मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुत्तरीत प्रश्न

अज्ञात · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
लहानाचा झालो मोठा, पंखात आले बळ, बुडलो ज्या रंगात तो माझाच रंगच होई, होती स्वप्न डोळ्यात, होते बळ पंखात, मागे न बघता, स्वप्नात जगत राही, सरले सगळे दूर, ठेविले सगळे मागे, आठवणींना सुद्धा आसवात बुडवित राही, झोकून देई स्वतःला, गुलाबी या चिखलात, शोधितो असे काय, न मिळून कशात राही, उघडून पाहतो मुठ, हात रिते दिसतात, रेषांची जाळी मात्र, सामोरी भुलवत राही, काही करू तरीही, तहान ही शमेना, वासनेच्या दलदलीत, अडकत मी राही, मृगजळामागे भ्रमाच्या, नेहमी धावत आहे, थकून जातो जेव्हा, घेरून निराशा राही, शोध हा संपेल, का होईल तो सुरु आता, अजणतेच्या अंधारात, मी घुटमळत आता राही, घेतला श्वास पहिला, जन्मलो होतो जेव्हा, संपेल का हा शोध, थांबेल तो तेव्हा ? समजून घेण्या कोडे, कोठे सुरवात करावी, फक्त हाच प्रश्न आता अनुत्तरीत राही, पारिजात.

वाचने 1632 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by मितान

पैसा Sat, 05/02/2015 - 10:22
आता अनुत्तरित झाली ही कविता! आपण मेलो की सगळेच संपणार हो! आमचे गुरुजी म्हणतात सगळेच टेंपररी आहे. मग कसला शोध आणि कसली उत्तरे! आज काय आहे तेवढंच बघायचं.