Skip to main content

अंथरुणातील कामात बिझी असणाऱ्या मित्रांना

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 27/04/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
संध्या होता मिलनाची खाट सजवली सख्यांनी … दारी दुग्धकेशर घेऊनी बावरते सौभाग्यकांक्षिणी… श्वासही तापले काया झंकारीली भानही हिरावले मग त्या कामीनी… जाणवावी कवेत तिच्या तनुतील शिरशीरी हरलाजऱ्या चुंबनी…. अश्व दौडवता यौवनाचे अनुभवावी गुलाबी श्वासांची जोडी बिलगूनी… पहाटजाग येई अलगद पिचलेला चुडा कुस्कारला गजरा ओलांडुनी… फितुरी विस्कटलेलं कुंकू, अन मोकळे केस ओरडून संगती सर्वा कहानी … गीत असे माधुरी सहसखी मोहिनी तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….
लेखनविषय:

वाचने 3996
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

डीपरेशन = खोलवर जौन आणलेले रेशन असेच ना गुर्जी

In reply to by वपाडाव

@खोलवर जौन आणलेले रेशन>>> इतक्यात रेशनवर आलात??? अर्थात हल्ली मिपावर यायला लागलायत यातच सगळं आलय म्हणा! ;) http://www.sherv.net/cm/emoticons/object/bubbles-smiley-emoticon-emoji.gif असो! ;)

शीर्षक ओळखीचं वाटतंय... ; )

सौभाग्यकांक्षिणी असताना दारी दुग्धकेशर घेऊनी कशी जाईल हो ती ? सौभाग्यवती हवी

In reply to by कपिलमुनी

सौभाग्यकांक्षिणी म्हणजे, पतिसौख्य भरपूर व शेवटपर्यंत मिळो अशी इच्छा असणारी स्त्री..
असे मिपावरील ऐका लेखात वाचल्याचे स्मरते आहे, मुनिवर्य :)

तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….
हेच रहावे असे तुझ्यासवे गात रहावे हरदीनी हरदीनी…. होऊ नये या करीता "प्रपंच करा नेटका"

In reply to by नाखु

परंतु माझ्यामते 'हरदीनी हरदीनी'…. हेच योग्य …. परंतु त्याबरोबरच मनीमात्र भाव असावा …"भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा"…… असा. जर कोणी तुम्हाला सेक्स हे पाप आहे असे जर सांगत/दर्शवत असेल , तर तुकोबांच्या खालील ओळी जरूर ध्यानी घ्याव्या … ऐसे कैसे जाले भोंदू, कर्म करोनि म्हणति साधु अंगी लावूनियां राख, डोळे झांकुनी करिती पाप दावुनि वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगों किती जळो तयांची संगती