मला आय नाय, बाप हाय.
आगीवाले डोळे त्याचे,
अन जबान चाबुक हाय.
निघतो रोज सकाळपारी
धूर सोडत इंजनवाणी,
जणू पटरी पायाखाली.
ठरली ठेसनं ठरलं काम,
येगळी माणसं येगळा दाम.
येतो झिजून रातपारी
धूर सोडत इंजनवाणी,
वेडीवाकडी पटरी घेउन पायाखाली.
पाठ लाऊन भिताडाला
घाम पाजीत बसतो अन,
'काय केलस दिसभर?'
जणू इचारतो सोताला..
'काय नाय' जवाब मातूर माझा हाय.
आगिवाले डोळे ओकतो,
चाबुकवाली जबान ठोकतो,
हातालाभी लई जोर,
हाणतो मात्र आंगचोर.
विडी-चूल पेटवून आत,
रोजच्यावाणी डाळ-भात,
खाऊन पडतो गपगार..
पाहत राहतो उदयापार.
'काय करणार?'इचारल्यावर,
बापावाणी अडाणपण,
चढलं मुखडयावरती अन,
'मालुम नाय' गेलो बोलून..
रातभर कुशीत तेच्या,
कान लावून छाताड़ाला..
मालगाड़ीची सारी धड-धड ऐकत राहिलो..
बिगर सपनांची खाली गाड़ी, बघत राहिलो.
सकाळच्याला...
बाप माझा, निघाला जवा,
धूर सोडत इंजनवाणी...
बोट धरून जूडलो मीबि,
जणू तेच्या डब्यावाणी...
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही कळले नाही. :(
काही कळले नाही. :(
आईवेगळ्या पोराची कथा
In reply to काही कळले नाही. :( by प्राची अश्विनी
त्याचा कष्टकरी बाप कदाचित मालगाडीवर हमाल म्हणून काम करत असेल आणि या पोराचं आयुष्यही रेल्वे यार्डात बापाच्या मागोमाग हिंडण्यात जात असेल. घरात आय नाही. बाप कसातरी पोराला वाढवतो आहे आणि पोरगं रात्री बापाला चिकटून काढतं आहे कारण बिनघोर झोपायला आईची कूस नाही.
सहमत
In reply to आईवेगळ्या पोराची कथा by पैसा
लिहिताना हीच कथा विचारात होती..थैंक्स पैसा.. : )
ओह! चुकून "आय नाय, बाप नाय"
In reply to सहमत by Vimodak
ओह! चुकून "आय नाय, बाप नाय" असे वाचले आणि अर्थ डोक्यावरून गेला.
: )
In reply to ओह! चुकून "आय नाय, बाप नाय" by प्राची अश्विनी
अतिरिक्त माहिती: माझे 'आयबाप' डोंबिवलीला सुखरूप आहेत ; )
आवडली.
आवडली.
हे विशेष आवडलं.
चटका लावून गेली.
"बोट धरून जूडलो मीबि,
जणू तेच्या डब्यावाणी..." - निव्वळ अप्रतिम.
एका कष्ट्कर्याचे आणि त्याच्या लेकराचे जीवन चांगले मांडले आहे कवितेत.
आशयगर्भ अभिव्यक्ती!
आशयगर्भ अभिव्यक्ती!
पाहत राहतो उदयापार.
ओळ छान असली तरी पहात नाही उद्यापार ही जास्त आशयाला जास्त समर्पक वाटली असती. (उद्यापार याच अर्थ मी उद्यापलीकडे म्हणजे भविष्याकडे असा घेतला) कारण अश्या कष्टकरी लोकांची "आजचा दिवस भागला उद्याचं उद्या बघू " अशी मनोवृत्ती असते.
पाहत राहतो उदयापार.
In reply to पाहत राहतो उदयापार. by अंतरा आनंद
मला पण हीच ओळ (कडवे) आवडले जास्त.
फक्त पाहत राहतो उद्यापार म्हणजे काळजीने माझा बाप कदाचीत माझीच काळजी करत झुरतो रोज आणि माझ काय होईल उद्याला ह्या गर्तेत पडुन असतो ह्या अर्थाने ही ओळ आली असावी असे वाटले होते.
फार सुंदर, आशयघन कविता आहे.
फार सुंदर, आशयघन कविता आहे. दारिद्र्य हे एक दुष्टचक्र असते या शाश्वत विधानाची आठवण करून देणारी!!!
+१
In reply to फार सुंदर, आशयघन कविता आहे. by एस
सहमत आहे. कविता आवडली. अशाच अर्थपूर्ण कविता येऊ द्या आणखी.
खूप छान!
कविता आवडली!
कविता आवडली मोडक साहेब. अशाच
कविता आवडली मोडक साहेब. अशाच आशयपूर्ण कविता येऊद्यात अजून..
आभार
In reply to कविता आवडली मोडक साहेब. अशाच by किसन शिंदे
वेळ काढून कविता वाचल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार..लोभ असावा: विमो ; )
मनाला चटका लावणारी कविता.
मनाला चटका लावणारी कविता.
आवडली! धन्यवाद..!!
आवडली!
धन्यवाद..!!
फारच
फारच संवेदनशील कविता..
अप्रतिम काव्य ! अप्रतिम
अप्रतिम काव्य ! अप्रतिम चित्रण !
क्या बात है
वा! सुरेख.
वा! सुरेख.