/05/2015 - 13:04 नवीन
मी मिरजेत असलो तर भेटूच. बाकी असा कट्टा तरी आजवर झाल्याचे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

+१. ह्या धाग्याच्या

पॉइंट ब्लँक
Tue, 05/05/2015 - 16:52 नवीन
+१. ह्या धाग्याच्या निमित्ताने सांगली मिरजकर मंडळींची माहिती होईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे.

दा विन्ची
Tue, 05/05/2015 - 17:56 नवीन
मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे. मी साधारणपणे १६ जून पासून २७ जून पर्यंत सांगलीत आहे. खादाडीचा धागा काढता येईल पण सध्या सांगलीत नसल्यामुळे फोटो कसे टाकणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील

पिवळा डांबिस
Sat, 05/09/2015 - 11:42 नवीन
सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील ओळखीचे होते... त्यांनी हजारदा बोलावलं पण जाणं काही जमलं नाही. आता हळहळ तेव्हढी उरली..... बाकी तो बॅटमॅन बोलावेल अशी काही शक्यता वाटत नाही!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

मी सांगलीकर नाही पण...

बाबा पाटील
Tue, 05/05/2015 - 19:22 नवीन
पण तासगावकरांचा जावई मात्र आहे.त्यामुळे शक्य झाले तर कट्ट्याला नक्की येइल.
  • Log in or register to post comments

सांगलीची खादाडी

आर्य
Tue, 05/05/2015 - 22:30 नवीन
मी १ ते ३ मे ला सांगली-मिरजेला गेलो होतो पण खादाडी केलल्या शिवाय येत नाही या काही गोष्टी नक्की ट्राय करा.........गणपती दर्शना सोबतच १. 'सांभा'ची भेळ आणि पाणी-पुरी (वखार भाग) २. महाराष्ट्र बँकेचा वडा (भावे नाट्यमंदिरा जवळ) ३. गणेशचा नाष्टा - पोहे, वडा इ.(विश्रामबाग) ४. बसप्पा हलवाईचे - पेढे, खाजा इ. (विश्रामबाग / मिरज) ५. भडंग - भोरे / अंबा आणि इतरही ६. रामविश्वास - श्रीखंड / आम्रखंड ७. कृष्णाठच्या वांगी, गुळ, चुरमुरे आणि हळद नक्की सोबत न्या. ८. सुंगारेची भजी / स्टेशन चौकात भजी कढी
  • Log in or register to post comments

भावानो

दा विन्ची
Tue, 05/05/2015 - 23:00 नवीन
भावानो शिंदे किंवा गोविंदाची बुर्जी - मधुबन कॉर्नर आनंदरावचा अंडा sandvich - वालचंद कॉलेज जवळ सरोवरची पाव भाजी - वालचंद कॉलेज जवळ गीता फरसाण मार्ट - पापडी चटणी (आपण तर फिदा) गुड इवेनिंग (पेंडसे) ची साधी आणि फराळी मिसळ - मारुती रोड हळद भवन कॅण्टीन ची ब्रेड उसळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिराजीचा चहा (दर्दी लोक २/३/४ सुद्धा सहज पिवू शकतात . ) - १ नंबर शाळा सरकारी दवाखान्य जवळ बेल्वल्कारांचे हॉटेल अनुराधा - खास झणझणीत मटणासाठी
  • Log in or register to post comments

स्टार टेक्सासची दही पुरी आणि

मोदक
Wed, 05/06/2015 - 17:15 नवीन
स्टार टेक्सासची दही पुरी आणि पाणिपुरी. कॉलेज कॉर्नरचा सँडवीचवाला. कपाले भडंगवाल्याच्या गाड्यावरचे गरमागरम भडंग - गाड्याची अवस्था न बघता भडंग खायचे असेल तरच जावे. सुनील कडे मिळणारी कच्छी दाबेली - याच्या गाड्याचे नाव माहिती नाही. टाटा पेट्रोल पंपाजवळ असतो. कोर्टाबाहेर मिळणारा (ICICI सर्कल समोर) गोटी सोडा. त्यातही त्या सोडेवाल्यापुढे "गोटी सोड्यात दम नसतो" असा एखादा डायलॉग आपल्या आपल्यात टाकला तर तो उचकतो आणि आणखी स्ट्राँग बाटली उघडतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

आनंदराव की अनंतराव?

गॅरी ट्रुमन
Fri, 05/08/2015 - 23:17 नवीन
आनंदरावचा अंडा sandvich - वालचंद कॉलेज जवळ
तो आनंदराव की अनंतराव? मी कॉलेजात असताना वालचंद कॉलेजच्या समोर मिरज रोडवर एक गाडीवाला होता त्याला आम्ही अनंतराव म्हणत असू. इतर काही ठिकाणे--- (सध्या माहित नाही ही ठिकाणे अजून आहेत की नाहीत) १. वालचंद कॉलेजजवळील निलेश, जुनेद आणि सफा बेकर्‍या विश्रामबाग २. वालचंद कॉलेजजवळ बँक ऑफ इंडियाच्या बाहेर दोन टपरीवाले होते.त्यांच्याकडचे पोहे आणि चहा भरपूर वेळा घेतला आहे. ३. सांगली-मिरज रोडवर विश्रामबाग बस स्टॉपजवळ अय्यंगार बेकरी ४. अय्यंगार बेकरीजवळून जाणार्‍या सांगली-मिरज रोडला ९० अंशात असलेल्या एका रस्त्यावर सुप्रसिध्द कॉफी आणि आईसक्रिम मिळणारे एक दुकान आहे/होते. त्या दुकानात जायला ४-५ पायर्‍या उतरायला लागतात. स्नो-डेन की असे काहीतरी नाव होते त्याचे. ५. विश्रामबागमधील एन.आय.आय.टी जवळील हॉटेल चिनार. या हॉटेलात आम्ही मित्रमंडळी कित्येकवेळा गेलो असू. ६. हॉटेल चिनारसमोरच असलेला फ्रूट ज्युसवाला. (पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

(आपुन शाकाहारी असल्याने बाकी

दा विन्ची
Tue, 05/05/2015 - 23:00 नवीन
(आपुन शाकाहारी असल्याने बाकी विशेष माहिती नाही . )
  • Log in or register to post comments

मी मिरजकर.१० वी पर्यंत.आता

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 05/06/2015 - 00:19 नवीन
मी मिरजकर.१० वी पर्यंत.आता येणे नाहीतच जमा.पण भविष्यात कट्टा झाला तर विचार करु यायचा.
  • Log in or register to post comments

मुलाच्या बुद्धिबळ स्पर्धे

पद्मश्री चित्रे
Wed, 05/06/2015 - 00:21 नवीन
मुलाच्या बुद्धिबळ स्पर्धे साठी मी ७ ते १० सांगली त असेन. ३/४ तासात जावून येण्याजोगे काही ठिकाण आहे का आजूबाजूच्या परिसरात ??
  • Log in or register to post comments

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर,

पॉइंट ब्लँक
Wed, 05/06/2015 - 09:29 नवीन
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, सांगलीचे गणेश मंदिर, तासगावचे गणेश मंदिर. नरसोबाची वाडी, अजून आठवली तर सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

! चला कट्टा करुया!

प्रमोद देर्देकर
Wed, 05/06/2015 - 10:12 नवीन
! चला कट्टा करुया! Image removed. कट्यास अनेक हार्दिक शुभेच्छा! (फटु आणि वृत्तांताच्या प्रतिक्षेत असलेला पम्या)
  • Log in or register to post comments

कट्टे करा.. मजा करा ... कोणी

गणेशा
Wed, 05/06/2015 - 13:37 नवीन
कट्टे करा.. मजा करा ... कोणी कोल्हापुरात करा कोणी सांगलीत .. च्यामारी बारामतीला कट्टा झाला आहे का? असा धागा काढाव म्हणत होतो.. पण जळजळ शांत करुन घेतली उगाच.. कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

होऊन जाऊद्या

स्वधर्म
Wed, 05/06/2015 - 13:53 नवीन
मी सांगलीकर असून सध्या पुण्यात राहतो. सांगलीला महिन्या-दोन महिन्यात येणे होतेच. कट्ट्याची तारीख कळली, तर नक्की जुळवून येइन.
  • Log in or register to post comments

पोहोचण्याचा प्रयत्न करीन !

psajid
Fri, 05/08/2015 - 17:00 नवीन
कधी होतोय सांगा ! पोहोचण्याचा प्रयत्न करीन !
  • Log in or register to post comments

होऊन जाऊद्या...

काव्यान्जलि
Fri, 05/08/2015 - 23:02 नवीन
मी प्रॉपर साताऱ्याची आहे. सध्या पुण्यात असते आणि मिरजेची सून आहे ;) कट्टा झाला तर नक्की आवडेल यायला… (नवऱ्यासोबत) ९-१० मे ला मी मिरजेतच आहे. तेव्हाच करू….
  • Log in or register to post comments

सांगली मिरजेतील कट्टा

रंगासेठ
Mon, 05/18/2015 - 13:53 नवीन
बरेच लोक आहेत सांगली मिरजेतील इथे :-) सांगलीला गेलाच तर हरिपूर्ला बागेचा गणपती पण बघता येईई, तसेच नरसोबाची वाडी देखील. खादाडीबद्दल विशेष आत्ता लक्षात नाही, जी काही एकेकाळी प्रचंड आवडायची, त्यांचा दर्जा आत्ता उरला नाही. :-(
  • Log in or register to post comments

मी मुळचा सांगलीचा. आजच

अमोल केळकर
Mon, 05/18/2015 - 14:34 नवीन
मी मुळचा सांगलीचा. आजच मुंबईला परत आलो अमोल केळकर सांगलीच्या संस्थानाच्या गणपतीचे इथे दर्शन घ्या
  • Log in or register to post comments

सांगलीच्या संस्थानाच्या

अमोल केळकर
Mon, 05/18/2015 - 14:37 नवीन
सांगलीच्या संस्थानाच्या गणपतीचे इथे दर्शन घ्या www.kelkaramol.blogspot.in
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा